कलीसिया के लिए परामर्श
दानीएल हा पवित्र जीविताचा नमुना
दानीएलाचें जीवित हें पवित्र केलेल्या जीविताचे एक प्रेरणादायक उदाहरण आहे याकडून सर्वांना धडा मिळतो व विशेषेकरून तरुणांना धडा शिकायला मिळतो. देवाच्या मागण्यांची कडक मान्यता ही मनाच्या व शरीराच्या आरोग्यासाठी फायद्याची आहे. नैतिक व बौद्धिक कार्याचा उच्च दर्जा गाठण्यासाठी देवापासून शक्ति व शहाणपण मागणे अगत्याचे आहे व आयुष्यातील सर्व संवयांत कडक नियमितपणा राखणेहि अगत्याचे आहे. 8 CChMara 95.1
दानीएलाचे जितकें अधिक निर्दोषी आचरण दिसून आलें तितक्या अधिक प्रमाणात त्याच्या शत्रूनी त्याचा द्वेष केला. तें दुष्टाईने भरले होतें कारण त्यांना त्याच्या नैतिक आचरणांत किंवा त्याच्या रोजच्या कार्यात त्याच्याविरुद्ध तक्रार करण्यासारखे त्यांना कांही आढळून आलें नाहीं. तेव्हां ती मनुष्यें म्हणाली, या दानीएलाविरुद्ध कांही निमित्त काढता येणार नाही, मात्र त्याच्या देवाच्या नियमासंबाने त्याच्याविरुद्ध कांही निमित्त काढता आलें तर येईल.’ (दानी ६: ५) CChMara 95.2
या ठिकाणी किती चागला धडा सर्व ख्रिस्ती लोकांसाठी दिलेला आहे. मत्सरी लोकांचे डोळे दररोज दानीएलाकडे लागून राहिले होतें त्याच्या द्वेषामुळे तें त्याच्यावर कडक पाळत ठेवून होतें. तरी एक शब्द किंवा एक कृति त्याच्या जीवितांत चुकीची आहे असें तें दर्शवू शकले नाहीत. तरीही त्यानें पवित्रीकरणाची ग्वाहि दिली नाहीं; पण त्यानें जे खरे व योग्य आहे तेच केले व तो समर्पणाचे व विश्वासूपणाचे जीवित जगला. CChMara 95.3
राजानें फर्मान काढले. दानीएलाला त्याच्या शत्रूच्या घाताची हेतु कळला, पण तो कोणत्याही क्षुल्लक बाबीत बदलत नाहीं तो शांत रीतीने आपले रोजचे काम करतो आणि प्रार्थनेच्या वेळीं तो आपल्या खोलीकडे जातो व आपल्या खिडक्या यरुशलेमाकडे उघड्या ठेवून तो स्वर्गीय देवाची प्रार्थना करतो. याद्वारें तो निर्भयपणे जाहीर करतो कीं, जगांतील कोणतीही सत्ता तो व त्याचा देव यामध्ये येऊ शकत नाहीं व कोणाची प्रार्थना करावी व कोणाची करूं नये हें सांगू शकत नाहीं. तत्त्वनिष्ठा थोर पुरुष ! आज तो जगापुढे ख्रिस्ती धैर्य व निस्सीम भक्ति याचे प्रशंसनीय उदाहरण म्हणून उभा राहातो. तो मनापासून देवाकडे वळतो व जरी त्याला माहीत आहे कीं त्याच्या भक्तीसाठीं मरणाची शिक्षा आहे तरी तो आपले अंत:करण देवाकडे लावतो. CChMara 95.4
“मग राजानें हुकूम सोडला व त्यांनी दानीएलाला धरून सिंहाच्या गुहेत टाकिलें. आता राजा दानीलाला म्हणाला, तू सतत तुझ्या देवाची भक्ति करतोस तर तो तुझी सुटका करील.” (ओवी १६) CChMara 95.5
