आरोग्यदायी सेवा

162/172

चुकीच्या वेळी सहनशीलता

आमच्याबरोबर करण्यात येणारे वास्तविक किंवा काल्पनिक दूर वर्तनासाठी त्रागा करण्याची जबाबदारी घेऊ शकत नाही. स्वार्थच आमचा मुख्य शत्रु आहे. याचेच आम्हाला अधिक भय वाटायला हवे. कोणत्याही प्रकारच्या वाईट पणाचा आमच्या चरित्र्यावर इतका भयप्रद प्रभाव पडत नाही. परंतु पवित्र आत्म्याचे नियंत्रण आमच्यावर व आमच्या इच्छा व वासनांवर जास्त प्रभाव पडतो. आमचा कोणताही विजय इतका किमती नसतो, जितका स्वाथीवर विजय मिळविणे मौल्यवान आहे. MHMar 383.1

आम्ही आपल्या भावनांना सहजपणे जखमी करु नये. आत्मे वाचविण्यासाठी आम्हांला जगायचे आहे. आपल्या भावना किंवा श्रीमंती वाचविण्यासाठी नाही. जेव्हा आम्ही आत्म्यांचा उद्धार करण्यासाठी मन लाऊन कार्य करण्यासाठी एकत्र येतो तेव्हा आपसातील लहान मोठे मतभेद विसरुन जातो. इतर लोक आमच्या विषयी जे काय विचार करतात किंवा वर्तन करतात त्यामुळे आमच्या मधील असणारे ऐक्य भंग पावणार नाही. “कारण पाप केल्याबद्दल मिळालेले ठोस तुम्ही निमूटपणे सहन केल्यास त्यात काय मोठेपणा ? पण चांगले केल्याबद्दल दुःख भोगणे व ते निमूटपणे सहन करणे हे देवाच्या दृष्टीने उचित आहे.” (१ पेत्र २:२०). MHMar 383.2

उलटून कोणावर हल्ला करु नका. होईल तितके आपणाकडून सर्व चुकीच्या समजूतिपासून दूर राहा. आपल्याकडून वाईटपणा दाखवूही नका. आपल्या सिद्धांताचा बळी न देता इतरांना शांत करण्याचा आटोकोटा प्रयत्न करा.” ह्यास्तव तू आपले दान अर्पिण्यास वेदीजवळ आणीत असता आपल्या भावाच्या मनात आपल्या विरुद्ध काही आहे असे तुला स्मरण झाले, तर तेथेच वेदीपुढे आपले दान तसेच ठेव आणि निघून जा. प्रथम आपल्या भावाबरोबर समेट कर, मग येऊन आपले दान अर्पण कर.” (मत्तय ५:२३२४). MHMar 383.3

जर कोणी आपल्याला रगाने मोठ्या आवाज काही विचारले तर त्याच आवाजात आपण कधीच उत्तर देऊ नये हे लक्षात ठेवा. कारण, “मृदु उत्तराने कोपाचे निवारण होते. कठोर शब्दाने क्रोध उत्तेजित होतो.” (नीतिसूत्रे १५:१). आणि शांतीमध्ये अदभुत शक्ति आहे. जी व्यक्ति रागामध्ये आहे. तिला उत्तर दिल्यास ती अधिक भडकतो. परंतु रागाशी सामना करायचा असल्यास शांत राहणे व गप्प बसणे हाच सर्वोत्तम उपाय आहे. सहनशीलता बाळगल्यास राग लवकर मावळतो व तंटा उपस्थित होत नाही. MHMar 384.1

चुका शोधणाऱ्या आणि बोचणाऱ्या शब्दाच्या वादळामध्ये परमेश्वराच्या वचनामध्ये स्थिर रहा. हृदय आणि बुद्धी परमेश्वराच्या अभिवचनाने भरा. जर आपल्याबरोबर दुर्व्यवहार होत असेल, चुकीचे दोष लावले जात असतील तर रागाने उत्तर देण्याऐवजी परमेश्वराची अमोल वचने परत परत म्हणा. MHMar 384.2

“वाईटाने जिंकला जाऊ नको तर बऱ्याने वाईटाला जिंक.” (रोम १२:२१) MHMar 384.3

“आपला जिवीत क्रम परमेश्वरावर सोपवून दे, त्याच्यावर भाव ठेव म्हणजे तो तुझी कार्यसिद्धी करील.” (स्तोत्र संहित ३७:५-६). MHMar 384.4

“जे उघडे होणार नाही असे काहीही झाकलेले नाही व जे कळणार नाही असे काहीही गुप्त नाही.” (लूक १२:२). MHMar 384.5

“तू मनुष्याला आमच्या डोक्यावरुन स्वारी करायला लावीले आम्ही अग्नि व पाण्यात सापडलो, तरी तू आम्हांस बाहेर काढून समृद्ध स्थळी आणिले.” (स्तोत्र ६६:१२). MHMar 384.6

