कलीसिया के लिए परामर्श
मंडळीचा सल्ला नाकारणार्यासंबंधी मंडळीचें कर्तव्य
कोणत्याही मंडळीच्या कामदाराला किंवा कमेटीला किंवा मंडळीला ख्रिस्ताने दिलेली माहिती अमलांत आणल्याशिवाय चूक करणार्यचे नाव मंडळीच्या पुस्तकांतून काढण्याचा अधिकार नाहीं. जेव्हां ही माहिती अमलांत आणली जाते तेव्हां मंडळी देवासमोर निर्दोष ठरते. झालेली चूक स्पष्टरित्या दिसली पाहिजे व ती नाहींशी केली पाहिजे. अशासाठीं कीं, ती अधिक प्रमाणात पसरू नये मंडळीची शुद्धता व आरोग्य कायम राखिले पाहिजे. कारण मंडळी देवासमोर निर्दोष अशी ख्रिस्ताच्या धार्मिकतेच्या झग्याने वेष्टिलेली उभी राहिली पाहिजे. CChMara 122.7
जर दोषी मनुष्य पश्चात्ताप करील व ख्रिस्ताच्या शिस्तीला वश होईल तर त्याची आणखी एकदा चौकशी व्हावी. तो पश्चात्ताप करणार नाहीं व मंडळीच्या बाहेर राहील तरी देवाच्या सेवकाने त्याच्यासाठीं अजून कार्य केले पाहिजे. त्यांनी मनापासून त्याला पश्चाताप करावयास खटपट केली पाहिजे. कितीही मोठा गुन्हा त्याच्याकडून झालेला असो, जर तो पवित्र आत्म्याच्या खटपटीला वश होईल, आपले पाप कबूल करून सोडून देईल व पश्चात्ताप करील तर त्याची क्षमा करून त्याला मंडळीत पुन: घ्यावे. त्याच्या भावांनी त्याला योग्य मार्गाने उत्तेजन द्यावे. त्याच्या जागीं आपण असतों तर ज्या वागणुकीची आशा आपण केली असती तीच वागणूक त्याच्याशी करावी. कारण आपणालाही असाच मोह येणार याविषयी विचार करावा. “मी तुम्हांस खचित् सागतों, जे काहीं पृथ्वीवर तुम्ही बद कराल तें स्वर्गात बंद केले जाईल आणि जे काहीं तुम्ही पृथ्वीवर मोकळे कराल, तें स्वर्गात मोकळे केले जाईल. मत्तय १८:१८. CChMara 123.1
या विधानाकडून सर्व युगात त्याचा परिणाम झाला आहे. मंडळीवर ख्रिस्ताच्या जागी कार्य करण्याचे सोपविले आहे. ती देवाच्या लोकांत शिस्त व नियम पाळण्याच्या बाबतीत देवाचे साधन अशी आहे. मंडळीला देवाने आपले सामर्थ्य तिच्या वाढीप्रीत्यर्थ येणार्य सर्व बाबींविषयीं पुरविले आहे. जे आपल्या वागणुकीने सत्याला काळिमा लावतील अशा नालायक लोकांना वेगळे करण्याची जबाबदारी तिच्यावर आहे. देवाच्या वचनात जी माहिती दिली आहे त्याप्रमाणे मंडळी करील तर तें सर्व स्वर्गात कायम केले जाईल. CChMara 123.2
मोठ्या महत्त्वाच्या बाबी मिटविण्यासाठी मंडळीकडे यावे. निवडलेल्या देवाच्या सेवकांनी लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी आपला भाग केल्यावर मडळीला कळवावें. मंडळींत जे कांहीं ठरेल त्यात एकमत असावें. CChMara 123.3
प्रभूची इच्छा आहे कीं, त्याच्या अनुयायांनी एकमेकांशी वागताना मोठी काळजी घ्यावी. त्यानी उचलून धरावें, बरे करावे व पुन: परत मिळवावे. परंतु मंडळींत शिस्तीचा अभाव असू नये. सभासदांनी स्वत:ला शाळेच्या विद्याथ्र्यांप्रमाणे समजावें व देवाच्या उच्च पाचारणास शोभेल असें शील बनविण्यासाठी शिकावे. वरील मंडळीत एकत्र होण्यासाठी या पृथ्वीवरील मंडळींतच देवाच्या मुलांची तयारी झाली पाहिजे. जे कोणी येथे ख्रिस्ताच्या शिकवणुकीप्रमाणे वागतील त्यांनी तारलेल्या मोठ्या कुटुंबांत चिरकाल जीवनांत जाण्याची आशा धरावी. 5 CChMara 123.4