आरोग्यदायी सेवा

145/172

कार्य जे आमच्या विचाराची मागणी करते

चुका ठीक करता येत नाहीत आणि थोड्या थोड्या करून त्यांच्यामध्ये सुधारणा करता येत नाही. चरित्राची निर्मिती एक दिवस किंवा एका वर्षामध्ये करता येत नाही परंतु पूर्ण जीवनासाठी असते. पवित्र आणि स्वर्ग मिळविण्यासाठी व स्वतःवर विजय मिळविण्यासाठी हा चालणारा संघर्ष जीवनभर चालतो. निरंतर प्रयत्न आणि सतत परिश्रम करीत राहिल्याशिवाय जीवनामध्ये प्रगती होऊ शकत नाही विजयाचा मुगूट प्राप्त होऊ शकत नाही. MHMar 355.1

मानवाला उंच पातळीवरून खाली पडण्याचे मोठे प्रमाण हे आहे की त्याला पुन्हा त्या पदावर येण्यासाठी त्याला फार मोठी किंमत मोजावी लागेल. परत येण्याचा मार्ग हा कठीण संघर्षाला तोंड द्यावे लागेल. प्रत्येक तास एक एक इंच आपली पूर्व दिशा प्राप्त करावी लागेल. सुरक्षितपणावर लक्ष न ठेवता गडबडीने आपले पाऊल उचलताना दुर्लक्ष झाल्यास वाईटाकडे मार्ग जाऊ शकतो. परंतु वाईटाचे बंधन तोडून पुन्हा पावित्र्य मिळविण्यासाठी एक तासापेक्षा अधिक काळ लागतो. उद्देश निश्चित केला जाऊ शकतो मार्ग आरंभ केला जाऊ शकतो परंतु तो पूर्ण करण्यासाठी कष्ट, वेळ, तपश्चर्या आणि बलिदानही देण्याची गरज असते. MHMar 355.2

आम्ही भावनांमध्ये वाहून जातो आणि अशावेळी कार्य करण्याची जोखीम उचली शकत नाही. एक क्षणसुद्धा सुरक्षिततेमधून आपण बाहेर येऊ शकत नाही. कारण आपल्या चारी बाजूला सतत मोह फिरत असतात. जर आम्ही त्यांना दृढपणे विरोध केला नाही तर आपला पराजय निश्चित होणार जर आमचे जीवन त्याच अवस्थेत समाप्त झाले तर आपले सार्वकालिक नुकसान होणार. MHMar 355.3

प्रेषित पौलाचे जीवन हे सतत त्याच्या स्वभावाबरोबर संघर्षाने भरलेले असायचे तो म्हणतो, “मी रोज रोज मरतो.” (१ करिंथ १५:३१). रोज त्याची इच्छा आणि अभिलाषा त्याची कर्तव्ये आणि परमेश्वराची इच्छा व अभिलाषाशी संघर्ष करीत होती. आपल्या इच्छांचा पिच्छा पुरविण्याऐवजी त्याने आपला स्वभाव वधस्तंभावर चढवून परमेश्वराची इच्छा पूर्ण केली. MHMar 355.4

पूर्ण जीवनाचा संघर्ष केल्यावर शेवटी संघर्षावर विजय मिळवून आपण म्हणू शकतो की “कारण आता माझे अर्पण होत आहे आणि माझा प्रयाणकाळ जवळ आला आहे जे सुयुद्ध तो मी केले आहे धाव संपविली आहे विश्वास राखिला आहे आता जे राहिले ते हेच की माझ्यासाठी नीतिमत्वाचा मुकुट ठेविला आहे. प्रभु जो नीतिमान न्यायाधीश आहे तो त्या दिवशी मला तो मुकुट देईल.” (२ तिमथी ४:६-८). MHMar 355.5

ख्रिस्ती जीवन हे एक संघर्षाचा प्रवास आहे. या लढाईमधून सूटका नाही. मन लावून सतत प्रयत्न करणे आवश्यक आहे. न थकता सतत कठीण परिश्रमाकरवीच आपण सैतानाच्या परीक्षेवर विजय मिळवू शकतो. ख्रिस्ती जीवनाच्या निष्ठतेचा शोधा हा विश्रांती न घेता, कठीण परिश्रमाने व एकाग्र चित्ता हे साध्य करता येते. कोणीही व्यक्ति कठोर प्रयत्न केल्याशिवाय स्वतःची उंची प्राप्त करू शकत नाही. सर्वांना या संघर्षाच्या मल्लयुद्धात भाग ह्या वाच लागेल. प्रत्येकानी स्वतःसाठी हा संघर्ष करावा लागणारे आहे आपल्यासाठी इतर कोणी या लढाईत भाग घेऊ शकत नाही. त्यासाठी आपण स्वतः जबाबदार असणार आहोत. मग तो कोणीही असे नोहा, ईयोब, किंवा दानिएल सारखे असे कोणीही असो. आपल्या धार्मिकतेमध्ये आपण आपल्या मुलाची किंवा मुलगा आपली सुटका करू शकत नाही. MHMar 356.1