कलीसिया के लिए परामर्श
पवित्रिकरणाचे खरे पुरावे
आपला तारणारा जगाचा प्रकाश होता. तरी जगाने त्याला जाणिलें नाहीं. तो सतत दयेच्या कार्यात गुंतला होता. व सर्वांच्या मार्गावर प्रकाश पाडींत होता तरी ज्यांच्याशी त्याचा संबंध आला त्यांना त्यानें गैर नमुन्याचे गुण पाहाण्यास सांगितलें नाही, तसेच त्याचा स्वार्थत्याग, स्वार्पण व परोपकारी गुण पाहाण्यास सांगितलें नाहीं, यहद्यांना अशा प्रकारच्या जीविताकडून कौतुक वाटले नाही त्यांना त्याचा धर्म निरर्थक वाटला. कारण तो त्यांच्या धार्मिकतेशी जुळत नव्हता. त्यांनी ठरवून टाकलें कीं, ख्रिस्त हा आत्म्याने व शीलाने धार्मिक नाही, कारण त्यांच्या धर्मात डामडौल, चव्हाट्यावर प्रार्थना करणे व आपल्या फायद्याकरिता परोपकाराची कामे करणे या गोष्टींचा समावेश होता. CChMara 94.2
पवित्रीकरणाचें सर्वात मौल्यवान फळ म्हणजे सौम्यता होय. जेव्हां हा गुण आत्म्यात बसतो तेव्हां त्याच्यायोगे स्वभाव बनतो. देवाची सतत याचना व त्याच्या इच्छेला सतत वश होणे चालूं असतें. CChMara 94.3
ज्यांचा देवाशीं खर्य रीतीने निकटचा संबंध आला आहे तें स्वनाकार, स्वार्पण, परोपकारीपणा, दयाळूपणा, प्रीति, सहनशीलता व धैर्य आणि ख्रिस्ती विश्वास हें गुण रोज अगी धारण करतील त्यांची कृत्ये जगाला जाहीर केली जाणार नाहीत पण तें रोज वाईटाशीं झगडतील व वाईट गोष्टीवर व मोहावर मौल्यवान् जय मिळवितील गंभीर प्रतिज्ञा पुनः करण्यांत येईल व त्याकळकळीच्या प्रार्थनेद्वारे व सतत सावध राहण्याने जी शक्ति प्राप्त होईल तिच्याद्वारे जी राखिली जाईल. त्या शांत कामगारांची खटपट उत्साही मनुष्याला कळत नाहीं; पण जो अंत:करणातील रहस्ये पाहातो त्याचे नेत्र सौम्यतेने व नम्रपणे केलेली खटपट पसंत करून त्याकडे लक्ष पुरवितात. शीलातील विश्वास व प्रीति याचे शुद्ध सोनें प्रगट होण्यास कसोटी लागते. जेव्हां मंडळीवर दु:खे व संकटे येतात तेव्हां भक्कम आवेश व ख्रिस्ताच्या अनुयायांची खरी शक्ति वाढली जाते. CChMara 94.4
जे सर्व खर्या धार्मिक मनुष्याच्या नैतिक संबधात येतात त्यांना त्याच्या ख्रिस्ती जीवितांतील सगंध व सौदर्य दिसन येतात. त्याला तें समजून येणार नाही. कारण तें त्याच्या संवयी व वत्ति यावर अवलंबून आहेत तो दैवी प्रकाशासाठी याचना करतो व त्या प्रकाशात चालण्याची आवड धरतो. आपल्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे करणे हें त्याचे अन्न व पाणी असतें. देवामध्ये ख्रिस्ताबरोबर त्याचे जीवित लपलेले असतें, तरी तो त्याची फुशारकी मारीत नाहीं. कीं त्याविषयी काळजी करीत नाहीं. जे नम्र व लीन असून आपल्या धन्याच्या पावलावर पाऊल टाकून चालतात त्याच्याविषयी देव आनंद मानतो. दूत त्यांच्याकडे आकर्षिले जातात व त्या मार्गावर व सभोवती राहाण्यास त्यांना आवडते. जे आपली सत्कृत्ये मोठी महत्त्वाची आहेत असें दर्शविण्यांत आनंद मानतात व मोठाली कार्ये करणारे आहो असें म्हणतात तें लक्ष पुरविण्यास अपात्र या नात्याने निघून जातात; पण स्वर्गीय दृत त्यांच्याभोवती अग्नीच्या भिंतीसारखे होऊन त्याजवर प्रेमाची पाखर घालतात. 7 CChMara 94.5