आरोग्यदायी सेवा

149/172

ख्रिस्त हा खऱ्या ज्ञानाचा उगम आहे

आमचे लक्ष विचलित करणारे हजारो विषय आपल्याभोवती आहेत. अशा अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे आपला वायफळ वेळ खर्च करतात. आणि परमेश्वराकडे दुर्लक्ष करण्यास भाग पाडतात. परंतु यामुळे काहीच फायदा होत नाही. ज्या गोष्टी सर्वात अधिक महत्वाच्या आहेत त्या सोडून निष्फळ गोष्टींकडे आपले लक्ष लागते. परमेश्वराकडील आध्यात्मिक ज्ञानाची आफणास आवश्यकता असते. हेच महत्वपूर्ण कार्य आहे की ते ज्ञान आपण आत्मसात करावे. MHMar 359.1

केवळ नवनवे सिद्धांताचा स्विकार करण्यानेच आत्म्याला नवजीवन मिळत नाही एवढेच नाही तर महत्वपूर्ण तथ्य आणि सिद्धांतापासून ही काही लाभ होत नाही तर हे सिद्धांत व्यवहारामध्ये आणल्याशिवाय. आमच्या आत्म्याला अशाप्रकारचे भोजन देण्याचे उत्तरदायित्व समजणे आवश्य आहे. ते आपणा आत्मिक जीवनाचे पोषण करते व प्रेरणा देते. MHMar 359.2

“आपला कान ज्ञानाकडे देशील आणि मनसुज्ञाकडे, जर तू विवेकाला हाक मारशील सुज्ञतेची आराधना करशील, जर तू रुप्याप्रमाणे त्याचा शोध करशील, व गुप्त निधीप्रमाणे त्याला उमगून काढशील तर परमेश्वराच्या भयाची जाणीव तुला होईल. आणि देवाविषयीचे ज्ञान तुला प्राप्त होईल. कारण ज्ञान परमेश्वर देतो, त्याच्या मुखातून ज्ञान व सुज्ञता येतात. सरळासाठी तो यश प्राप्ति सुलभ करितो. सात्विकपणे चालणाऱ्यास तो ढाल आहे, अशासाठी की त्याने नीतिमार्गाचे रक्षण करावे. आणि आपल्या भक्तांचा मार्ग सांभाळावा धर्मनीति व सात्विकता अशा सर्व सन्मार्गाची तुला जाणीव घडेल. कारण ज्ञान तुझ्या चित्तात प्रवेश करील. आणि विद्या तुझ्या जिवाला रम्य वाटेल. विवेक तुझे रक्षण करील. समंजसपणा तुला सांभाळील म्हणजे कुमार्गापासून विवेकशून्य गोष्टी करणाऱ्या मनुष्यापासून तो तुला दूर ठेवील. ते सरळपणाचे मार्ग सोडून अंधकारच्या मार्गाने चालतात, त्यांना दुष्कर्म करण्यात आनंद वाटतो, दुष्कर्माच्या कुटिलतेवरून ते उल्लास पावतात. त्यांचे मार्ग वाकडे आहेत. त्यांच्या वाटा विपरीत आहेत.” (नीतिसूत्रे २:२-११). “जे त्याला धरून राहतात त्यांस तो जीवनवृक्ष आहे, जो कोणी ते राखून ठेवितो तो धन्य होय.” (नीतिसूत्रे ३:१८). MHMar 359.3

अध्ययनासाठी आमच्याकडे एकच प्रश्न आहे, “सत्य काय आहे. सत्य ज्याला प्रिय वाटते. प्रेम आणि सन्मान दिला जातो आणि त्याचे पालन केले जाईल?’ विज्ञानाचे भक्त परमेश्वराचा शोध घेण्याच्या प्रयत्नामध्ये पराजित आणि निराश झाले आहेत यावेळी त्यांना त्या गोष्टीचा शोध घेणे गरजेचे आहे आणि ते म्हणजे “सत्य काय आहे जे आमच्या आत्म्याचा उद्धार करण्यात आमचे सहाय्य करते?” MHMar 360.1

“तुम्ही ख्रिस्ताविषयी काय विचार करता?’ हा सर्वसामान्य प्रश्न आहे. आपण त्याला आपला वैयक्तिक मुक्तिदाता म्हणून स्वीकार केला आहे काय ? जे सर्व त्याचा स्वीकार करतात त्यांना तो स्वतःची संतान होण्याचा अधिकार देतो. MHMar 360.2

ख्रिस्ताने आपल्या शिष्यांसमोर परमेश्वराला अशाप्रकारे ठेवले की त्यांच्या हृदयामध्ये एक खास कार्य संपन्न केला. असे अनेक लोक आहेत की ते सिद्धांतावर मुक्तिदात्याच्या सामर्थ्यावर आणि त्याच्या आदर्श जीवनापासून त्यांच्या नजरेसमोरून काही मर्यादेपर्यंत लुप्त होते. त्यांना गरज आहे की त्यांनी येशूकडे पाहावे प्रत्येक दिवशी आम्हाला ख्रिस्ताच्या उपस्थितीमधील नव्या प्रकाशनाची गरज आहे. आम्हाला ख्रिस्ताचा आत्मत्याग आणि आत्मबलिदानाच्या नमून्याचे अनुकरण करण्याची गरज आहे. MHMar 360.3

आम्हाला पौलाच्या त्या अनुभवाची गरज आहे याविषयी त्याने लिहीले, “मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला आहे आणि ह्यापुढे मी जगतो असे नाही. तर ख्रिस्त माझ्याठायी जगतो. आणि आता देहामध्ये जे माझे जीवित आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योगाने आहे. त्याने माझ्यावर प्रीति केली व स्वतःला माझ्याकरिता दिले.” (गलती २:२०). MHMar 360.4

परमेश्वर आणि येशू ख्रिस्ताच्या ज्ञानाला आपल्या स्वभावातून प्रगट असे करावे की जगातील सर्व वस्तूंपेक्षा ते उंच राहील ज्याला लोक समान देतील. ही एक अशी किल्ली आहे की ती स्वर्गाचे दार उघडते. परमेश्वराचा उद्देश आहे की ज्यांनी ख्रिस्ताला परिधान केले आहे ते हे ज्ञान प्राप्त करतील. MHMar 360.5

*****