आरोग्यदायी सेवा

164/172

कर्तव्याचे बळ

सहनशक्ति असणाऱ्या व्यक्तिची गरज आहे, असे लोक आपले मार्ग सुलभ होण्याची आणि सर्व अडथळे दूर होण्याची वाट पाहात नाहीत तर ते उत्साहाने इतरांना प्रभावित करुन मार्गक्रमण करण्यासाठी प्रोत्साहन देतात. ज्यांच्या हृदयामध्ये ख्रिस्ताच्या प्रीतिचा उत्साह भरला आहे त्यांचे हात त्यांच्या गुरुसाठी कार्य करण्यासाठी मजबूत असतात. MHMar 396.2

मिशनरी कार्य करणारे काही लोक दुर्बल, भिते, बोलता न येणारे आणि लगेच निराश होणारे असे असतात. त्यांच्यामध्ये धाडसही नसते किंवा कमी असते. त्यांच्यामध्ये सकारात्मकता आणि कर्तव्याचे बळ कमी असते. त्यांच्यामध्ये जे साहस असते त्यामध्ये वाढ होऊ शकते परंतु तसे प्रयत्न करावे लागतात. तसे गुण व पात्रता असावी लागते. हे देवाकडे मागीतल्यास तो देतो. ज्या लोकांना यश मिळवायचे आहे त्यांच्यामध्ये साहस हवे आणि आशावादी राहिले पाहिजे. त्यांना केवळ धैर्य असून चालणार नाही, परंतु अंगी असणाऱ्या गुणांचाही विकास करण्याचे प्रयत्न करायला हवे. विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी नम्रतेने उत्तर द्यावीत. यामुळे समोरच्याचा क्रोध शांत होईल. परंतु वाईटाचा विरोध करण्यासाठी त्यांना एखाद्या योध्याप्रमाणे साहसही असावे. प्रेम हे सर्वच गोष्टी सहन करु शकते. याचबरोबर नम्र स्वभाव आणि तसे चरित्र्यसुद्धा असावे लागते. यामुळे त्यांच्या या गुणाला एक सकारात्मक शक्ति प्रदान होते. MHMar 396.3

काही लोकांमध्ये दृढतचे गुण कमी असतात. ह्यांच्या योजनांमध्ये आणि उद्देशामध्ये काही निश्चित स्वरुप आणि निरंतरचा निर्णय नसतो. यामुळे त्यांच्या व्यवहारीक जीवनामध्ये काही उपयोग नसतो. कारण त्यामध्ये निरंतरतेचे स्वरुप नसते. त्यांची ही दुर्बलता निर्णय घेण्यामध्ये यशस्वी होत नसते. त्यांच्या या असफलतेवर आणि अक्षमतेवर विजय प्राप्त करुन घेणे आवश्यक आहे. एका खऱ्या ख्रिस्ती व्यक्तिमध्ये माघार न घेण्याचा विशेष गुण असतो. विरोध अवस्थेमध्ये त्याला दाबले जात नाही. आमच्या जवळ नैतिक रुपाचा कनाटा असतो. हा सत्य निष्ठतेचा कनाटा असतो यामध्ये माघार किंवा पडती बाजू घेण्याचा प्रश्नच येत नाही. लाच देऊन किंवा भीती दाखवून खोटेपण सादर करता येत नाही. MHMar 397.1

परमेश्वराची इच्छा आहे की आम्हांला मिळालेल्या प्रत्येक वेळेचा सदुपयोग करावा. त्याचा भरपूर वापर करावा आणि त्याच्या कार्यासाठी तयारी करावी. ते कार्य पूर्ण करण्यासाठी पूर्ण शक्ति लाऊन त्याचे कार्य पूर्ण करावे. त्याचे पावित्र्य समजून जबाबदारीने मानवाने देवाचे कार्य पूर्ण करावे. परमेश्वराचे हे पवित्र कार्य गंभीरपणे करणे गरजेचे आहे. MHMar 397.2

अनेक लोक ज्यांना मोठे कार्य करण्याची पात्रता आहे ते थोडेच काम करतात. कारण थोडेच काम करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. हजारो लोक आपल्या जीवनातून असे जात असतात की ज्यांच्याजवळ काही महत्त्वाचे उद्देशच नसतात. त्यांच्यासमोर मिळविण्यासाठी काही असा कोणा उंच स्तर नसतो. त्यांचे कारण असे आहे की ते स्वत:ची किंमत अति कमी असल्याचे समजतात. ख्रिस्ताने आमच्यासाठी एक सार्वकालिक मोठी किंमत मोजली आहे. आणि जी किंमत त्याने मोजली आहे ती मनमोल आहे असे आम्ही समजावे अशी परमेश्वराची इच्छा आहे. MHMar 397.3

