कलीसिया के लिए परामर्श

75/318

आपले विचार देवावर केंद्रीय होतील असा पोशाख करा

आपल्या पोशाखात सर्व कांहीं व्यवस्थित, स्वच्छ व नीटनेटके असावे. पण पवित्रस्थानात घालण्यास योग्य नाहीं अशा बाह्य पोशाखात गुगून जाऊ नये. आपल्या पोशाखाचे प्रदर्शन नसावें कारण त्याकडून देवाविषयीं पूज्यभाव दिसून येत नाही. आपल्या भपकेबाज पोशाखाकडे लोकाचे लक्ष वेधले जाते व उपासकांच्या मनांत जे विचार असू नयेत तें येतात. देवच फक्त विचारांचा व भक्तीचा विषय असावा. ज्याकडून गंभीर व पवित्र उपासनेपासून मन वेधले जाते त्याकडून देवाचा अपमान होतो. CChMara 117.7

पोशाखाच्या सर्व बाबतीत कडकरीत्या काळजी घेतली पाहिजेत त्यांत पवित्रशास्त्राचा नियम अंमलात आणला पाहिजे. फॅशन ही जगावर सत्ता चालविणारी देवता बनली आहे. ती नेहमी मंडळींत हळहळ शिरकाव करते. मंडळीने देवाचे वचन आपला दर्जा बनवावा. आईबापानी काळजीपूर्वक याविषयी विचार करावा. तेव्हां त्यानी अब्राहामाप्रमाणे आपल्या घराण्याला आज्ञा करावी. जगाबरोबर समरूप होण्याऐवजी त्यांचा देवाशी संबंध जोडावा. कोणीही भपकेबाज पोशाखाद्वारे मंदिरात देवाचा अपमान करूं नये. देव व दूत तेथें आहेत. पवित्र परमेश्वर आपल्या प्रेषिताद्वारे बोलला आहे. “तुमची शोभा केसांचे गुफणे, सोन्याचे दागिने घालणे किंवा पोशाख करणे यांनी बाहेरून आणलेली नसावी. तर जो सौम्य व शांत आत्मा देवाच्या दृष्टीने बहुमूल्य आहे त्यानें म्हणजे अंत:करणांतील गुप्त मनुष्यपणाने जी अविनाशी शोभा ती असावी.” १ पेत्र ३: ३, ૪ 8 CChMara 118.1

*****