आम्ही येशू ऐवजी इतरांकडून सहानुभूती व सहाय्याची अपेक्षा करतो. परमेश्वर आपली दया व प्रतिज्ञा करवी असे घडू देतो म्हणजे ज्यांच्यावर आम्ही विश्वास ठेवला त्यांनी आम्हांला धोका दिला यामुळे आम्ही मनल्यावर विश्वास ठेवण्याच्या चुका समजू शकू. चला तर आपण पूर्णपणे नम्रतेने आणि नि:स्वार्थी भावनांनी केवळ परमेश्वरावरच विश्वास ठेऊ या. परमेश्वर आमच्या त्या खोल दुःखी भावना समजू शकतो ज्या आम्ही सहन करीत आहोत, परंतु त्यांचे वर्णन करु शकत नाही. जेव्हा सर्व काही अंधुक आणि वर्णन करण्या पलिकडे जाते आपण पुढील शब्दांनी ख्रिस्ताची आठवण करु या. “येशूने म्हटले जे मी करतो ते तुम्हांला आता समजणार नाही. नंतर समजेल.” (योहान १३:७). MHMar 384.7

योसेफ आणि दानिएलाच्या इतिहासाचा अभ्यास करा. प्रभुने त्यांना त्यांच्या विरुद्ध कट रचणाऱ्या लोकांना रोखले नाही. परंतु त्यांच्या भक्तां विरुद्ध कट रचणाऱ्यांचे कट उधळून लावले. कारण कसोटीमध्ये संघर्ष करणाऱ्यासाठी चांगल्यामध्ये रुपांतर केले. MHMar 385.1

जोपर्यंत आम्ही या जगामध्ये आहोत आम्ही विरोधी प्रभावांशी संघर्ष करीत आहोत. आमचा राग पाहण्यासाठी परीक्षा घेतली जात आहे कारण योग्य भावनांचा वापर करण्यानेच ख्रिस्ती सद्गुणांचा विकास होतो जर ख्रिस्त आमच्यामध्ये वास करीत आहे तर आम्हाला राग येण्यासाठी उत्तेजित करण्यात येते तर अशावेळी आम्ही धीर, दयाळूपणा आणि सहनशील राहिलो तर ख्रिस्ताचे गुण आमच्यामधून दिसून येतील. अशापकारे दिवसे न् दिवस व वर्षे न् वर्षे आपण स्वत:वर विजय मिळवित जाऊ आणि स्वर्गीय साहसामध्ये वाढत जाऊ. हेच कार्य आम्हांवर सोपविले गेले आहे, परंतु हे कार्य येशूचे सहाय्य. त्यांचा दृढ संकल्प निरंतर सावधानी आणि सततच्या प्रार्थनांशिवाय हे कार्य पूर्ण हाऊ शकत नाही, प्रत्येकाला एक व्यक्तिगत लढाईच्या मैदानातून पळ काढतात ते लढाईला लागणारी शक्ति आणि विजय मिळविण्याचा आनंद गमावून बसतात. MHMar 385.2

आम्हांला आपल्या कसोटीच्या समस्यांचा, दःखांचा आणि अपयशांचा हिशोब ठेवण्याची गरज नाही. कारण या सर्व गोष्टी स्वर्गीय पुस्तकामध्ये लिहून घेतल्या जातात. त्याची काळजी स्वर्गात घेतली जाते. जेव्हा आम्ही असहमतीच्या गोष्टी मोजतो. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याविषयी विचार करताना आनंद वाटतो जसे दरवेळी आमच्या भोवती असणारी परमेश्वराच्या अनुग्रहाची दया, त्याची कृपा आणि त्याची आम्हावरची प्रीति जी पाहून देवदूतांनासुद्धा नवल वाटते. त्यांना नवल वाटते की पतन पावलेल्या मनुष्यासाठी परमेश्वराने आपल्या एकुलत्या एका पुत्राचे बलिदान दिले. जर आम्ही ख्रिस्ती सेवक आहोत तर आपणास भासते की आमच्या वाट्याला आलेल्या समस्या आणि दुःखे इतरांपेक्षा जास्तच आहेत. तेव्हा लक्षात ठेवा की तुमच्यासाठी राखून ठेवण्यात आलेली शांति मोठी आहे. याकरिता ते लोक अज्ञान आहेत जे ओझे उचलण्यासाठी मागे-पुढे पाहतात. ख्रिस्ताच्या सेवेमध्ये आनंद आणि शांति आहे. जगाला हे दाखवून द्या की ख्रिस्ताबरोबरचे जीवन व्यर्थ नाही, परंतु त्यामध्ये यश आहे, आनंद व सुख आहे. या जगात शांति नसली तरी अंत:करणाची शांति आहे. आपल्या भावना विषयी विचार करु नका. दुसऱ्यांच्या जीवनामध्ये अंधार करु नका. एक थंड आणि आनंद नसलेला धर्म कधीच कोणत्याही व्यक्तिला ख्रिस्ताकडे आकर्षित करु शकत नाही. तर परमेश्वरापासून दूर जाऊन सैतानाच्या मोहक जाळ्यामध्ये असे लोक फसले जातात. अशाप्रकारे भरकटत जाणाऱ्यांना आपल्या जाळ्यात अडकविणे सैतानाला खूप सोपे असते. आपल्या हताश आणि निराशजनक भावनांचा विचार सोडून त्या शक्ति विषयी विचार करा जी येशू ख्रिस्ताकडे आहे. ती शक्ति आपणास मिळू शकते. आपले विचार आणि बुद्धी न पाहिलेल्या गोष्टींवर स्थिरावली पाहिजे. आपले विचार परमेश्वराच्या त्या महान प्रीतिवर आणि प्रीतिच्या पुराव्यावर स्थिर व्हायला हवे की त्याने आपला पुत्र देऊन आपल्यावरील प्रीति त्याने व्यक्त केली. कष्ट व दु:खाला विश्वास सहन करु शकतो परीक्षा आणि समस्यांचा सामना करु शकतो. निराशेमध्ये धीर धरु शकतो कारण येशू जिवंत देव आहे तो आपल्या बाजूनी वकीली करु शकतो. त्याच्या मध्यस्थिने जे काय प्राप्त होते ते सर्व आमचे आहे. MHMar 385.3

