कलीसिया के लिए परामर्श
एकी व जूट ही आपली बळकट साक्ष
जगाचा विरोध आपल्याला धोका आणीत नाही. पण नामधारी ख्रिस्ती लोकांनी आपल्या अंत:करणांत दुष्टतेची आवड धरल्याने मोठी हानी होतें व देवाच्या कार्याला मोठा अडथळा येतो. मत्सरी, एकमेकांविषयी संशयीं बनने, दोष काढणे व दुष्ट कट करणे यांच्याइतके आत्मिकपणा कमी करणारे खात्रीलायक इतर मार्ग नाहींत. “हें शहाणपण वरून येत नाहीं, पण तें जगक वासनायुक्त व सैतानी आहे. कारण जेथे मत्सर व भांडण आहेत तेथें प्रत्येक कुकर्म व गोंधळ आहे. पण वरून येणारे ज्ञान शुद्ध, शांतिमय, सौम्य, विनति करता येण्यासारखें, चांगले फळ व दया यांनी युक्त, पक्षपातविरहित व ढोंगरहित असें आहे जे शांति करतात त्यांच्या शांतीत धार्मिकतेचे फळ पेरलेले असतें.” याकोब ३:१५-१८. CChMara 85.3
एकी व जूट ही वेगवेगळ्या प्रकारच्या गुणांत मनुष्यामध्ये आढळल्यास देवाने आपला पुत्र या जगांत पाप्याना तारावयाला पाठविला आहे याची बळकट साक्ष आहे. ही साक्ष ही देणे आमची संधि आहे पण हें करण्यासाठी आम्ही स्वत:ला ख्रिस्ताच्या आज्ञेखाली आणले पाहिजे. आमचे शील त्याच्या शीलासारखे बनले पाहिजे. आमच्या इच्छा त्याच्या इच्छला वश झाल्या पाहिजेत. मग आपण कोणत्याही आघाताशिवाय एकत्र कार्य करुं शकूं. CChMara 85.4
लहान सहान गोष्टी, ख्रिस्ती बंधुत्व नाश पावण्यास कारणीभूत होतात म्हणून आम्ही शत्रूला याप्रकारे आमचा फायदा घेऊ देऊ नये. देवाच्या व एकमेकांच्या सान्निध्यात येण्याचा प्रयत्न करूं या. मग प्रभने लाविलेल्या जीवनी पाण्याजवळील धार्मिकतेच्या झाडासारखे आपण होऊ. मग आपण किती फलदायक बनू ? खिस्त म्हणाला नाहीं कीं, “तुम्ही विपुल फळ दिल्याने पित्याचे गौरव होतें ?” योहान १५:८ CChMara 86.1
जेव्हां ख्रिस्ताच्या प्रार्थनेवर विश्वास ठेविला जातो व देवाच्या लोकांच्या रोजच्या जिण्यांत तिचे शिक्षण दिले जाते. तेव्हां आमच्या कार्याची एकी आम्हांला दिसून येईल. ख्रिस्ताच्या प्रीतीच्या सोनेरी बंधनाने भाऊ भावाशीं बाधला जाईल. हें ऐक्य केवळ देवाचा आत्मा घडवून आणू शकतो. ज्याने पवित्र केलें तोच शिष्याना पवित्र करुं शकतो. त्यांच्याबरोबर एक होऊन पवित्र विश्वासात तें एकमेकांबरोबर एक होतील. देव इच्छितो कीं अशा ऐक्यासाठी आम्हीं खटपट करावी म्हणजे ती आम्हांला प्राप्त होईल. 3 CChMara 86.2
अनेक संस्था स्थापन करणें, मोठमोठ्या इमारती बांधणे व बाह्यात्कारी शोभा आणणे ह्यांची देव मागणी करीत नाहीं. पण लोकांच्या खास जुटीचे कार्य व देवाने निवडलेले, एकमेकांबरोबर एकीने राहणारे व ज्यांचे जीवित ख्रिस्ताबरोबर देवांत लपलें आहे अशा गोष्टींची देव मागणी करीत आहे. प्रत्येक मनुष्याने आपापल्या स्थान राहून शब्दाने, विचाराने व कृतीने योग्य वजन पाडावे. जेव्हां देवाचे कामदार हें करतील तेव्हां त्यांचे कार्य पूर्ण होऊन भक्कम बनेल. 4 CChMara 86.3
खर्या विश्वासू व चांगल्या मनाच्या माणसांना प्रभु बोलावित आहे. ज्यांना बर्यवाईट गोष्टीतील फरक कळतो अशा मनुष्यांना बोलावित आहे. प्रत्येकाने काळजी घ्यावी व योहान १७ व्या अध्यायात दिलेल्या धड्यांचा अभ्यास करून त्याप्रमाणे वागावें. या काळांतील सत्याचा जिवंत विश्वास राखावा. आम्हांला ख्रिस्ताच्या प्रार्थनेशी जुळणाच्या आमच्या संवया अंगी बाणण्यास जो मनाचा ताबा लागतो त्याची गरज आहे. 5 CChMara 86.4
तारणाच्याचें लक्ष आपल्या अनुयायाकडे असून देवाचा हेतु पूर्ण करण्याच्या कामांत आहे. त्यामध्ये त्यांनी एक असावे. जरी तें जगभर पांगले असले तरी त्यांनी प्रभूमध्ये एक व्हावे, पण देव त्यांना खिस्तांत एक करूं शकत नाहीं कारण तसे होण्यासाठी त्यांनी आपले मार्ग त्याच्या मार्गासाठी सोडून दिले पाहिजेत. 6 CChMara 86.5