कलीसिया के लिए परामर्श

52/318

प्रकरण ११ वे - पवित्र केलेलें जीवित

आमचें जें सर्व आहे त्याची तारणारा मागणी करतो. तो आमचे पवित्र विचार प्रथम मागतो. आमची शुद्ध व फार मोठी आवडहि मागतो. जर आम्ही खरोखर त्याच्या दैवी स्वभावाचे विभागी आहोत तर त्याची स्तुति सतत आमच्या ओठावर, आमच्या अंत:करणांत राहाणार आहे. आमचे संरक्षण होणार आहे. आमचे संरक्षण फक्त त्याला शरण जाण्यांत व सतत त्याच्या कृपेंत व सत्याच्या ज्ञानांत वाढत जाणे यांत आहे. 1 CChMara 92.1

पवित्र शास्त्रात नमूद केलेले पवित्रिकरण याचा सर्व व्यक्तीत्वाशीं म्हणजे आत्मा, शरीर व जीव यांशी संबंध आहे. पूर्ण समर्पणाची जरी योजना अशी आहे. पौल अशी प्रार्थना करतो कीं, थेस्सलनिका येथील मंडळीला हा महान आशीर्वाद प्राप्त व्हावा. तोच शातीचा देव तुम्हांला पूर्णपणे पवित्र करो, आणि मी देवाची प्रार्थना करतों, कीं, आपला प्रभु येशू ख्रिस्त यांच्या येण्यापर्यंत आत्मा, जीव व शरीर हीं यथासांग निर्दोष अशीं राखिली जावोत.” (१ थेस्स. ५:२३.) CChMara 92.2

धार्मिक जगांत पवित्रकरणाचे एक तत्त्व आहे तें मुळांतच खोटे असून त्याचा परिणाम धोक्याचा आहे. जे पुष्कळ बाबींत पवित्रीकरण आहे असें म्हणतात त्यांच्यात खरें पवित्रीकरण नसते. त्यांचे पवित्रीकरण बोलण्यांत व स्वच्छतेच्या भक्तींत दिसून येतें. CChMara 92.3

ते सारासार विचार व कारणमिमासा बाजूला ठेवून पूर्णपणे आपल्या भावनांवर अवलंबून राहातात. त्याच्या पवित्रीकरणाच्या मागण्या त्यांनी कधीतरी उपभोगिलेल्या भावनावर आधारलेल्या असतात तें आपल्या करारी अशा पवित्रपणाच्या मागण्यांत हुट्टी व चिडखोर असतात, पण पुराव्यादाखल काहीं मौल्यवान् फळें देत नाहींत. नावांचे पवित्रीकरण प्राप्त झालेली माणसें फक्त स्वत:च्या आत्म्याची फसवणूक करतात असें नाही, पण जे देवाच्या इच्छेला दृढ धरून राहाण्याची इच्छा करतात अशा माणसांना दूर घालवून देण्यास कारणीभूत होतात. देव मला चालवितो ! “देव मला शिकवितो! मी पापविरहित जीवन जगत आहे!” असें पुन: पुन: म्हणतांना ऐकतो. या वृत्तीच्या माणसाशीं ज्यांचा संबंध येतो त्याची कांही रहस्यमय व न समजणाच्या अधाच्या अशा गोष्टीशी गाठ पडते. खरा नमूना जो ख्रिस्त त्याच्या उलट ती गोष्ट असते. 2 CChMara 92.4

पवित्रकरणाची बाब गतीमान असतें. पेत्राने आपल्या शब्दांत क्रमवार पायच्या आपल्यापुढे मांडिल्या आहेत. याच कारणाने तुम्हीं होईल तितका प्रयत्न चालवून आपल्या विश्वासात सात्विकत्तेची, सात्विकतेत ज्ञानाची, ज्ञानात इंद्रियदमनाची, इद्रियदमनांत धीराची, धीरांत सुभक्तीची, सुभक्तींत बंधुप्रीतीची व बंधुप्रीतींत प्रीतीची भर घाला; कारण हें गुण तुम्हांमध्ये असून वाढते असले तर, आपला प्रभु येशु ख्रिस्त यांच्या ज्ञानाविषयी तुम्ही निरुद्योगी व निष्फळ होऊ नये असें तें तुम्हांस करतील.” (२ पेत्र १:५-८). “यास्तव बंधूनो, तुम्हांस झालेले पाचारण व तुमची निवडणूक त्यासंबंधाने खात्री करून घेण्याबद्दल विशेषत: प्रयत्न करा असें तुम्ही केल्यास तुमचे पतन कधीच होणार नाहीं; आणि तशा प्रकारे आपला प्रभु तारणारा येशू ख्रिस्त याच्या सार्वकालिक राज्यांत प्रशस्तपणें तुमचा प्रवेश होईल.” (१०-११). CChMara 92.5