पुढील पातळीपर्यंत पोहोचल्यावरच आपले मन संतुष्ट होते. जे आम्ही बनू शकत होतो ते आम्ही नाही किंवा परमेश्वराच्या इच्छेच्या पातळीपर्यंत आम्ही अजून पोहोचलो नाही. परमेश्वराने आम्हाला तर्कवितर्क करण्याची शक्ति दिली आहे. ती अशासाठी की आम्ही निष्क्रिय राहू नये किंवा जगाच्या भ्रष्ट विचारांमध्ये गुंतून राहू नये. भ्रष्ट आणि अनैतिक विचारांऐवजी परमेश्वराच्या प्रीतिविषयी व त्याच्या कार्याविषयी विचार करणे केव्हाही चांगलेच आहे. परमेश्वराने दिलेल्या या शक्तिंचा वापर करण्याची सवय लागल्यामुळे आपल्यामध्ये त्यांचा विकास होतो, सुधारणा होते व शुद्धिकरण आणि विकास केल्यास परमेश्वराच्या राज्यासाठी यामध्ये वापर करणे हिताचे असते. MHMar 397.4

मात्र कोणालाही एखाद्या यंत्राप्रमाणे दुसऱ्या मनुष्याच्या बुद्धीने चालण्याची परवानगी नाही. परमेश्वराने मानवाला विचार करण्याची आणि त्याप्रमाणे कार्य करण्याची योग्यता दिली आहे. तसेच सावधपणे कार्य करण्यासाठी परमेश्वराचे प्रार्थना करण्यानेच आपण परमेश्वराच्या कार्याचे ओझे उचलू शकतो. परमेश्वराने देऊ केलेल्या व्यक्तिमत्त्वामध्ये स्थिर राहा. दुसऱ्या व्यक्तिची सावली कधीच बनू नका. प्रभु तुमच्यामध्ये आहे याची अपेक्षा करा. तो आपल्या मधूनच कार्य करीत असतो. MHMar 398.1

आम्ही खूप शिकलो आहोत असे स्वत:ला कधीच वाटून देऊ नका. सभ्य मानसिकता ही मनुष्याचा सभ्यपणा आहे. त्याचे ते माप आहे. आपले शिक्षण आजीवन चालतच राहिले पाहिजे. दररोज आपणास काहीतरी शिकायला मिळते आणि त्या ज्ञानाचा वापर आपल्या रोजच्या जीवनात व्हायला हवा. MHMar 398.2

लक्षात ठेवा की आपण कोणत्याही रुपामध्ये सेवा करीत आहात त्या अवस्थेमध्ये तुमची मानसिकता जाहीर होते, चरित्र्याचा विकास होतो. आपण कोणतेही काम करा, मन लावून पक्के करा. कर्मठपणे करा. सत्याने कराव त्यावर विजयी व्हा. MHMar 398.3

