कलीसिया के लिए परामर्श
कोणाजवळ कबूली करावी ?
जे कोणी आपल्या पातकाबद्दल सबब सांगतात व स्वर्गीय पुस्तकांत त्या सबबी राखून ठेवतात व त्याची कबूली करून ती सोडून देत नाहींत त्यांच्यावर सैतान जय मिळवील. जितका त्यांचा धंदा उंच व मानाचा असेल तितकी अधिक मोठी बाब देवासमोर असतें व अधिक खात्रीपूर्वक त्यांचा शत्रू सैतान याचा विजय असतो. जे देवाच्या दिवसासाठी तयारी करण्याचे लाबणीवर टाकतात त्यांना संकटाच्या वेळी तयारी करता येणार नाही. अशाची बाब आशाहीन आहे. 6 CChMara 123.5
ज्यांना तुमच्या चुका व पाप माहीत नाहीं त्यांच्यासमोर तुमची पापे कबूल करण्याची गरज नाहीं. पापाची कबूली दिली असतां तिचा डांगोरा पिटविण्याचे काम तुमचे नाही. त्याकडून अविश्वासणाच्यांचा जय होईल, पण तें तुमच्या चुकीचा फायदा घेणार नाहींत व देवाच्या वचनाप्रमाणे कबूली करतात त्यांना तुमच्यासाठी प्रार्थना करुं द्या. देव तुमचे काम स्वीकारील व तुम्हांला बरें करील. तुमच्या जीवाकरता सार्वकालीकरित्या पूर्ण कार्य करण्यासाठी विनंति करण्यांत येवो. तुमचा अभिमान व व्यर्थता बाजूला ठेवा व तुमचे कार्य सरळ करा. मंडळींत पुन: येऊन मिळा, मेंढपाळ तुम्हांला स्वीकारण्यात थाबला आहे. पश्चात्ताप करून आपले पहिले काम करा व देवाच्या मर्जीला पसंत होण्यासाठी पुन: परत या. 7 CChMara 124.1
ख्रिस्त तुमचा तारणार आहे. तो तुमच्या नम्र कबुलीचा फायदा घेणार नाहीं. जर तुमचे पाप गुप्त असेल, तर त्याची ख्रिस्ताजवळ कबूली करा कारण तोच मनुष्य व देव यामधील मध्यस्थ आहे. “जर कोण पाप केलेच तर आपल्याला पित्याजवळ धार्मिक असा येशू हा मध्यस्था आहे.” १ योहान २:१. जर तुम्ही देवाचा दशाश व अर्पणे स्वत:साठी राखून ठेविली असतील तर देवाजवळ व मंडळीसमोर तें कबूल करा व तुम्ही सर्व दशमाश माझ्या भांडारात आणा.” मलाखी३:१० या सल्ल्याची खात्री करून घ्या व त्याप्रमाणे करा. 8 CChMara 124.2
देवाच्या लोकांनी समजूतदारपणाने वागावें. प्रत्येक माहीत असलेले पाप कबूल करीपर्यंत त्यांनी समाधान मानू नये. मग येशू त्याचा स्वीकार करतो यावर विश्वास ठेवणे त्याचे कर्तव्य व संधि समजावी. इतरांनी ही बाब त्याच्यासाठीं करून त्यांना जय मिळवून देण्याची त्यांनी वाट पाह नये. असा आनंद सभा संपेपर्यंतच टिकेल. देवाची सेवा भावनेकडून न होता. तत्त्वाकडून होऊ द्या. सकाळी आणि संध्याकाळी तुमच्यासाठी व तुमच्या कुटुंबासाठी विजय मिळवा. असें करण्यांत तुमच्या रोजच्या कामाचा अडथळा येऊ देऊ नका. प्रार्थनेसाठी वेळ घ्या व प्रार्थना करीत असतां असा विश्वास धरा कीं, देव तुमची प्रार्थना ऐकतो. तुमच्या प्रार्थनेसोबत विश्वास धरा. सर्वदाच तुमच्या प्रार्थनेचे उत्तर मिळणार नाहीं. तरी त्या विश्वासाची परीक्षा होते. 9 CChMara 124.3