ज्याकडून आम्ही पतन पावणार नाहीं अशाची माहिती येथे दिली आहे. ख्रिस्ती सद्गुण प्राप्त करून घेण्यासाठी जे योजना करतात, त्यांना खात्री आहे कीं, देव आपल्या आत्म्याचीं दाने बहत प्रमाणांत देण्याच्या बाबतींत कार्य करील. 3 CChMara 93.1

पवित्रकरणाचें कार्य एका क्षणाचे किंवा एका तासाचें किंवा एका दिवसाचें नाहीं. सद्गुणात सतत वाढण्याचे तें कार्य आहे. आमचा पुढील लढा एके दिवशी किती बळकट होईल हें आम्हांला माहीत नाहीं. सैतान जिवंत आहे आणि कार्यात गुंतला आहे म्हणून प्रत्येक दिवशी कळकळीने देवाजवळ आराधाना करून सैतानाला मागें हटविण्यासाठी शक्ति व साहाय्य मागितले पाहिजे. जोपर्यंत सैतान राज्य करतो तोपर्यंत आम्ही स्वला कह्यांत आणले पाहिजे, मोहाला जिंकले पाहिजे व थांबण्याचे ठिकाण नाहीं. असा एकहि मुद्दा नाही कीं आम्ही म्हणू शकू, आम्ही पूर्णपणे तो सिद्धीस नेला आहे. CChMara 93.2

ख्रिस्ती जीवित हें सतत पुढे जाण्याची बाब आहे. येशू आपल्या लोकांना शुद्ध करणार व कसास असा लावणारा आहे. जेव्हां त्याचे प्रतिरूप त्यांच्यात उतरेल तेव्हां तें पूर्ण आणि पवित्र होऊन त्याच्या बरोबर बदल होऊन जाण्यास तयार होतील. ख्रिस्ती लोकांना महान कार्य करायचे आहे. आम्ही सर्व प्रकारच्या दैहिक व आत्मिक घाणेरडेपणापासून स्वत:ला निर्मळ करावे असा आम्हांला बोध करण्यांत आला आहे. देवाच्या भयात पवित्रतेची पूर्णता करावी. येथे आम्हांला महान् कार्य काय आहे तें समजून येते. ख्रिस्ती लोकांकरितां सतत करण्याचे कार्य आहे. मुख्य फांदींतील प्रत्येक शाखेने जीवन व शक्ति मिळवून घेतली पाहिजे, अशासाठीं कीं तिने फलद्रूप व्हावे 4 CChMara 93.3

देवाच्या मागण्यापैकी एखाद्या मागणीची आम्ही जर पायमल्ली करीत असू तर देव आम्हांला आशीर्वाद देईल व आमच्या पापांची क्षमा करील अशा भावनेने कोणी स्वत:ची भूलवणूक करून घेऊ नये. जाणून बुजून केलेले पाप आत्म्याच्या साक्षीची वाणी बंद करते व आत्म्याला देवापासून वेगळे करते. आमच्या धार्मिक भावनांचा परमानंद कितीही असला तरी जें अंत:करण दैवी नियमांचे उल्लंघन करते त्या अंत:करणात येशू वस्ती करून राहाणार नाही. जे । मान देतात त्यांचाच देव मान करील. 5 CChMara 93.4

जेव्हां पौलाने लिहिलें कीं, “तोच देव तुम्हांला पूर्णपणे पवित्र करो.” (१ थेम्स ५:२३.) तेव्हां त्यानें भावांना जो दर्जा गाठता येणार नाहीं तो गाठण्यासाठी बोध केला नाहीं. देव देऊ इच्छित नाही तो आशीर्वाद मिळण्यासाठी त्यानें प्रार्थना केली नाही त्याला माहीत होतें कीं, ख्रिस्ताला शांतीने भेटण्यासाठी जे लायक होतील त्यांनाच शुद्ध व पवित्र शील प्राप्त होईल (१करिं ९:२५-२७; १ करिंथ ६:१९, २० वाचा) CChMara 93.5

खरें ख्रिस्ती तत्त्व बरे वाईट परिणाम अजमावून पाहाण्याचे थांबवीत नाहीं. हें मी केले तर लोक काय म्हणतील असें विचारीत बसत नाही किंवा मी हें केले तर माझे जगक भवितव्य काय होईल? असें विचारीत बसत नाहीं पण देवाचे लोक मोठ्या आशेने आम्ही काय केल्याने देवाचे गौरव हाइल हें जाणण्याची आशा धरतात. देवाने इतकी मोठी तरतूद करून ठेविली आहे कीं, आपल्या अनुयायांची अंतकरणे व जीविते दैवी कृपेने ताब्यात ठेविली जाऊन त्यांनी जळते व प्रकाश देणारे जगांतील दीप बनावे. 6 CChMara 94.1