कलीसिया के लिए परामर्श
मंडळीच्या शिस्तीबद्दल ख्रिस्ताच्या पद्धति
मंडळीच्या चुकलेल्या सभासदाबाबत मत्तय १८ व्या अध्यायात तारकाने दिलेल्या माहितीचे काळजीपूर्वक देवाच्या लोकांनी अनुकरण केलें पाहिजें. CChMara 121.2
मानवप्राणी ख्रिस्ताची मालमत्ता आहे कारण त्यानें ती अमर्याद किमतीने विकत घेतली असून त्यांच्याकरता दर्शवण्यात आलेल्या पित्याच्या व त्याच्या स्वत:च्या प्रीतीने त्यांना बांधले आहे. म्हणून किती काळजीपूर्वक आम्ही एकमेकाशी वागले पाहिजे. आपल्या सोबत्याच्या बाबतींत कल्पना किंवा तर्क करण्याचा मनुष्याला हक्क नाहीं. मंडळीच्या सभासदांनी स्वत:च्या मर्जीप्रमाणे चुकलेल्या सभासदांच्या बाबतींत वागण्याचा हक्क नाहीं. चुकणाच्याविषयी त्यांनी दुराग्रह करून बोलण्याचे सोडून द्यावे. कारण अशा करण्याने तें इतरांच्या मनात वाईटाचें खमीर सोडून देतात. मंडळीच्या सभासदांमध्ये मंडळींतील भावाबहिणीविषयींचा रिपोर्ट सांगितला जातो. प्रभूने दिलेल्या मार्गदर्शनानुसार वागण्याची कित्येकांनी नाकबूली केल्यामुळे चुका झाल्या आहेत व अन्याय करण्यांत आला आहे. CChMara 121.3
ख्रिस्तानें म्हटलें आहे कीं, “जर तुझ्या भावाने तुझा अपराध केला असेल तर त्याचा अपराध तू त्याला सांग.” मत्तय १८:१५. चुकीविषयी इतरांना सांगू नका. त्याविषयी एकाला सांगण्यांत येते, मग दुसन्या आणि अशा प्रकारे चोहोकडे बातमी पसरते आणि सर्व मंडळीला त्रास होण्याइतकें वाईट प्रकरण घडते, म्हणून “दोघामध्येच ही बाब मिटवा.” ही देवाची योजना आहे. “फिर्याद करावयास जाण्याची उतावळी करूं नको. ती तू केली आणि तुझ्या शेजाच्याने तुझी फजिती केली तर परिणामी काय करूं असें तुला होऊन जाईल. तुझा व तुझ्या शेजार्यचा दावा असला तर तो चालीव, पण इतरांच्या गुप्त गोष्टी बाहेर फोडू नको.” नीति २५:८९. तू तुझ्या भावाला पापाची शिक्षा देऊ नको; त्याचे पाप उघड करून त्याला त्रास देऊ नको व धमकी देऊन त्याचा सूड घेऊ नको. देवाच्या वचनात सांगितल्याप्रमाणे त्याची दुरुस्ती करा. संतापून जाऊन विरोध निर्माण करुं नका. विषारी शब्द बोलून जखम चिघळून फुटू देऊ नका कारण त्याकडून ऐकणार्यांच्या मनाला कलंक लागेल. आपल्या मनात वाईट विचार करून त्याचे व तुमचे मन त्यानें भरू नका. तुमच्या भावाकडे जा व नम्रपणे व सरळरित्या त्या बाबीविषयीं बोला. कोणत्याहि प्रकारचा गुन्हा असू द्या त्याकडून गैरसमज वे वैयक्तिक दु:ख मिटविण्याच्या बाबतींत देवाची जी योजना ती बदलू शकत नाहीं. जो अपराधी आहे त्याच्याशीं ख्रिस्ताच्या वृत्तीनें व एकटे बोलून असला त्रास सतत मिटविता येतो. चुकणाच्या भावाकडे जा. ख्रिस्ताच्या प्रीतीने व सहानुभूतीने ही बाब मिटविण्याचा प्रयत्न करा. त्यांच्याबरोबर शांततेने व गंभीरपणे बोला. तुमच्या ओठांतून रागाचे शब्द येऊ नयेत योग्य न्याय देण्याच्या बाबतीत लागू पडेल असें बोला. “तर पापी मनुष्याला त्याच्या भ्रांतिमय मार्गापासून फिरविण्यास तो त्याचा जीव मरणापासून तारील व पापांची रास झाकील असें त्यानें समजावे.” याकोब ५:२०. CChMara 121.4