ज्या भावना आणि आपण दैनंदिन जीवनामध्ये वापरता ते पूर्ण जीवनामध्ये आत्मसात करणे आवश्यक आहे. जे लोक एक ठराविक काम करण्यासाठी ठराविक पैसे मिळण्याची इच्छा बाळगतात आणि जे बदल व प्रशिक्षणाचे कष्ट न करता स्वत:ला योग्य समजतात ते हे लोक नाहीत. ज्यांना परमेश्वराने आपल्या कार्यासाठी निवडले आहे. जे लोक आपली शक्ति आणि शारीरिक कष्टाचा व मानसिकतेचा कमीत कमी करतात त्यांनाही परमेश्वर पूर्ण आशीर्वाद देत नाही. त्यांचा नमूना एक संसर्ग आजार आहे. स्वत:चा स्वार्थ हाच त्यांचा मुख्य उद्देश आहे. असे लोक तेव्हाच काम करतात जेव्हा त्यांच्या शरीरावर काही तरी आधार असतो आणि ते तेवढेच काम करतात जेवढे त्यांना नेमून दिलेले असते ते हे लोक नाहीत त्यांना विश्वासपात्र म्हणून घोषित केले जाते, परंतु परमेश्वराला अशा कार्यकर्त्यांची गरज आहे जे विश्वास आणि इमानदारीने आपले कार्य करतात. ते सर्व काही करण्यास तयार व तत्पर असतात. ज्यासाठी त्यांची तयारी केली जाते. अनेक लोक असे आहेत ते जबाबदारीने पार पाडण्यामध्ये अयशस्वी होण्याच्या भीतीने कामाचा स्वीकारच करीत नाहीत. अशाप्रकारे ते उच्च शिक्षणाला वंचित राहतात. जे अनुभवाने त्यांना प्राप्त व्हायचे असते. हे अनुभविक शिक्षण त्यांना अध्ययन करुन किंवा वाचन करुन सुद्धा प्राप्त होऊ शकत नाही किंवा इतर दुसऱ्यांकडून मिळत नाही. मनुष्य परिस्थिती बदलू शकतो परंतु परिस्थिती मनुष्याला बदलू शकत नाही आणि तसे होऊ नये. आम्ही परिस्थितीला असे धरुन ठेवायला हवे की आपल्या कामासाठी ती हत्यार व्हावी. आम्हीच परिस्थितीला नियंत्रणामध्ये ठेवावी. परंतु तिला आपल्यावर नियंत्रण करु देऊ नये. MHMar 398.4

शक्तिशाली ते लोक आहेत ज्यांना परिस्थितीला विरोध केला आहे. जे त्यांना संपविण्यासाठी अडथळे आणतात तेव्हा निकराचा विरोध करुन त्यांनी आणलेले अडथळे ते नाहीसे करतात. अशांना सकारात्मक आशीर्वाद प्राप्त होतो. ते आत्मविश्वास शिकतात. संघर्ष आणि समस्या या सर्व अडथळ्यांमध्ये परमेश्वर त्यांना सहाय्य करतो. यामुळे त्यांची ताकद वाढून त्यांचा विकास होतो. MHMar 399.1

ख्रिस्ताने आपल्याला मर्यादित वेळ आणि मर्यादित सेवा दिली नाही. त्याने आपले कार्य कधी तासांमध्ये मोजले नाही. त्याची वेळ त्याचे हृदय, त्याचे प्राण आणि त्याची शक्ति या सर्व गोष्टी त्याने मानवाच्या भल्यासाठीच वापरल्या. पूर्ण दिवसभर त्याने लोकांच्या सेवेमध्ये परिश्रम करुन थकवा येईपर्यंत कार्य केले आणि रात्री एकांतात शक्तिची याजना केली आणि नम्रतेने विनंती करुन दुसरे दिवसासाठी सामर्थ्याची मागणी पित्याकडे केली. अश्रु ढाळून त्याने मनावासाठी कार्य करण्याचे सामर्थ्य मिळविण्यासाठी स्वर्गाकडे निवेदन पाठविले. या करवी जगातील फसण्या आणि धोकादायक सैतानाच्या युक्त्यांवर यश मिळविण्यासाठी मागणी केली. आपल्या कार्यकर्त्या शिष्यांना तो सांगत असे, “कारण जसे मी तुम्हाला केले तसे तुम्हीही करावे म्हणून मी तुम्हांला कित्ता घालून दिला आहे.” (योहान १३:१५). MHMar 399.2

“ख्रिस्ताची प्रीति” पौल म्हणते, “आम्हांला जखडून टाकते.” (२ करिथ ५:१४). हाच त्याच्या प्रोत्साहनाचा सिद्धांत होता. त्याच्या उद्देशाची शक्ति होती. जर एका क्षणासाठी तो आपले कर्तव्य विसरला असता तरी वधस्तंभावर कंबर कसून पुढे जाण्यासाठी त्याला शक्ति प्राप्त झाली असती. आपल्या बांधवांसाठी ख्रिस्ताने त्यांच्या प्रीतिसाठी कष्ट करुन स्वत:ला निर्धारित ठेवले होते. MHMar 399.3

