कलीसिया के लिए परामर्श
“अशी मीं तुम्हांवर प्रीति केली तशी तुम्ही एकमेकांवर प्रीति करा.”
मानवाच्या तारणासाठीं देवाने आपला भाग केला आहे. आता तो मडळीशी सहकार्य करण्यास बोलावितो. एका बाजूला पवित्र आत्मा, सत्याचे वचन व ख्रिस्ताचे रक्त व दुसर्य बाजूला नाश पावणारे आत्मे आहेत. स्वर्गाने देऊ केलेले आशीर्वाद स्वीकारण्यास प्रत्येक ख्रिस्ताच्या अनुयायाला माणसें वळविण्यास संधि आहे म्हणून आपण स्वत:चे परीक्षण करूं या व हें कार्य केलेले आहे का तें पाहूं या. आमचा हेतु व आमच्या जीवितांतील प्रत्येक कार्य याविषय स्वत:ला विचारु या. CChMara 120.1
आपल्या स्मरणांत न आवडणाच्या कृतीची चित्रे नाहींत काय ? पुष्कळदां तुम्हांला येशूच्या क्षमेची गरज भासली आहे. तुम्ही त्याच्या प्रीतीवर व आवडीवर सतत अवलंबून राहिला आहा. तरी जी वृत्ति ख्रिस्ताने तुम्हांला दर्शविली ती इतरांना दाखविण्यांत तुम्ही चुकला कीं नाहीं ? चुकीच्या मार्गात शिरतांना तुम्ही त्यांना पाहाता तेव्हां त्यांच्याविषयींचे ओझे तुम्हांला भासलें आहे का ? तुम्हीं त्यांना दयेने सल्ला दिला आहे काय? त्यांच्याकरता तुम्ही रडला आहा का व त्यांच्याकरता त्यांच्याबरोबर प्रार्थना केली का? तुमच्या दयाळू शब्दाने व कृतीने त्याजवर प्रीति करून त्यांच्या तारणाची इच्छा करता काय? CChMara 120.2
जे खुशामत करतात व झोके खातात व ज्यांना चुकीच्या सवयीं जडल्या आहेत व जे आपल्या अशक्तपणाखाली दबले आहेत अशांच्या सहवासात आला असतां, तुम्ही त्यांना मदत करण्याऐवजी स्वत:च ही लढाई करण्यास त्याना भाग पाडले काय ? जेव्हां जग त्यांना सहानुभूति दाखवून सैतानाच्या जाळ्यांत पाडण्यासाठी त्यांना भुलविते तेव्हां अशा मोहवश झालेल्यांना पैलतिराला नेण्यांत निष्काळजी केली काय? काईनाप्रमाणे तुम्ही असें म्हणण्यास तयार झाला कीं नाहीं, “मी माझ्या भावाचा राखणारा आहे काय?” उत्पत्ति ४:९. CChMara 120.3
मंडळीचा जो मस्तक त्यानें तुमच्या जीविताचे कार्य किती पसंत केले पाहिजे! त्याच्या रक्ताने विकत घेतलेले मौल्यवान आत्मे यांच्या बाबतींत तें चागल्या मार्गावरून बहकले असतां तुम्ही जी बेपर्वाई दाखविली त्याकडे तो कसा पाहातो ? जसे तुम्हीं त्याना सोडिलें तसे तो तुम्हांला सोडील याची भीति नाहीं का वाटत ? जो प्रभूच्या घराचा राखणदार आहे त्याला या सर्व गोष्टी माहीत आहेत हें विसरु नका. CChMara 120.4
पूर्वी ज्यांच्याविषयी बेपर्वाई केली त्यांना परत आणण्याकरता उशीर झालेला नाहीं. म्हणून प्रीतिची व पहिल्या उत्साहाची धर्मजागृति होऊ द्या. तुम्हीं ज्यांना हाकलून दिले त्यांचा शोध करा, तुम्ही केलेल्या जखमा कबूल करून बांधून टाका. दयाळू तारकाच्या प्रीतीकडे जवळ या, आणि दैवी कृपेचा प्रवाह तुम्हांमधून वाहू द्या व तुम्हांकडून इतरांना मिळू द्या. तारकाच्या प्रीतीकडे जवळ या, आणि दैवी कृपेचा प्रवाह तुम्हांमधून वाहू द्या व तुम्हांकडून इतरांना मिळू द्या. तारकाच्या स्वत:च्या मौल्यवान् जीवितांत जी दया व कळकळ होती ती विशेषेंकरून ख्रिस्ती भावाला वागविण्याच्या बाबतींत उदाहरणादाखल असूं द्या. CChMara 120.5
जीविताच्या झगड्यांत पुष्कळजण निराश होऊन त्यांना मूच्र्छा आली आहे. त्यांना दयेच्या एका शब्दाने व उत्तेजनदायक शब्दाने विजय मिळविण्यास शक्ति प्राप्त झाली असती. केव्हांहि निर्दय, थंड सहानुभूति व निंदाशील होऊ नका. आशा निर्माण करण्यास व धैर्य देण्यास लागणारा शब्द बोलण्याची संधि कधीही गमावू नका. आमचे दयेचे शब्द किती दूर पोहचणार आहेत तें आम्हांला माहीत नाहीं कारण ख्रिस्तासारख्या कार्याद्वारे त्यांचे ओझे हलकें होईल, जे चुकलेले आहेत तें सौम्यतेने, दयेने व प्रेमाने जिंकले जातील तितके दुसर्य कोणत्याही उपायाने जिंकले जाणार नाहींत. 3 CChMara 121.1