ख्रिस्ती सेवा

207/256

मानासीक संस्कार

मानसीक संस्कार ज्याची गरज आहे आणि जे आपल्याला असायलाच हवेत याची आज घडीची मागणी आहे. TFTC - ४-४१४. ChSMar 261.3

पूर्व नियोजनाचा अभाव असणाऱ्यांनी सेवा कार्यामध्ये आकस्मीकपणे येऊ नये आणित्यातून फळाची अपेक्षाही धरु नये. विचारवंत लोकांची त्याला गरज आहे. ख्रिस्ताला सहकारी हवेत, चुकणारे नव्हे ! आत्म्यांचे तारण होण्यासाठी त्याला हुशार व सहृदय माणसांची गरज आहे. TFTC - ४६७. ChSMar 261.4

काहींना शिस्त असण्याची गरज आहे ती सरावाने होईल. त्यांनी त्याचा विचार करायलाच हवा. दुसऱ्यावर अवलंबू नये. इतरांनी त्यांच्यासाठी विचार करावा. त्यांच्या अडचणी सोडवाव्यात, स्वत: मात्र विचार करायचा त्रास घेवू नये - असे नसावे. अशाने विसराळूपणा, भेदभाव यात वाढ होईल. आपलं मन संस्कारी बनण्यासाठी प्रत्येकाने यत्न करावयास हवा. TFTC - १२:१८८. ChSMar 261.5

आळशीपणा, बेशिस्त मन, नकारार्थी विचार आणि मंद बुद्धी असे आपण असावे हे त्याला नको आहे. कौन्सल टु रन्टस, टिचर्स अॅन्ड स्टुडन्ट ३०६. ChSMar 261.6

अभ्यास करण्यात मेहनती, ज्ञान संपादण्यास आतूर व वेळेचा सदूपयोग करणारे अशी देवाची माणस हवीत. ChSMar 261.7

खंबीरपणे श्रम करणारे शक्तीशाली व प्रभावशाली ख्रिस्ती म्हणून ख्यातनाम होतील. TFTC - ४:४११. ChSMar 261.8

आपल्याला क्षण ही घालवायचा नाही आहे. आता पहा प्रवासातील वेळ, जेवणासाठी वाट पाहताना लागलेला वेळ किंवा कोणाची वाट पाहण्यात, जो कधीच सांगितलेल्या वेळेत येत नाही, अशाची वाट पाहण्यात घालविलेला वेळ आता याचवेळेच व्यवस्थित नियोजन करुन त्याला लीखाण, वाचन किंवा काळजीपूर्वक विचार करण्याच्या कामी लावला तर आपण साध्य करु शकणार नाही ? - ख्राईस्ट ऑब्जेक्ट लेसन्स ८४३, ८४४. ChSMar 261.9

दृढ निश्चय, चिकाटी, मेहनत व वेळेच नियोजन माणसाला नाव संपन्न व मानसीकरित्या शिस्तबद्ध बनविते जेणेकरुन कोणत्याही क्षेत्रात आपल्या उपयोगितेने प्रभावशाली बनवेल. - ख्राईस्ट ऑब्जेक्ट लेसन्स ३३४. ChSMar 262.1

जबाबदारीच्या स्थानावर स्थानापन्न असणाऱ्याने सदोदीत आपल्याला सुधारीत करावे. त्यांनी जुन्या अनुभवावर अवलंबून राहू नये आणि अस समजू नये की अगदी शास्त्रोक्त, अगदीच आखुन दिल्यासारख कामगार बनण्याची गरज नाही. मनुष्य जो की परमेश्वर निर्मितीतला सर्वात असहाय्य प्राणी आहे जेव्हा तो जन्माला येतो तेव्हा आणि विकृत स्वभावाचा असून अविरत प्रगतिसाठी पात्र आहे. तो विज्ञानामुळे सज्ञान, सद्गुणाने उदात्त आणि मानसीक, नैतिक गौरव प्राप्त करु शकतो, जो पर्यंत तो पूर्ण ज्ञानी व शुद्ध मनाचा होई तो पर्यंत (परंतु देवदूताच्या शुद्ध ज्ञानापेक्षा किंचीत कमी.) TFTC - ४/४३. ChSMar 262.2

जे परमेश्वराच्या सानिध्य राहून कार्य करु इच्छीतात त्यांनी आपल्या शारीरिक अंगास अगदी योग्य व मनाचा स्तर उंचवावा. शारिरीक, मानसिक व नैतिक समन्वय हेच खरे शिक्षण होय. ही रोजची गरज आहे. ही कार्याची शक्ती आहे. हेच शिक्षण सार्वकालिक जीवनाची किल्ली आहे. - ख्राईस्ट ऑब्जेक्ट लेसन्स - ३३०. ChSMar 262.3

यंत्रज्ञ, वकील, व्यापारी हे सर्व त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात प्राविण्याचे धनि असतात मग आपण जे प्रभुचे अवलोकन करतो त्यात प्राविण्य मिळवून त्याचे कार्य का करु नये ? आणि त्याच्या दाखविलेल्या दिशेस अनभिज्ञ का असावे? सर्व जगीक गोष्टीपेक्षा सार्वकालिक जीवनासाठी झटणे हे योग्य आहे. परमेश्वराकरीता आत्मे जींकण्यास त्यांच व्यक्तित्व व त्याच्या मनाचा थांग घेणे अगत्याच आहे. काळजीपूर्वक विचार सरणी व प्रार्थना शिकवितात की मनुष्याकडे आपण कोणता दृष्टिकोनातून भेटतो. ज्यावेळी आपण त्यांना सत्याची ओळख करुन देतो. - टेस्टोमोनिज फॉर द चर्च ४-६७. ChSMar 262.4