त्याची विनंती किती उत्साही आणि स्पर्श करणारी होती. “आपला प्रभु येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हाला माहीत आहे, तो धनवान असता तुम्हाकरिता दरिद्री झाला. अशा हेतूने की त्याच्या दरिद्रयाने तुम्ही धनवान व्हावे.” (२ करिथ ८:९). आपल्याला ती उंची ठाऊक आहे ज्या उंचीवरुन खाली उतरुन अपमानाच्या खोल दरीमध्ये आला. बलिदानाच्या वाटेवरुन जात असता प्राण जाईपर्यंत त्याचे पाय मुळीच डगमगले नाही. स्वर्गीय सिंहासन आणि वधस्तंभामध्ये त्याच्यासाठी विश्रांती मुळीच नव्हती. त्याने अविरत कष्ट केले. मानवाच्या प्रीतिसाठी त्याने येणायो अपमनाचे स्वागत केले. तसेच त्याने दुर्व्यवहार सहन केले. पौल आम्हाला आग्रह करतो की, “तुम्ही कोणीही आपलेच हित पाहू नका तर दुसऱ्याचंही पाहा. अशी जी चित्तवृत्ति प्रभु येशूच्या ठायी होती ती तुमच्याही ठायी असो. तो देवाच्या स्वरुपाचा असूनही देवाच्या बरोबरीचा असणे हा लाभ आहे. असे त्याने मानले नाही, तर त्याने स्वत:ला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरुपाचे होऊन दासाचे स्वरुप धारण केले आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रगट होऊन त्याने मरण आणि तेही वध स्तंभावरचे मरण सोसले. येथपर्यंत अज्ञापालन करुन त्याने स्वत:ला लीन केले.” (फिलिपैर २:४-८). MHMar 400.1

पौल या गोष्टीसाठी अति व्याकुळ होता की ख्रिस्ताचा दीनपणा अति खोलातून पाहणे आणि अनुभवाची जाणीव करुन घ्यावी. तो कबूल करतो की मनुष्याला स्वर्गीय सम्राटाच्या अद्भुत बलिदानाला समजण्यासाठी मार्गदर्शन केले तर हृदयातील स्वार्थ समाप्त होईल. प्रेषित एकेक मुद्दांवर थांबून थांबून जोर देत सांगतो की आम्ही काही मर्यादेपर्यंतच पायांना उद्धारकर्त्याच्या स्वर्गापासून ते वधस्तंभापर्यंत त्याचे नम्रपणा समजावण्याचे प्रयत्न करु शकतो. सर्वप्रथम पौल आपल्याला स्वर्गामध्ये पित्याच्या आसनावर ख्रिस्ताला प्राप्त झालेल्या सन्मानाकडे घेऊन जातो व सांगतो की तो आपल्या स्वर्गातील गौरवाचा त्याग करुन स्वइच्छेने मानवाच्या उद्धारासाठी मानवाची दीन हीनता स्वीकारुन आला. त्याने एका दासाचे स्वरुप धारण केले. सर्वांत घृणास्पद, बदनाम व अत्यंत पीडादायक व यातनादायक मृत्यु येईपर्यंत पित्याशी आज्ञाधारक राहिला. काय आम्ही धन्यवाद विना आणि प्रेमाविना परमेश्वराच्या या अनोळखी प्रेमाचे प्रदर्शन आणि त्याच्या सत्यवचनाच्या खोलीची जाणीव होते का ? आम्ही त्याला ओळखत नव्हतो त्या आधीपासून त्याने आमच्यासाठी इतका त्याग केला आहे. तसेच आम्ही आमचे स्वत:चे नाही यावर कोणी विचार केला आहे काय ? अशा गुरुची सेवा स्वार्थ आणि अनैच्छिकतेने केली जाऊ शकत नाही. MHMar 400.2

पेत्र म्हणतो, “तुम्हाला ठाऊक आहे, कारण वाडवडिलांच्या परंपरेने चालत आलेल्या तुमच्या निरर्थक वागणुकीपासून सोने, रुपे अशा नाशवंत वस्तूंनी नव्हे तर निष्कलंक, निर्दोष कोकरा येशू ख्रिस्त याच्या रक्ताने तुम्ही मुक्त झाला आहा.” (१ पेत्र १:१८-१९). जर सोने आणि चांदीने मनुष्याची मुक्तता झाली असती तर हे काम त्यांच्यासाठी किती सोपे झाले असते. तो म्हणू शकला असता की, “रुपे माझे आहे, सोने माझे आहे.” (हगय २:८). परंतु पायाचा उद्धार केवळ परमेश्वराच्या पुत्राच्या रक्ताकरवीच शक्य होऊ शकतो. ते लोक जे या अद्भुत बलिदानाची अवहेलना करतात आणि ख्रिस्ताच्या सेवेपासून स्वत:चा बचाव करतात ते आपल्याच नाशाला कारण होऊन त्यांचा नाश होईल. MHMar 401.1