ख्रिस्त आपला सन्मान करतो याचा आपण विचार करीत नाही काय ? कारण जे कोणी पूर्णपणे त्याच्यासाठी जगतात तो पूर्णपणे त्यांचाच आहे. आपण हा विचार करीत नाही का की जे योहानासारखे कठीण अवस्थेमध्ये जीवन जगत आहेत त्यांना तो भेटी देतो. परमेश्वर आपल्या कोणत्याच भक्ताला जो खरेपणे त्याचे कार्य करण्यासाठी खडतर कष्ट करतो त्याला जो कठीण समस्यांशी एकटाच संघर्ष करण्यासाठी सोडत नाही. अशांना परमेश्वर अनमोल हिऱ्यांसारखे जपतो. कारण अशांचे जीवन ख्रिस्तामध्ये लपलेले असते. अशांसाठी तो म्हणतो, “मी तुला घेऊन मुद्रेच्या अंगठीसारखे करीन कारण मी तुला निवडले आहे असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. (हगया २:२३). MHMar 386.1

प्रभुच्या प्रतिज्ञेची चर्चा करा. आपल्याला आशीर्वाद देणाऱ्या येशूविषयीची चर्चा करा. आपला प्रभु आपल्याला एक क्षणभरही विसरत नाही. मतभेदाच्या परिस्थितीमध्ये सुद्धा आपण आत्मविश्वासाने त्याच्या प्रीतिमध्ये विश्राम करु शकतो. आणि स्वत:ला त्याच्यामध्ये लपवू शकतो. त्याच्या उपस्थितिची जाणीव आमच्या जीवनामध्ये एक खोल आणि शांतिदायक आनंद देतो. ख्रिस्ताने आपल्या विषयी सांगितले. “जेव्हा तुम्ही मनुष्याच्या पुत्राला उंच कराल तेव्हा तुम्हाला समजेल की तो मी आहे आणि मी आपण होऊन काही करीत नाही तर मला पित्याने शिकविल्याप्रमाणे ह्या गोष्टी बोलतो. ज्याने मला पाठविले तो माझ्याबरोबर आहे. त्याने मला एकटे सोडिले नाही. कारण त्याला जे आवडते ते मी सर्वदा करितो. त्यामुळे तो प्रसन्न होतो.” (योहान ८:२८-२९). MHMar 386.2

पित्याच्या उपस्थितिने ख्रिस्ताला घेरले आणि त्याच्याबरोबर केवळ तेच घडले जे जगाला अनंत कालिन प्रीति मिळण्याची त्याची योजना होती. जगाला मुक्तिचा आशीर्वाद मिळण्याचा उद्देश होता तो पूर्ण होणार होता. त्याच्या सान्तवनाचे उगम परमेश्वरामध्ये होते. आणि आम्हामध्येही तेच आहे. जी व्यक्ति ख्रिस्ताच्या आत्म्याने भरली आहे तो ख्रिस्तामध्येच राहतो. जो कोणी त्याच्याकडे येतो तो मुक्तिदात्याकडून येतो. ज्याला तो आपल्या उपस्थितीने घेरलेले असते. प्रभुच्या परवानगीशिवाय त्याला कोणीच स्पर्श करु शकत नाही. आमचे सर्व कष्ट व राग, आमच्या सर्व समस्या व परीक्षा. आमची सर्व दुःखे आणि पीडा आमचा सर्व एकाकीपणा व छळ. एकूण या सर्व गोष्टी आमच्या चांगल्यासाठीच आहेत. हे सर्व अनुभव आणि परिस्थिति परमेश्वराच्या हातची कृत्ये आहेत. या करवी आमच्यामध्ये चांगले निष्पन्न होते. MHMar 387.1

जर आम्हाला परमेश्वरा करवी मिळालेल्या धैर्याची जाणीव झाली तर आम्ही इतरांना दोष लावणे आणि बरे वाईट बोलणारे दिसणार नाही. जेव्हा ख्रिस्त या जगामध्ये होता तेव्हा त्याच्या सोबत असणारे, ओळखीचे किंवा सतत त्याच्याबरोबर असणारे त्यांनी ख्रिस्ताला कधीच कोणाला काही दोष लावल्याचे ऐकले किंवा पाहिले नाही. याबद्दल त्यांना नवल वाटत असे. तेव्हा चला आपणही त्यांच्याशी अशाच प्रकारचे प्रीतिचे वातावरण निर्माण करुन त्यांच्याशी स्नेह वाढवू या कारण आम्हालाही ख्रिस्ताचे अनुयायी बनायचे आहे. MHMar 387.2