दुसर्य दिवशीं सकाळीं राजा सिहाच्या गुहेकडे गेला आणि म्हणाला, “दानीएला, जिवंत देवाच्या सेवका, ज्या देवाची तू नित्य सेवा करतोस तो तुला सिहाच्या गुहेतून सोडविण्यास शक्तिमान् आहे काय?” (ओवी २०.) या भविष्यवाद्याने उत्तर केले. “हें राजा चिरायू हो. माझ्या देवाने आपल्या दृतास पाठवून सिंहांची तोंडे बंद केली आहेत. त्यांनी मला कांही इजा केली नाही त्याच्या दृष्टीने व हें राजा, तुझ्यासमोर मी निर्दोष असल्यामुळे मी काहीं पातक केले नाही.” CChMara 96.1
“मग राजाला त्याच्याबद्दल फार मोठा आनंद वाटला व त्यानें आज्ञा केली कीं, दानीएलाला गुहेतून बाहेर काढावे, मग दानीएलाला गुहेतून बाहेर काढले व त्याला कोणत्याही प्रकारची इजा झालेली आढळून आली नाही. कारण त्याचा त्याच्या देवावर विश्वास होता.” (ओव्या २२,२३.) अशा प्रकारे देवाच्या सेवकाची सुटका झाली. CChMara 96.2
त्याच्या शत्रूंन त्याच्या नाशाकरता घातलेले जाळे त्याच्या स्वत:च्या नाशाला कारणीभूत झाले. राजाच्या आज्ञेवरून त्यांना गुहेत टाकण्यात आलें व तत्क्षणीं त्या रानटी पशूनी त्यांना खाऊन टाकलें. CChMara 96.3
सत्तर वर्षांच्या गुलामगिरीचा काळ संपण्याची वेळ जशी जवळ येत चालली तसे दानालाचे मन यिर्मयाच्या भविष्याकडे मोठ्या प्रमाणात लागून राहिलें. CChMara 96.4
दानीएल स्वत:ची निस्सीम भक्ति देवापुढे मिरवीत नाही. स्वत: शुद्ध व पवित्र आहे असें म्हणण्याऐवजी हा सन्माननीय भविष्यवादी स्वत:ला त्या पापी इस्राएलांपैकी एक गणतो. देवाने त्याला दिलेले शहाणपण जगांतील थोर पुरुषापेक्षा श्रेष्ठ प्रतीचे होतें. ज्या प्रकारे दुपारच्या सूर्याचा प्रकाश एकाद्या अंधुक ताच्यापेक्षा तेजस्वी असतो त्याप्रमाणे त्याचे ज्ञान सर्वोकृष्ट होतें. त्याच्या ओठांतून बाहेर आलेली प्रार्थना देवानें पसंत केली. अगदीं खर्या नम्रतेनं ओठातून बाहेर आलेली प्रार्थना देवाने पसंत केली. अगदी खर्य नम्रतेने, अश्रु गाळीत व अंत:करण विदारून तो स्वत:साठी व आपल्या लोकांसाठी प्रार्थना करतो. तो आपला आत्मा देवापुढे खुला करतो व आपली अपात्रता कबूल करून प्रभूचा मोठेपणा व ऐश्वर्य कबूल करतो. CChMara 96.5
दानीएल प्रार्थना करीत असतां गाब्रीएल दृत स्वर्गातून खालीं येतों व तुझ्या प्रार्थना ऐकण्यांत आल्या आहेत असें सागतो व त्याचे उत्तरहि देण्यांत आलें आहे असें म्हणतो. भविष्यकाळांतील रहस्य दानीएलाला समजण्यासाठी चातुर्य व समंजसपणा देण्यासाठी या महान् दूताला हुकूम देऊन पाठविलेले असतें. याप्रकारे अगदी कळकळीने सत्य समजण्यासाठी प्रार्थना करीत असतां दानीएलाला देवाने पाठविलेल्या निरोप्याच्या सहवासात आणण्यात आलें. CChMara 96.6
त्याच्या प्रार्थनेला उत्तर म्हणून दानीएलाला व त्याच्या लोकांना आवश्यक असलेला प्रकाश व सत्य ही फक्त प्राप्त झाली असें नव्हें; पण भविष्यकाळातील महान् घटनेचा देखावा दिसला व जगाचा तारणार यांच्या आगमनाचा देखावाही दिसला जे पवित्र झालेले आहेत असें म्हणतात पण पवित्रशास्त्र शोधण्याची इच्छा बाळगीत नाहीत किंवा पवित्रशास्त्राचे सत्य स्पष्ट कळण्यासाठी प्रार्थनेत देवाशीं झोंबी खेळत नाहींत. त्याना पवित्रीकरण काय आहे हें कळत नाहीं. CChMara 96.7
