आरोग्यदायी सेवा
विज्ञानाला मालक नाही परंतु सेवक व्हावे
ख्रिस्ती ज्ञान शिकायचे आहे. हे ज्ञान अधिक खोल आणि विस्तृत आहे. कोणत्याही ज्ञानी मनुष्यापेक्षाने उच्च दर्जाचे आहे. जसे स्वर्ग पृथ्वीपेक्षा उंच आहे. आपल्या बुद्धीला शिस्त लावून, सुशिक्षित करून ज्ञान देणे आहे. कारण आपल्याला परमेश्वराची सेवा ज्याप्रकारे करायची आहे ती आपल्या जन्मजात स्वभावापेक्षा उलटी (विरुद्ध) आहे. आपल्या अनुवंशिक वाईट सवयींवर विजय मिळवायचा आहे. तसे आपणास जीवनभराच्या शिकवणीला आणि ज्ञानाना विसरायला हवे. म्हणजे आम्हाला ख्रिस्ताच्या शाळेमध्ये शिकणारे व्हाल. आपल्याला अशी सवय लावायला हवी की आम्ही परीक्षेशी सामना करण्यास योग्य बनू शकू. आपल्याला वर पाहण्याचे गुण मिळवायचे आहे. आपल्याला समजायला हवे की आकाशापासून उंच असणारे अनंत जीवनासंबंधित सिद्धांत आमच्या दैनिक जीवनामध्ये काय प्रभाव टाकतो. प्रत्येक कार्य, प्रत्येक शब्द व प्रत्येक सिद्धांतानुसार होणे आवश्यक आहे. सर्वांना ख्रिस्ताच्या सहवासात व त्याच्या अधीनतेत आणणे आवश्यक आहे. पवित्र आत्म्याचे मोलवान शिक्षण आणि पद्धती एकाच वेळी शिकले जात नाहीत. साहस, दृढता, विनम्रता, विश्वास व परमेश्वराची सुरक्षित ठेवणाऱ्या शक्तीमधील अतूट विश्वास हे सर्व अनेक वर्षांच्या अनुभवानुसार प्राप्त होते. पवित्र प्रयत्नाने जीवन आणि सत्याबरोबर सख्य ठेवल्यास परमेश्वराच्या मुलावर शिक्का मिळेल. त्यांचे जीवन निश्चित व खात्रीचे होईल. MHMar 356.2