“बंधुप्रेमाच्या बाबतीत एकमेकांना खरा स्नेहभाव दाखवा, तुम्ही प्रत्येक जग दुसऱ्याला आदराने आपणापेक्षा थोर माना.” (रोमकारास १२:१०). MHMar 387.3

“वाईटाबद्दल वाईट, निंदेबद्दल निंदा असे करु नका. तर उलट आशीर्वाद द्या. कारण आशीर्वाद हे वतन मिळण्यासाठी तुम्हाला पाचारण करण्यात आले आहे.” (१ पेत्र ३:९). MHMar 388.1

प्रभु येशूची इच्छा आहे की आम्ही प्रत्येकाच्या अधिकारचा सन्मान करावा. ख्रिस्ती या नात्याने प्रत्येकाच्या अधिकारांची काळजी घेणे आवश्यक आहे. सर्वांशी सन्मानाने आणि गोडीने राहणे आवश्यक आहे. कारण आपण परमेश्वराची मुले आहोत. MHMar 388.2

ख्रिस्तीपणा एका मनुष्याला सज्जन बनवू शकतो. येशू ख्रिस्ताचा छळ करणाऱ्यांवर त्याने त्यांच्यावर दया दाखविली, त्यांच्यावर प्रीति केली. आणि त्याचे खरे अनुयायी सुद्धा तशाच भावना ठेवतील. पौलाला पाहा जेव्हा शासना समोर उभे केले तेव्हा अग्रिपासमोर त्याचे प्रवचन एक सत्य शालीनता आणि समजणारा कुशल व्यवहाराचा एक आदर्श नमुनाच होता. सुवार्ता प्रसार हा जगासारखा दिखावटपणाचा नसतो, परंतु अशी दया निर्माण होते जी दया दयाने भरलेल्या खऱ्या हृदयातून बाहेर येते. MHMar 388.3

केवळ वर-वर बोलून जीवनातील कडवटपणा चिडचिड किंवा वाईट अनुभवातून बाहेर आणण्याचे प्रयत्न काही कामाचे नाही, तर जोपर्यंत आमच्या जीवनातील स्वार्थ सर्वात वर आहे तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये खरी सुधारणा कधीच येणार नाही. आपल्या हृदयात प्रेमाचा वास असणे आवश्यक आहे. एक खरा ख्रिस्ती आपल्या कार्याच्या उद्देश्याने आपल्या स्वामीच्या खोल प्रेमाने आपले हृदय तपासून पाहतो. ख्रिस्तासाठी त्याच्या अतीव प्रेमामुळे तो आपल्या बांधवांसाठी नि:स्वार्थी प्रेमाने भरुन जातो. प्रेमाने भरलेले जीवन मनुष्याला सभ्यता अनुग्रह आणि चांगले आचरण प्राप्त होते. त्याची बौद्धिक व नैतिक पातळी उंचावते आणि यामुळे पुर्ण जीवनात सुधारणा घडून येते. MHMar 388.4

वास्तविकता मोठे बलिदान आणि मोठ्या उपलब्धतेने जीवन बदलत नाही, परंतु छोट्या-छोट्या गोष्टींनीच त्यामध्ये बदल घडून येतो. तसे पाहता या छोट्या मोठ्या गोष्टींनीच मोठ मोठी चांगल्या किंवा वाईट गोष्टी घडून येतात. छोट्या छोट्या वाईट गोष्टी जीवनात आल्यानेच वाईट वळण लागते, मग पुढे मोठ्या वाईट गोष्टींचे वळण लागते. आमच्या जीवनामध्ये येणारे लहान मोठ्या अपयशामुळे आपण बिघडतो आणि वाईट चरित्र्य घडते कारण जेव्हा कसोटी येते तेव्हा तोंड देण्यासाठी आपण तयार नसतो. रोजच्या जीवनातील येणाऱ्या परीक्षामध्ये केवह सिद्धांतानुसारच कार्य करण्याच्या सवयींमुळे सर्वात धोका आणि कठीण परिस्थितीला निकाराने तोंड दिल्यास आणि विरुद्ध परिस्थितीमध्ये त्या विरुद्ध दृढ निश्चयाने ठाम उभे राहिल्यास आपणास शक्ति प्राप्त होते. MHMar 388.5

आपण कधीही एकटे नाही मग आपण त्याची निवड करा किंवा करु नका, परंतु आपल्या जवळ एक साथीदार असतोच. लक्षात ठेवा कि आपण कोठेही असा आणि काहीही करीत असाल, आपल्या बरोबर परमेश्वर आहे. आपण जे काय करु आणि कोणताही विचार करु परंतु त्याच्यापासून काहीच लपून राहत नाही. आपला प्रत्येक शब्द व प्रत्येक कार्य चांगले असो की वाईट असो परमेश्वर त्याचा साक्षी आहे. त्याला वाईटाचा वीट आहे म्हणून आपण जे बोलू जो विचार करु हे ठरवूण करा हे पक्के लक्षात ठेवा. ख्रिस्ती या नात्याने आपण स्वर्गीय राज्याचे सदस्य आहोत हे लक्षात ठेवा. असे कोणतेही कामे करु नका व योजना बनवू नका की ज्यामुळे देवाला वाईट वाटेल. MHMar 389.1

