आरोग्यदायी सेवा

148/172

आत्मत्यागाची गरज

मानवाला सर्वात जास्त धोका स्वतःपासूनच असतो. स्वतःच्या रक्षणासाठी तो स्वतःवरच अवलंबून असतो. कारण तो स्वतःला सुरक्षित समजतो देवावर अवलंबून राहण्याची गरज नाही असे त्याला वाटते. आम्ही आमच्या नैसर्गिक प्रवृत्तिंना पवित्र आत्म्याला मानत नाही. जोपर्यंत आम्ही पूर्णपणे परमेश्वराशी जडून राहत नाही तोपर्यंत आपल्यातील स्वार्थ, पाप आणि अपवित्रपणाशी विरोध तो करू शकणार नाही. MHMar 358.2

ख्रिस्ताकडून सहाय्य मिळविण्यासाठी आपल्याला आपल्या गरजा समजणे आवश्यक आहे. आम्हाला स्वतःविषयी खरे ज्ञान होणे आवश्यक आहे. ख्रिस्त केवळ त्यालाच वाचवू शकतो जो आपली पापे स्विकारतो जेव्हा आम्ही आपली असहाय्यतेची स्थिती समजतो. तेव्हा स्वतःवर विश्वास करणे सोडून देतो आणि तेव्हाच आम्ही स्वर्गीय शक्तीवर अवलंबून राहतो. MHMar 358.3

केवळ ख्रिस्ती जीवनाच्या सुरुवातीलाच आत्मत्यागाचा स्वीकार करून चालणार नाही तर स्वर्गाच्या वाटेवरील प्रत्येक पावलागणीत त्यामध्ये प्रगती होणे आवश्यक आहे. प्रत्येक नवी संधी आत्मसात करणे आवश्यक आहे. आमची जी सर्व कामे ज्या शक्तीवर अवलंबून आहेत. ती करण्याची पात्रता आमच्यामध्ये नाही म्हणून आपण सतत आपले हृदय परमेश्वराच्या सानिध्यात ठेवावे. परमेश्वरासमोर गंभीरपणे आपल्या पापांची क्षमा मागून स्वीकार करावा. आणि आपल्या आत्म्याला त्याच्यासमोर लीन करावे. आपल्या चारी बाजूला धोके असतात आणि आपण दुर्बल आहे हे ओळखून त्यापासून रक्षण करण्यासाठी सर्वसमर्थ मुक्तिदात्याकडे याचना करावी. MHMar 358.4