आरोग्यदायी सेवा

163/172

अध्याय ४२—सेवा आणि विकास

“पुरुषार्थ करा, सामर्थ्यवान बना”

ख्रिस्ती जीवन आपण समजतो त्यापेक्षा अधिक काही आहे. यामध्ये केवळ सभ्यता, धीर, नम्रता आणि दयाळूपणा एवढेच नाही, परंतु या शिवाय धाडस, साहस, शक्ति व चैतन्याची या सर्व गुणांची गरज असते. ख्रिस्ताने जो मार्ग निर्धारित केला तो अरुंद आणि त्यागाचा मार्ग होता. त्या मार्गात प्रवेश करणे म्हणजे निराशा, अडचणी व त्रासाला तोंड देत मार्गक्रम करणे असे होते आणि यासाठी कमजोर व्यक्ति चालणार नाही तर खंबीर, धीट आणि एकाग्रता असणे आवश्यक होते. MHMar 396.1