आरोग्यदायी सेवा

147/172

वेळ दवडू नका

आमच्याकडे गमवायला वेळ नाही. आम्हाला ठाऊक नाही की आमच्याकडे कृपेचा काळ किती आहे आणि ते दार कधी बंद होईल ? आमच्याजवळ कितीही वेळ असेल परंतु स्वर्गाच्या दृष्टीने आमचे हे जीवन अतिअल्प आहे. आणि आम्हाला ठाऊक नाही की मृत्युचा बाण कधी येऊन आम्हाला लागेल काही सांगता येत नाही. आम्हाला ठाऊक नाही की आम्ही आमच्या सर्व संबंधीतांपासून वेगळे होऊ. आमच्यासमोर अनंतकाळ पसरला आहे. पडदा जवळ जवळ उघडणारच आहे. केवळ थोडाच काळ थोडीच वर्षे आणि प्रत्येकाला आत जिवंतांमध्ये गणले जात आहे. आणि आदेश दिला जाईल. “दुराचारी माणूस दुराचार करीत राहो, नीतिमान माणूस नैतिक आचरण करीत राहो. पवित्राचरणी माणूस स्वतःला पवित्र करीत राहो.” (प्रकटीकरण २२:११). MHMar 357.1

काय आम्ही तयार आहोत काय ? स्वर्गाचा जो शासक आहे आणि तेथील व्यवस्था पाहणारा आणि येशू ख्रिस्त ओळख करून घेतली आहे काय? ज्याला परमेश्वराने आपला प्रतिनिधी म्हणून या जगामध्ये पाठविले होते. जेव्हा आमच्या जीवनाचे कार्य समाप्त होईल तर काय आमच्या आदर्श ख्रिस्तासारखे आम्ही असे म्हणू शकतो का? “जे कार्य तू मला करावयास दिले ते पूरे करून मी पृथ्वीवर तुझे गौरव केले आहे. जे लोक तू मला जगात दिले त्यांना मी तुझे नाव प्रगट केले.” (योहान १७:४,६). आमच्या स्वतःच्या इच्छा आणि जगाची आवडीपासून लक्ष बाजूला करण्याचे कार्य स्वर्गीय दूत करीत आहेत. त्यांचे परिश्रम व्यर्थ जाऊ देऊ नका. MHMar 357.2

जी मने दुराचार करण्यामध्ये व्यस्त आहेत त्यांना बदलण्याची गरज आहे. “म्हणून तुम्ही आपली मनरुपी कंबर बांधा. व सावध राहून येशू ख्रिस्ताच्या प्रगट होण्याच्या वेळी तुम्हास प्राप्त होणाऱ्या कृपेवर पूर्ण आशा ठेवा. तुम्ही आज्ञांकित मुले व्हा आणि अज्ञानावस्थेतील आपल्या पूर्वीच्या वासनानुसार वागूवर्त नका. तर तुम्हास पाचारण करणारा जसा पवित्र आहे तसे तुम्हीही सर्व प्रकारच्या आचरणात पवित्र व्हा. कारण असा शास्त्रलेख आहे की तुम्ही पवित्र असा, कारण मी पवित्र आहे.” (१ पेत्र १:१३-१६). MHMar 357.3

आपले विचार परमेश्वरावर केंद्रित असणे आवश्यक आहे. आम्हाला आमच्या स्वाभाविक हृदयाची स्वाभाविक प्रवृत्तिवर विजय मिळविणे आवश्यक आहे. तसे प्रयत्न करणे अनिवार्य आहे. आमचे प्रयत्न आमचे बलिदान व आमची आत्मीयता पवित्रीकरणाच्या लक्ष्याकडे असणे आवश्य आहे. त्याचा पिच्छा करणे गरजेचे आहे. ख्रिस्तानेही विजय मिळविला आहे आम्हीसुद्धा जीवनाचा मुकुट मिळविण्याची आशा करू शकतो. MHMar 358.1