“जे उत्तम नाव तुम्हाला प्राप्त झाले आहे त्याची निंदा तेच करतील किंवा नाही.” (याकोब २:७). MHMar 389.2

सावधगीरीने ईश्वरीय आणि मनाविय चरित्र्याचे अध्ययन करा आणि सतत स्वत:ला विचारीत राहा कि “जर माझ्या जागी ख्रिस्त असता तर त्याने काय केले असते ?’ आपल्या कर्तव्याचा मुख्य हेतु हाच असावा. तो आपला मापदंड असावा. स्वत:ला अनावश्यक रुपाने अशा संगती करु नका की ज्यामुळे तुम्ही करीत असलेल्या चांगल्या कार्यामध्ये अडथळे येतील किंवा तुमचे मित्र आपल्या नकळत वाईट कर्मे करण्यास प्रवृत्त करतील. आपले उद्देश कमकुवत करुन आपला विवेक डागाळतील. अनोळखी लोकांमध्ये, रस्त्यात किंवा परक्या ठिकाणी असे कोणतेच काम स्वीकारु नका ज्याचे परिणाम वाईट होती. तुमचे जीवन जे ख्रिस्ताने आपले रक्त सांडून तुम्हास विकत घेतले आहे ते तुमचे चरित्र्य मळीण होऊ नये म्हणून रोज त्याची काळजी घेत चला. आपले जीवन सजवा ते उत्तम बनवा. MHMar 389.3

नेहमी सिद्धांतावर प्रेरित होऊन कार्य करा. भावनांमध्ये वाहवत जाऊन कोणतेच काम करु नका. आपल्या प्राकृतिक उतावळेपणाला नम्रता व सभ्यतेने नियंत्रण करा. तुच्छ आणि हीन गोष्टींपासून दूर राहा. त्यामध्ये कधीच फसू नका. आपल्या मुखातून वायफल शब्द कधीच येऊ देऊ नका. एवढेच नाही परंतु आपल्या विचारांनासुद्धा भरकटू देऊ नका. तुमच्या वायफळ विचारांवर नियंत्रण ठेऊन त्यांना ख्रिस्ताच्या अधीनतेखाली आणण्याचे शिका, तसे वळण लावा. आपले विचार पवित्र गोष्टींवर केंद्रित करा. असे केल्यावर ख्रिस्ताच्या कृपेने आपले विचार शुद्ध व पवित्र होतील. MHMar 389.4

शुद्ध विचारांना शक्ति देणाऱ्या जाणीवेची आम्हांला सतत गरज आहे. कोणत्याही प्राण्याची सुरक्षा केवळ योग्य विचारामध्येच आहे. जसे एक मनुष्य “कारण तो आपल्या मनात घास मोजणाऱ्या सारखा आहे आपणही तसेच आहोत. (नीतिसूत्रे २३:७). आत्मनियंत्रण शक्तिचा सराव केल्यानेच असले विचार नियंत्रणात राहतात. सुरुवातीला जी गोष्ट कठीण वाटते, परंतु जो पर्यंत योग्य विचार आणि योग्य कार्य करण्याची सवय लागत नाही तोपर्यंत वाईट व देवाला न आवडणारे विचार मनातून ताबोडतोब काढून टाकण्याची सवय सोडू नका. आपली इच्छा असेल तर हलके व हीन विचारापासून मुक्ति मिळवू शकता. यामुळे मनुष्यापासून प्रेरणा आणि येशूपासून प्रेम मिळवू शकता. MHMar 390.1

