कलीसिया के लिए परामर्श

74/318

मुलांनी पूज्य भावना धरावी.

आईबापांनो, तुमच्या मुलांच्या मनात ख्रिस्ती धर्माचा दर्जा उंच करा. त्यांच्या अनुभवांत ख्रिस्त गोवण्यास मदत करा. देवाच्या घराविषयी उच्च पूज्यभाव बाळगण्यास त्यांना शिकवा जेव्हां ती मंदिरात प्रवेश करतात तेव्हां “देव येथे आहे व हें त्याचे घर आहे’ या विचाराने त्याचे अंत:करण मृदु होऊन त्यांनी प्रवेश करावा. मीं पवित्र विचार व पवित्र हेतु बाळगला पाहिजे. मजमध्ये गर्व, मत्सर, हेवा, ठकबाजी नसावी कारण मी पवित्र देवाच्या समक्षतेत येत आहे, या ठिकाणींच देव आपल्या लोकांची भेट घेतो व आशीर्वाद देतो. पवित्र व श्रेष्ठ असा प्रभु मला पाहातो व माझे अंत:करण शोधतो व माझ्या जीवितांतील अगदीं गुप्त विचार व कृति तो जाणतों.” CChMara 116.2

तरुणाचे नाजूक व कोमल मन देवाच्या सेवकाच्या कार्याचा अंदाज त्यांच्या पालकाच्या याबाबतींतल्या पद्धतीद्वारे मिळवू शकतात पुष्कळ कुटुंब प्रमुख आपल्या घरांत एक टीकेचा विषय बनवितात व कांही गोष्टी पसत करून बाकीच्याना दोष देतात. याप्रमाणे देवाचा मानवाला जो संदेश असतो त्याची टीका होतें व त्याविषयी शंका निर्माण होतात व तो निदेचा विषय बनतो. निष्काळजीपणाने व अपूज्य भावनेने काढलेल्या उद्गाराद्वारे तरुणावर कोणता परिणाम होणार आहे हें स्वर्गीय पुस्तकेंच दाखवतील. या गोष्टी आईबापापेक्षा मुलांना फार त्वरित दिसतात व समजतात. त्यांच्या नैतिक भावनात चुकीचे वळण लागल्यावर कधींही तें बदलू शकत नाहीत. आईबापांना त्याच्या मुलांच्या अंत:करणाच्या कठीणपणामुळे व त्यांच्या धार्मिक भावना जागृत करण्याच्या अडचणींमुळे दु:ख होतें. 4 CChMara 116.3

देवाच्या नावाबद्दल पूज्यबुद्धि दर्शविली पाहिजे. या नावाचा उच्चार अविचाराने किंवा निष्काळजीपणाने करुं नये. प्रार्थनेंतसुद्धा त्याच्या नावाचा पुनरुच्चार टाळावा. “पवित्र व भययोग्य त्याचें नाम आहे.” (स्तोत्र १११:९) दूत त्याचा उच्चार करतांना आपली तोंडे झाकून घेतात. मग आपण जे पापी व पतित मानव, त्या आपण किती पूज्यभावाने हें नांव उच्चारले पाहिजे. CChMara 117.1

आम्हीं देवाच्या वचनाविषय पूज्यबुद्धि दाखवावी. आम्हीं छापलेल्या ग्रंथाविषयी पूज्यबुद्धि दाखवावी व त्याचा साधारण रीतीनें उपयोग करुं नये आणि पवित्रशास्त्राचा गमतीने कांही म्हणीसाठी उपयोग करूं नये.” देवाचा प्रत्येक शब्द पवित्र आहे.” “भट्टींत सातपट तापविलेल्या चांदीसारखे आहे.” (नीति ३०:५; स्तोत्र १२:६.) CChMara 117.2

यापेक्षा मुलांना शिकवावे कीं, आज्ञापालनाद्वारे खरा पूज्यभाव दर्शविला जातो. देवाने अनावश्यक गोष्टींची आज्ञा दिलेली नाहीं व देव जे बोलला आहे त्याचे पालन केल्याशिवाय दुसर्‍य कशानेहि देवाला आनंद होत नाही. CChMara 117.3

देवाच्या प्रतिनिधीबद्दल पूज्यबुद्धि दर्शवावी. पाळक, शिक्षक, आईबाप हें त्याच्याऐवजी बोलण्यास व आचरण करण्यास देवाने बोलाविलेले आहेत. त्यांना दिलेल्या मानाकडून देवाचा मान होतो. 5 CChMara 117.4

लहान थोर व्यक्तींनी शास्त्रातील देवाची समक्षता दर्शवणार्‍य शब्दावर विचार करावा. तुझ्या पायांतून पायतण काढ,’ ही आज्ञा परमेश्वराने जळत्या झुडूपांतून मोशाला दिली. कारण ज्या जागेवर तू उभा आहेस ती पवित्र भूमि आहे.’ (निर्गम ३:५) दूतांचा दृष्टांत पाहिल्यावर याकोबाने म्हटले “देव या ठिकाणी आहे आणि हें परमेश्वराचे गृह आहे व स्वर्गाचे द्वार आहे.” (उत्पत्ति २८:१६,१७) 6 CChMara 117.5

आम्ही उदाहरणाने व नियमानें असें दर्शविले पाहिजे कीं, तुम्ही तुमच्या विश्वासाविषयीं, पवित्र गोष्टींविषयीं पूज्यबुद्धीने बोलून पृज्यभाव दाखवावा. पवित्रशास्त्रांतून बोलतांना निष्काळजीपणाने व हलकेपणाने उच्चार करुं नये. पवित्रशास्त्र हातांत घेतल्यावर हें लक्षात ठेवावें कीं आपण पवित्र भूमीवर उभे आहोत, देवदूत आपल्याभोवती आहेत व तुमचे डोळे उघडले तर तुम्हांला तें दिसतील. ज्याच्याशी तुमचा सबंध येतो त्यांना तुमचे आचरण असें दिसूं द्या कीं, त्याकडून तुमच्याभोवती पवित्र वातावरण आहे. एका व्यर्थ शब्दाद्वारे व गमतीच्या हास्याद्वारे आत्म्यांना चुकीचा मार्ग दाखवला जाईल. देवाशी सतत दळणवळण न ठेवल्याने फार भयंकर परिणाम होतात. 7 CChMara 117.6