कडूपणा घालविण्याकरिता लागणारा उपाय योजून तुमच्या भावाकडे त्याला मदत करण्यास तुमचा भाग करा. कारण मडळीच्या शांततेकरता व एकीकरता हें करणे तुमचे कर्तव्य व संधि आहे असें समजा. जर तो तुमचे ऐकेल तर तुम्ही त्याला मित्र म्हणून जिंकले आहे. CChMara 122.1
जे चुकलेले आहेत व ज्यांना जखम झाली आहे म्हणजे ज्यांचे मन दुखावले गेले आहे त्याच्यात समेट करण्यास स्वर्गाला आनंद होतो. ख्रिस्ताच्या प्रीतीने दर्शविलेली चूक जर कबूल केली, धमकी स्वीकारली, देवाची व आपल्या भावाची क्षमा मागितली तर त्याचे अंत:करण स्वर्गीय प्रकाशाने भरून जाते. लढा संपतो, मैत्री व विश्वास संपादन केला जातो. प्रीतीच्या तेलाने चुकीमुळे झालेली सूज ओसरते. देवाच्या आत्म्याने अंत:करणे जोडली जातात व या मिलाफाने स्वर्गात आनंदाचे गीत गाण्यात येतें. CChMara 122.2
अशाप्रकारें जें ख्रिस्ती सहभागितेत आलें आहेत व देवाची प्रार्थना करून न्यायाने वागण्यास दयेची आवड धरण्यास, देवाबरोबर नम्रतेने चालण्यास ज्यांनी प्रतिज्ञा केली आहे. त्यांना मोठा आशीर्वाद प्राप्त होतो. जर त्यांनी इतरांचा अपराध केला असला तर तें पश्चात्ताप, कबूली व भरपाई करण्याचे चालूं ठेवतात व त्याकडून एकमेकांचे बरे करतात. हें करणे ख्रिस्ताचा नियम पूर्ण करणे होय. CChMara 122.3
“परंतु त्यानें जर न ऐकले तर तूं आणखी एका दोघांस आपणाबरोबर घे; अशासाठीं कीं दोन किंवा तीन साक्षीदारांच्या तोंडाने प्रत्येक शब्द शाबीत व्हावा.” मत्तय १८:१६. जे आत्मिक मनाचे आहेत त्यांना आपणाबरोबर घे व चुकी करणाराबरोबर बोल कदाचित् या एकत्र झालेल्या भावाची विनंती तो मान्य करील. या बाबतींत सर्वांचे एकमत झालेले पाहून त्याचे मन उत्तेजित होईल. CChMara 122.4
“आणि जर त्यानें त्याचे न ऐकलें तर मंडळीला कळीव. त्यानें मंडळीचेहि न ऐकले तर तो तुला विदेशी किंवा जकातदार याच्यासारिखा होवो.” मत्तय १८:१७. मंडळीला सांगितल्यावर मंडळीला आपल्या सभासदाविषयीं ठराव मांडू द्या. CChMara 122.5
“पण जर तो मंडळीचेही ऐकत नाही तर तो तुला विदेशी व जकातदार यासारखा होवो.” ओवी १७. जर तो मंडळीचे ऐकत नाहीं व त्याला परत मिळविण्याविषयी केलेले सर्व प्रयत्न नाकारतो तर त्याला मंडळींतून कमी करण्याची जबाबदारी मंडळीवर येऊन पडते. त्याचे नाव मंडळीच्या पुस्तकांतून काढून टाकावे. 4 CChMara 122.6