कलीसिया के लिए परामर्श

73/318

देवाची प्रत्यक्ष समक्षता आहे असें समजून वागा

त्याचा अमर्याद मोठेपणा व त्याची समक्षता ही गृहित धरल्याने खरा पूज्यभाव निर्माण होतो. अशा अदृश्य देवाच्या पूज्य भावनेने प्रत्येकाच्या अंत:करणावर हा परिणाम झाला पाहिजे. प्रार्थनेचे ठिकाण व वेळ पवित्र आहे. कारण तेथें देव आहे. वृत्तींत व आचरणांत पूज्यभाव दर्शविल्यानंतर चेतनायुक्त भावना उंचावल्या जातील. स्तोत्रकर्ता म्हणतो, “नाम पवित्र व भययोग्य आहे.” स्तोत्र. १११:९. 3 CChMara 115.4

प्रार्थनेनें सभेला सुरवात झाल्यावर पवित्र प्रभूच्या समक्षतेत प्रत्येक गुडघा टेकला जावा व गुप्त प्रार्थनेत प्रत्येक अंत:करण देवाकडे उंचावले जावें. विश्वासू उपासकांची प्रार्थना ऐकिली जाईल. वचनाची सेवा परिणामकारक होईल. देवाच्या मंदिरांत निर्जीव अशी उपासकांची वृत्ति असल्यामुळे चांगल्या गोष्टींत सेवा फलदायी होत नाही. गायनाचा गोड आवाज प्रत्येकाच्या अंत:करणांतून स्पष्ट असा बाहेर येणें हें एक आत्म्याच्या कार्याचे साधन आहे. सर्व उपासना गांभीर्याने व शांततेने भरवाव्या, अशा कीं मंडळी प्रभूच्या समक्षतेत आहे असें गृहित धरून सभा भरवाव्या. CChMara 115.5

जेव्हां वचन सांगण्यांत येते तेव्हां तुम्हीं लक्षात ठेवावे कीं, देवाच्या निवडलेल्या सेवकाद्वारे त्याची (देवाची) वाणी ऐकत आहां. लक्ष देऊन ऐका. कधींही झोपू नका कारण तसे केल्याने तुम्हांला जरुर असलेल्या ज्या शब्दाकडून चुकीच्या मार्गाला जाण्यापासून तुम्ही तुमचे पाय वाचवू शकाल त्या शब्दाला तुम्ही मुकाल. सैतान आणि त्याचे दूत अशी परिस्थिती निर्माण करण्यांत गुंतले आहेत कीं, त्याकडून त्यांचा सद्सद्विवेक पगू केला जाऊन इशारा, सूचना व धमक्या ऐकल्या जाणार नाहींत. जरी एकल्या तरी त्याचा परिणाम अंत:करणावर करून घेऊन जीवितांत सुधारणा करून घेणार नाहींत. कधीं कधीं एखादे लहान बाळ श्रोत्याचे लक्ष इतकें वेधून येईल कीं मौल्यवान् बीं चागल्या मातीत पडून फळ देणार नाही. कधीं कधीं तरुण मुलें व मुली यांना देव व त्याचे मदिर याविषयी इतका थंडा पूज्यभाव असतो कीं, उपासनेच्या वेळांत त्याची सारखी कुजबुज चालते. आपल्या कृत्याकडे व वागणुकीकडे पाहाणारे देवाचे दूत त्यांना जर दिसलें तर त्यांना स्वत:बद्दल लाज वाटेल व स्वत:चा वीट येईल. लक्ष देऊन ऐकणारे देवाला पसंत आहेत. जेव्हां मनुष्यें झोपली तेव्हां सैतानाने आपले निदण पेरिलें. CChMara 115.6

जेव्हां शेवटला आशीर्वाद देण्यांत येतो. तेव्हां सर्वांनी शांत असावे. ख्रिस्ताची शांति गमावेल ही भीति धरून शात राहावे. सर्वांनी मोठ्यानें न बोलता व न खिदळता बाहेर जावें. कारण तें देवाच्या समक्षतेत आहेत असें त्यांना वाटावे, व तो त्यांना पाहात आहे व त्याच्या दृश्य समक्षतेत असल्याप्रमाणे वागावें. सभास्थानाच्या कोणत्याही दालनात गप्पा मारण्यास व भेटण्यास थाबू नये. याकडून इतरांना बाहेर जाण्यास अडथळा होईल. देवळाचें आवारात पवित्र पूज्यभावना असावी. आवारात जगिक व्यवहाराविषयी व रोजच्या गोष्टी करण्यास किंवा जुन्या मित्रांना भेटण्यास जागा नसावी. या गोष्टी देवळाच्या बाहेर टाकाव्या. देव आणि त्याचे दूत याचा निष्काळजीनें, मोठ्या हसण्याने व पायाच्या आवाजात अपमान होतो. CChMara 116.1