इतऱ्यांच्या बाबतीत चांगले बोलण्याची सवय लावून घ्या. ज्यांच्या संपर्कात आपण येतो त्यांचे शुभचिंतक व्हा. त्यांच्या विषयी चांगले बोला. त्यांच्या चुका आणि कागाळ्यांकडे दुर्लक्ष करा. एखाद्या विषयी काही तक्रार करण्याची वेळ तुमच्यावर आलीच तर त्यांचे दुर्गण न काढता चांगल्या गुणाविषयीच बोला. धन्यवादी बनण्याची स्वत:वर सवय लावून घ्या. परमेश्वराचे आभार माना की त्याने आमच्या पापांची क्षमा केली आहे. व पापापासून आमची मुक्तता करण्यासाठी त्याने स्वत:च्या पुत्राला दिले. आमच्या तक्रारीने कोणाचेच भले होत नाही. परमेश्वर आपल्याला त्याची दया व अनमोल प्रीतिविषयी विचार करण्यासाठी पाचारण करीत आहे. म्हणजे आम्हांला त्याची स्तुति करण्याची प्रेरणा मिळेल. एका उत्साही कार्यकर्त्या जवळ इतरांच्या चुकांच्या बाबतीत चर्चा करण्यासाठी वेळ मिळत नाही. दुसऱ्यांच्या चुका आणि त्यांच्या अपयशाचा कचऱ्यामध्ये जगणाऱ्यांचे कधीही चांगले होत नाही. ती जबाबदारी चांगले लोक उचलत नाहीत. वाईट बोलणे हे दोन प्रकारचे शाप आहेत. हे ऐकणाऱ्यांपेक्षा बोलणाऱ्यांना अधिक भार पडते. असे बोलणारे कलह व मतभेद निर्माण करतात. ते त्याचे बीज पेरतात व तो स्वत: आपल्या जीवनात त्याची कापणीही करतो. ते नाशास कारणीभूत होते. इतरांमध्ये वाईट कामे पाहाणारालाच वाईट कर्माची सवय लागते. त्यांच्यामध्ये वाईटपणा विकसित होतो. इतरां बाबतीत चर्चा करणारे त्यांच्यासारखेच बनतात, परंतु येशू विषयी विचार करणे त्याचे प्रेम आणि चरित्र्य बाबतीत सिद्धांता विषयी बोलत राहिल्याने आम्ही त्याच्यासारखे बनत जातो. परमेश्वराने जे उत्तम विचार आमच्यासमोर मांडले आहेत त्यावरच विचार करीत राहिल्यास आपण त्याच्या उपस्थितीमध्ये जातो जेव्हा आपण परमेश्वराच्या उपस्थितिमध्ये सतत राहात गेल्यास आपल्या मधून असा प्रकाश येतो जो त्याच्या संपर्कात येतो तोही प्रकाशित होतो. MHMar 390.2

इतरांविषयी वाईट चिंतीने किंवा त्यांची आलोचना करण्याऐवजी असे म्हणा, “मला माझ्या स्वत:च्या उद्धाराचे कार्य पूर्ण करायचे आहे जो माझे तारण करणार आहे. त्याला मला सहकार्य करायचे आहे. त्यासाठी मला स्वत:ला अति सावध राहायचे आहे. मला आपल्या जीवनामधील प्रत्येक वाईटपणा काढून टाकायचा आहे. मला माझ्यातील प्रत्येक दोषावर विजय प्राप्त करायचा आहे. ख्रिस्तामध्ये मला एक नवी सृष्टी तयार करायची आहे आणि जे लोक त्यांच्यातील वाईटावर विजय मिळविण्यासाठी संघर्ष करीत आहेत त्यांना सहकार्य करायचे आहे. त्यांना उत्साहवर्धक शक्ति मिळविण्यास सहाय्य करायचे आहे.” MHMar 391.1

आम्ही एकमेकांविषयी अधिक प्रमाणात नाराजच असतो. आम्ही अनेकदा हे विसरुन जातो की आमच्या सहकाऱ्यांना सुद्धा सहनुभूति आणि सांत्वनाची गरज असते. तेव्हा त्यांच्यासाठी नेहमीच सहनुभूति आणि सांत्वन देण्याची तयारी दाखवा. त्यांच्यामध्ये रुचि दाखवा. प्रार्थना करवी त्यांना धीर द्या. त्यांना सहाय्य करा आणि त्यांना सांगा की तुमच्यासाठी आम्ही प्रार्थना करीत आहोत. MHMar 391.2

जे ख्रिस्ताचे कार्यकर्त किंवा स्वत:ला सेवक म्हणवितात ते सर्वच ख्रिस्ताचे खरे सेवक नसतात. जे लोक त्याचे नाव घेतात एवढेच नाही परंतु मंडळीमध्ये कामही करतात त्यामध्ये असेही लोक असतात की ख्रिस्ताच्या चारित्र्याचे प्रतिनिधित्व करीत नाहीत. असे लोक ख्रिस्ताच्या सिद्धांताचा वापर करीत नाहीत. ख्रिस्ताची शिकवण ते नाकारतात. त्यांच्यामुळेच मंडळीमध्ये जे नवीन लोक आलेले असतात ते दु:खी होतात, निराश होतात. ख्रिस्ती लोकांविषयी त्यांनी जे ऐकले होते ते अशा लोकांमुळे अगदी उलट अनुभव त्यांना येतो, परंतु यामुळे कोणी भरकटून जाण्याची गरज नाही कारण ख्रिस्ताने सांगितले आहे की आम्ही त्याच्यामागे चालावे आणि तो स्वत:च एक उत्तम नमूना आहे. MHMar 391.3

काळाच्या ...... गव्हाबरोबर निदन सुद्धा गोळा केले जाते. जेव्हा शेत मालकाच्या चाकरांनी उत्साहाने सांगितले की आम्ही हे निदन उपटून फेकून देऊ तेव्हा धनी त्यांना म्हणाला, “नाही तुम्ही निदन गोळा करीताना त्याबरोबर कदाचित गहूही उपटाल. कापणी पर्यंत दोन्ही बरोबर वाढू द्या. मग कापणीच्या वेळेस मी कापणाऱ्यास सांगेन की पहिल्याने निदन गोळा करा, जाळण्यासाठी त्याच्या पेंढ्या बांधा. गहू मात्र कोठारात साठवा. (मतय १३:२९-३०). MHMar 392.1

