कलीसिया के लिए परामर्श

76/318

प्रकरण १५ वें - चुका करणार्‍यावर उपाय

सवाँना प्राप्त होणारे तारण देण्यास ख्रिस्त आला. कॅलव्हरीच्या क्रूसावर त्यानें जगाकरता अमर्याद उद्धाराची किंमत भरून दिली आहे. त्याचा स्वनाकार व त्याचे स्वार्पण, त्याची नि:स्वार्थी सेवा, त्याची नम्रता व त्यापेक्षा श्रेष्ठ गोष्ट म्हणजे स्वत:च्या प्राणाचे बलिदान या सर्व गोष्टीवरून पतित मानवावरचे अगाध प्रेम दिसून येते. जे हरवलेले आहेत त्यांना शोधण्यास व तारावयास तो या पृथ्वीवर आला. त्याचे कार्य प्रत्येक राष्ट्र, भाषा व प्रत्येक प्रकारच्या पाप्याकरता होतें त्यानें सर्वांकरिता किंमत भरून दिली व स्वत:ची सहानुभूती व एकिकरण याप्रत प्रत्येकाला आणून त्यानें खंडणी भरून दिली. अगदीं पापिष्ट व बहकलेले याकडे त्यानें कानाडोळा केला नाही. त्याचे कार्य विशेष प्रकारे ज्यांना तारणाची गरज आहे त्यांच्याकरता होतें. जितकी त्याची सुधारणा करून घेण्याची आवश्यकता होती तितकी त्याची मोठी आवड, मोठी सहानुभूति कळकळीचे कार्य होतें. ज्यांची स्थिति आशाहीन असून ज्यांना पालट घडवून आणणाच्या त्याच्या कृपेची गरज होती अशांच्यासाठी त्याचे दयाळू अंत:करण द्रवले. CChMara 119.1

तरी आम्हांमध्यें असें लोक आहेत कीं, ज्याच्यामध्ये खोल कळकळीची व आत्म्याला स्पर्श करण्याची सहानुभूति व चुकणार्‍यविषयी व मोहात पडलेल्याविषयी प्रेम कमी आहे. ज्याना मदतीची गरज आहे त्याच्या बाबतींत दुसर्‍य बाजूला जात असतां ख्रिस्ताचे प्रतिनिधी या नात्याने पुष्कळांनी मोठा थडपणा व पापिष्ट निष्काळजीपणा दर्शविला आहे. नवीन पालट झालेला आत्मा नेहमी आपल्या नेहमीच्या सवयींशी व विशेष प्रकारच्या महाशी झगडत असतो व अशा कठीण वासनेने किंवा वृत्तीने त्यांच्यावर विजय मिळविल्यावर तो चुकीचे कृत्य करण्याच्या बाबतींत व विवेकहीनतेच्या बाबतींत दोषी होतो अशा प्रसंगी त्याच्या भावाकडून शहाणपण, खुबी व शक्ति याची त्याला गरज भासते अशासाठीं कीं त्याला आत्मिक आरोग्य प्राप्त व्हावे अशाच्या बाबतींत देवाच्या वचनाचा सल्ला लागू आहे. “बधुजनहो, कोणी मनुष्य एखाद्या अपराधांत सांपडला तरी जे तुम्ही आत्मा पावलेले आहा तें तुम्हीं अशाला सौम्य भावाने ताळ्यावर आणा. तूहि परिक्षेत पडू नये याविषयी स्वत: संभाळ’ गलती ६:१. “आपण जे सबळ आहों त्या आपण दुर्बलांची दुर्बलता सोशिली पाहिजे. आपल्याच सुखाकडे पाहूं नये.” रोम १५:१. 1 CChMara 119.2

मृदु उत्तर, सौम्य उपाय व गोड शब्द यांकडून सुधारणा घडवून आणता येईल तितका कडकपणा व रागिष्टपणा याकडून आणता येणार नाहीं. थोडासा दर्शविलेला निर्दयपणा याकडून माणसें तुमच्या कक्षेबाहेर जातील, पण मनधरणी करून त्यांना एकत्र बाधले जाईल. तुम्ही त्यांना योग्य मार्गात स्थिर करूं शकता. तुम्ही क्षमेची वृत्ति धारण करून त्याला प्रवृत्त करुं शकता व तुमच्या सभोंवती असणार्‍यची कृति व चांगला हेतु याची वाहवा करुं शकता. 2 CChMara 119.3