कलीसिया के लिए परामर्श

72/318

देवाच्या मंदिरातील प्रार्थनेची वृत्ति

जेव्हां सभास्थानीं भक्तजन प्रवेश करतात तेव्हां त्यांनी पूज्यभावनेने प्रवेश करावा. शांत रीतीने आपल्या जागेवर बसावे, जर खोलींत स्टोव्ह असेल तर त्याभोवती निष्काळजीपणाने गर्दी करुं नये. मोठ्यानें कुजबुजणे हसणे या गोष्टी उपासनेच्या ठिकाणी करुं देऊ नयेत. विशेषत: उपासनेच्या आरभी किंवा शेवटीं करुं नयेत. कार्यक्षमता व उत्सुकता किंवा कडक धार्मिकता उपासकाचा स्वभाव व्यक्त करते. CChMara 114.3

जर कांही जणांना थोडा वेळ सभा चालूं होण्यासाठी वाट पाहावी लागेल तर त्यांनी भक्तीची वृत्ति धारण करून मनन करावे. प्रार्थनेत देवाकडे आपले मन लावावे व त्याद्वारे दुसर्‍य आत्म्याना खात्री पटण्यास व त्यांचा पालट होण्यास व स्वत:च्या अंत:करणाला आशीर्वाद लाभण्यासाठी प्रार्थना करावी. स्वर्गीय निरोपे देवाच्या घरात आहेत हें त्यांनी लक्षात ठेवावे. गडबड करण्याने व प्रार्थनेला उत्तेजन न दिल्याने देवाशी होणारे गोड दळणवळण गमावून बसतो. आमची आत्मिक स्थिति वेळोवेळीं तपासून पाहिली पाहिजे. त्याकडून आमचे मन व अंत:करण धार्मिकतेचा सूर्य त्याकडे ओढले गेले पाहिजे. CChMara 114.4

जर लोकांनी उपासना मंदिरात येतांना प्रभूसाठी खास पूज्यभाव दाखविला आणि तें त्याच्या समक्षतेत आहेत हें मनांत बाळगले तर शांतरीतीने फार गोड भाषण होईल. कुजबुज करणे, हसणे व बोलणे रोजच्या व्यवहारांत पापविरहित असू शकेल पण देवाची भक्ति चालते तेथें या गोष्टींत पावित्र्य असू शकणार नाहीं. देवाचे वचन ऐकण्यासाठी मन तयार केले पाहिजे. अशासाठीं कीं त्यांचे वजन योग्यरित्या इतर अंत:करणावर पडावें. CChMara 115.1

जेव्हां पाळक आंत प्रवेश करतो तेव्हां त्यानें गंभीर व उजळ चर्येने आंत प्रवेश करावा. त्यानें आंत व्यासपीठावर प्रवेश करताच मान वाकवून गुप्त प्रार्थना करावी व कळकळीने देवाचे साहाय्य मागावे. याकडून किती चांगला परिणाम होईल ! लोकांमध्ये गांभीर्य व शांतता निर्माण होईल. त्यांचा पाळक देवाशी संबंध ठेवीत आहे. लोकांपुढे उभे राहाण्याअगोदर तो स्वत:ला देवाच्या स्वाधीन करतो. सर्वांना गांभीर्य प्राप्त होतें. देवाचे दूत अगदी जवळ आणले जातात. मंडळींतील प्रत्येकाने मान वाकवून पाळकाबरोबर गुप्त प्रार्थना करण्यांत भाग घ्यावा अशासाठी कीं देवाने सभेवर आशीर्वाद पाठवावा व मानवी ओठांतून त्याच्या सत्याची घोषणा होण्यासाठी सामर्थ्य पुरवावें. 1 CChMara 115.2

सभा व प्रार्थना कंटाळवाण्या नसाव्या. होता होईल तो सर्व नेमलेल्या वेळेत व्हावे आणि जर जादा वेळ घेणारे असतील तर म्हणजे वेळेपेक्षा १५ मिनिटे किंवा अर्धा तास उशीर करणारे असतील तर कोणी थांबू नये. जर दोनच हजर असतील तर तें वचनाची मागणी करूं शकतात. म्हणून सभा नेमलेल्या वेळी सुरु करावी. मग तेथें थोडे जमोत किंवा जास्त जमोत. 2 CChMara 115.3