दानीएल देवाबरोबर बोलला. स्वर्ग त्याच्यापुढे उघडला गेला, पण श्रेष्ठ मानमरातब त्याला जो देण्यांत आला तो त्याच्या कळकळीच्या प्रार्थनेचा नम्रतेचा परिणाम होय. जे मनापासून देवाच्या वचनावर विश्वास ठेवतात त्यांना त्याच्या इच्छेच्या ज्ञानाची तहान व भूक लागेल. देव सत्याचा कर्ता आहे. तो न समजणाच्या गोष्टी स्पष्ट करतो आणि प्रकट केलेले सत्य समजण्यास व आकलन होण्यास शक्ति पुरवितो. CChMara 97.1
जगाच्या तारणाच्याने प्रगट केलेलीं महान सत्य, जे गप्त ठेवीप्रमाणे त्याचा शोध करतात त्यांच्यासाठी आहेत. दानीएल वृद्ध मनुष्य होता. त्याचे आयुष्य विधर्मी राज्याच्या मोहक दरबारात गेले होतें. त्याचे मन महान् साम्राज्याच्या व्यवहारानं दबून गेले होतें. तरी या सर्व गोष्टीपासून अलिप्त राहून तो आपले मन देवापुढे दु:खी करतो व परात्पराच्या हेतूचे ज्ञान मिळवून घेण्याची खटपट करतो. त्याच्या प्रार्थनेचे उत्तर म्हणून जे शेवटल्या काळांत राहाणार आहेत त्याच्यासाठीं स्वर्गीय दरबारांतून प्रकाश पाठविण्यात येतो. तर मग केवढ्या आवेशाने आम्हीं देवाचा शोध केला पाहिजे ! अशासाठीं कीं, स्वर्गीय सत्य समजण्यासाठी त्यानें आम्हांला समज द्यावा. नम्रपणे केलेली खटपट पसंत करून त्याकडे लक्ष पुरवितात. शीलातील विश्वास व प्रीति यांचे शुद्ध सोनें प्रगट होण्यास कसोटी लागते. जेव्हां मंडळीवर दु:खें व संकटे येतात तेव्हां भक्कम आवेश व ख्रिस्ताच्या अनुयायांची खरी शक्ति वाढली जाते. CChMara 97.2
जे सर्व खर्या धार्मिक मनुष्याच्या नैतिक संबंधात येतात त्यांना त्याच्या ख्रिस्ती जीवितातील सुगध व सौंदर्य दिसून येतात. त्याला तें समजून येणार नाहीं कारण तें त्याच्या सवयी व वृत्त यावर अवलंबून आहेत. तो दैवी प्रकाशासाठी याचना करतो व त्या प्रकाशात चालण्याची आवड धरतो. आपल्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे करणे हें त्याचे अन्न व पाणी असतें. देवामध्ये ख्रिस्ताबरोबर त्याचे जीवित लपलेले असतें, तरी तो त्याची फुशारकी मारीत नाही कीं त्याविषयी काळजी करीत नाहीं. जे नम्र व लीन असून आपल्या धन्याच्या पावलावर पाऊल टाकून चालतात त्यांच्याविषयी देव आनंद मानतो. दृत त्यांच्याकडे आकर्षिले जातात व त्या मार्गावर व सभोवती राहाण्यास त्यांना आवडते. जे आपली सत्कृत्ये मोठी महत्त्वाची आहेत असें दर्शविण्यांत आनंद मानतात व मोठाली कार्ये करणारे आहों असें दर्शविण्यांत आनंद मानतात व मोठाली कार्ये करणारे आहो असें म्हणतात तें लक्ष पुरविण्यास अपात्र या नात्याने निघून जातात; पण स्वर्गीय दुत त्यांच्याभोवती अग्नीच्या भिंतीसारखे होऊन त्यांजवर प्रेमाची पाखर घालतात. 8 CChMara 97.3