परमेश्वराची दया आणि सहन शक्ति इतकी अफाट आहे की हट्टी आणि खोट्या हृदयाच्या लोकांना तो सहन करतो. ख्रिस्ताच्या निवडलेल्या शिष्यांमध्ये त्याला धरुन देणारा यहूदा इस्कारियत सुद्धा होता आणि आजही मंडळ्यामध्ये यहूदासारखे लोक आहेत म्हणून देवाच्या लोकांनी नाराज व्हायचे का ? जर हृदये जाणणारा येशू लोकांना सहन करु शकतो त्याला ठाऊक होते की यहूदा आपल्याला धरुन देणार आहे. तेव्हा आपणही किती धीराने अशा प्रकारच्या लोकांचे सहन केले पाहिजे. जे लोक मंडळीमध्ये खोटेपणा करतात, चूका करतात त्यांच्या चुका सुधारण्याचे प्रयत्न करावेत. MHMar 392.2

आणि सर्वच तसे नसतात. यहूदासारखे दिसणारे सर्वच खोटे फसवे नसतात. जे लोक फसवे खोटे दिसतात वाटतात, पण सर्वच तसे नसतात. MHMar 392.3

येशूचा शिष्य पेत्र उत्साही, आत्मविश्वासी व प्रसंगी बदलणारा असा होता. तसे पाहता तो यहदापेक्षा धोकादायक होता. ख्रिस्ताने त्याला अनेकदा समजही दिली होती. परंतु त्याच्या जीवनाची सेवा व त्याच्या त्यागाविषयी विचार केला तर पेत्र किती उपयोगाचा होता हे आपणास ठाऊकच आहे. परमेश्वराच्या धीराचे व महान साक्षीचे उदाहरण आपणासमोर आहे. त्याच्या धीराचा हा अनुग्रह आहे. हा त्याचा महिमा आहे. जितके शक्य आहे तर आम्हीसुद्धा त्याच्यासारखेच वर्तन करु शकतो. क्षमा, धीर, उपदेश अशा गोष्टी आपण आत्मसात करु शकतो. जगामध्ये असताना ख्रिस्त आपल्या शिष्यांशी जसे वागत होता तसेच आपणही इतरांशी वर्तन करावे. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपण स्वत:ला आपल्या सहकार्यामध्ये एक कामगार समजा. एका मनुष्याला ख्रिस्तासाठी जितके श्रम करावे लागतात. तितके तो करु शकतो आणि एक प्राणी पापापासून वेगळे होऊन धार्मिकतेकडे वळतो तेव्हा स्वर्गदूतांच्या अस्तित्वामध्ये आनंद माणतो. आम्ही जर एकमेकांशी गैरवर्तणुक करीत आहे हे पाहून देवदूतांना किती दुःख होत असेल याची आपण कल्पना करु शकतो का ? जर येशू ख्रिस्ताने आमच्याशी तसेच वर्तन केले असते जसे आम्ही एकमेकांशी करतो तर काय झाले असते ? तर आम्हाला पापापासून कोणी वाचविले असते ? MHMar 392.4

लक्षात ठेवा की आपण एकमेकांच्या मनात काय चालले आह ते ओळखू शकत नाही, परंतु परमेश्वराला सर्व काही ठाऊक आहे. त्याच्या मागे असणारे उद्देश ज्यांना ठाऊक नाही ते लोक चुकीचा अर्थ काढतात. अनेकजण असे आहेत की ज्यांना उच्च शिक्षण मिळालेले नसते. त्यांचे चारित्र्य विकृत आणि कठोर व ते हट्टी असतात आणि असे वाटते की ते प्रत्येक बाबतीतच ते कुटिल आहेत, परंतु ख्रिस्ताचा अनुग्रह त्यांना बदलू शकतो. अशा लोकांना आपल्यापासून वेगळे कधीच करु नका. त्यांना कधी निराश करु नका व म्हणू नका की “तू मला निराश केले आहे व मी तुला कधीच मदत करणार नाही.” रागाने बोललेले तेच शब्द लक्षात राहतात. परंतु तुमच्याकडे जे सत्य आहे त्याचे ते सुद्धा हक्कदार आहेत. त्यांना सत्य समजले तर ते इतर संबंध सोडून तुमच्याशी जडून राहतील. MHMar 393.1

एक सतत जीवन धैर्या बरोबर सहनशीलतेचा व्यवहार, क्रोधाच्या समयी शांत स्वभाव ठेवणे, नेहमी सर्वांत अधिक निर्णयपूर्ण तर्क आणि विनवणी अशा प्रकारच्या संधी आपणास हे सौभाग्य आपल्याला मिळेल, जे दुसऱ्या बहुतेकांना मिळत नाही, तर अशा गोष्टी लक्षात ठेऊन तुम्ही एक आदर्श, बुद्धीमान, सावध आणि सभ्य शिक्षक बनावे. MHMar 393.2

