ख्रिस्ती सेवा
सुसंस्कृत व्याख्यान / भाषण
ख्रिस्ती कार्यासाठी सुसंस्कृत संभाषण कला अवगत असावी. शांत मृदु आवाज आणि शुद्ध, अचूक भाषा, सभ्य शब्द या सर्वांशी सवय असावी - हे नित्याचे असावे - ख्राईस्टस् ऑब्जक्ट लेसन्स - ३३६. ChSMar 260.4
आपल्या भाषणातून सार्वकालिक जीवनासंबंधी संदेश लोकापर्यंत पोहचेल ही गोष्ट शिक्षकाने ध्यानात ठेवावी. शेवटच्या दिवशी सत्याबद्दलचे त्यांचे बोलणे पारखले जाईल. त्याचा स्विकार किंवा नकार या गोष्टी त्याने कोणत्या पद्धतीने संदेश दिला आहे आणि किती आत्म्यांना त्याच्या संदेशाने स्पर्श केला आहे यावर अवलंबून असणार आहे. तेव्हा शांतीने, स्पष्टपणे व गंभीरपणे त्याने संदेश द्यावा आणि त्यातल्या त्यात प्रामाणिकपणे जो फार महत्त्वाचा आहे असा संदेश द्यावा. - ख्राईस्ट ऑब्जेक्ट लेसन्स - ३३६. ChSMar 260.5
लोकांना, तुम्ही प्रभुच्या अद्भुत प्रितीच्या कक्षेत याव असं वाटत तेव्हा तुमच्या भाषेची शुद्धता, तुमच्या कार्याचे उपयोगीता आणि आनंददायी वर्तणूक हेच त्याच्या कृपेच्या शक्तीचे द्योतक आहे. - द मिशनरी ऑफ हिलींग - १५६. ChSMar 260.6
इतरांना प्रत्येक ख्रिस्ती मनुष्याद्वारे ख्रिस्ताची अनाकलणीय दौलत समजावी म्हणून भाषणात त्याने अगदी प्रविण असावे तुमचा संदेश हृदयस्पर्शी असावा. त्याच वचन सांगणारे बेडौल असावेच अस त्याला वाटत नाही आणि अशांमुळे त्याची स्वर्गीय उर्जा बाधीत व्हावी असं त्याची इच्छा नाही. - ख्राईस्ट ऑब्जेक्ट लेसन्स ३३६. ChSMar 261.1
ते सहनशक्तिने, दयाळुपणाने, मददगार वृत्तीने, मुकट मंडीत असावेत. ख्रिस्त जो त्यांचा सोबती, त्याला ते कठोर व भावना दुखविणारे असे मान्य नाहीत. त्यांचे बोलणे शुद्ध केले जाईल. अशाप्रकारे मृदु भाषिक संदेश देणारे त्याच्या कार्यास योग्य आहेत. - गॉस्पल वर्कर्स - ९७. ChSMar 261.2