अंगावर एक स्पष्ट व मजबूत छाप मारण्यासाठी आपण गडबडीत मोठ्या दबावाने ठसा उमटविणार नाही, परंतु सावधपणे आणि शांत मनाने मेणावर ठसा दाबून ठसा स्पष्ट होत नाही तोवर दाबून धरता. मेण थंड झाल्यावरच ठसा उमटल्याची खात्री करुनच तो काढता. अशा प्रकारेच आत्म्यांवर सुद्धा हीच पद्धत अवलंबविली जावी. ख्रिस्ती जीवनाचा इतरांवर निरंतरचा प्रभावच यश प्राप्तिच्या शक्तिचे रहस्य आहे आणि ते आपल्याकडून ख्रिस्ताचे चरित्र्य सततच प्रकट करण्यावर अवलंबून आहे. आपला अनुभव त्यांना सांगून त्यांचे सहाय्य करा. ज्यांनी चुका केल्या आहे त्यांना दाखवून द्या की त्यांना त्या अवस्थेमध्ये सहाय्य करुन चुकांची दुरुस्ती करण्यासाठी त्यांना सहाय्यक झालो अशाप्रकारे त्यांच्याशी व्यवहार करुन त्यांना आपण धीर दिला आहे. MHMar 393.3

न्यायाच्या दिवसापर्यंत तुम्ही अस्थिर, अविवेक आणि अयोग्य व्यक्तिला दाखविलेली दया, इतरांकडे लक्ष देण्याची व त्यांची काळजी करणे या गोष्टी कधीच विसरणार नाही. जेव्हा आमच्या समोर उपकार नसणारे, स्वार्थी, धोका देणारे अशांशी आपली गाठ पडली तर आपण त्यांचा अनादर करतो. त्यांची घृणा करतो. ही त्यांच्या चुकीची शिक्षा आहे. यासाठी ते तयार असतात, परंतु त्यांच्याशी दयापूर्ण सहनशीलतेने वागल्यास त्यांना नवल वाटेल आणि आपल्याशी चांगले व्यवहार करण्याची त्यांची इच्छा निर्माण होईल. MHMar 394.1

“बंधुजनहो कोणी माणूस एखाद्या दोषात सापडला तरी जे तुम्ही आध्यात्मिक वृत्तीचे आहा ते तुम्ही अशाला सौम्यवृत्तीने ताळ्यावर आणा. तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून स्वत:कडे लक्ष द्या. एकमेकांची ओझी वाहा म्हणजे तुम्ही ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल.” (गलती ६:१-२). MHMar 394.2

ते सर्व जे परमेश्वराची संतान असल्याचा दावा करतात त्यांनी लक्षात ठेवावे की मिशनरी या नात्याने त्यांना नाना प्रकारचे व स्वभावाचे लोक भेटातत त्यांच्या संपर्कात येतात यामध्ये सज्जन, शांत स्वभावाचे, तिरसट, शीघ्र कोपी, घंमेडी, हट्टी, धार्मिक, अशिक्षित, अधार्मिक, पदवीधर, अविश्वासू, संशयी, विश्वासू, श्रध्दावान, एकनिष्ठ असे अनेक प्रकारचे आपल्या संपर्कात येतील. यामध्ये गरजवंत असणार व श्रीमंतसुद्धा असतील. या सर्वांशी आपण एकसमान वागू शकणार नाही, परंतु दया आणि सहनुभूतिने सर्वांशी आपण वागू शकतो. एकमेकांच्या या संबंधामध्ये सर्वांमध्ये सुधारणा येऊ शकते. बुद्धीला चमक येते. यासाठी सर्वांनी एकमेकांशी दयाळू आणि सहानुभूतिपूर्ण वागले पाहिजे. तरच एकमेकांचे चांगले संबंध येऊन संबध सुधारतील. MHMar 394.3

स्वर्गाची योजना आहे की आम्ही एकमेकांवर
अवलंबून राहावे आमच्यामध्ये एक स्वामी
सेवक किंवा एक मित्र असावा
एकमेकांना सहाय्य करण्याची ही हाक आहे.
MHMar 394.4

म्हणजे एकाचा कमकुवतपणा ही सर्वांची ताकद होईल. सामाजिक संबंध करवीच ख्रिस्ती जगाच्या संपर्कात लोक आकर्षण होतात. प्रत्येक स्त्रीपुरुष ज्यांना स्वर्गीय प्रकाश मिळाला आहे. त्यांनी अंधारामध्ये राहणाऱ्यांना प्रकाशात आणावे. कारण अनेकजण सध्या उत्तम मार्गासाठी अजाण आहेत. ख्रिस्ताच्या आत्म्याकरवी पवित्र झाल्यावर सामाजिक शक्तिंचा वापर इतर आत्म्यांना ख्रिस्ताकडे आणण्यासाठी करावा. तिचा विकासही करावा. ख्रिस्ती लोकांना मौल्यवान खजिन्याप्रमाणे आत्म्याचे दान लपवू नये किंवा पवित्र व मधूर संपत्तिप्रमाणे केवळ मालकाने एकट्यानेच त्याचा उपभोग घेऊ नये. आम्ही ख्रिस्ताला विहीरीच्या पाण्याप्रमाणे ठेवावे. ज्याची सतत जिवंत पाण्याचा झरा वाहत असतो. आणि त्याच्या संपर्कामध्ये जे येतात त्यांचा जिव ताजातवाना होतो. MHMar 394.5

*****