कलीसिया के लिए परामर्श

50/318

सहकार्य

नवीन क्षेत्रांत कांही संस्था स्थापन करताना ज्यांना कार्याची इतंभूत माहिती नाहीं. अशा व्यक्तींवर जबाबदारी टाकणे अगत्याचे आहे. अशा व्यक्ति मोठ्या गैरसोयींत कार्य करतात. प्रभूच्या संस्थेत नि:स्वार्थी आवड त्यांनी व त्यांच्या सहकामदाराने दाखविल्याशिवाय त्या संस्थेची प्रगति होणार नाही. CChMara 86.6

पुष्कळांना वाटते कीं ज्या प्रकारचे काम करतात, तें फक्त त्यांचेच आहे व त्यासंबंधाने कोणीही कांहीं सूचना करूं नयेत. हेच लोक काम करण्याच्या पद्धतीविषयी अडाणी असतात. एकाद्याने त्यांना सल्ला देण्याचे धैर्य केले तर त्यांचा अपमान होतो व आपल्याच इच्छेप्रमाणे चालण्याचा तें शिकविण्याची व मदत करण्याची इच्छा बाळगीत नाहीत. दुसरे बिनअनुभवाचे आहेत त्यांना आपला अडाणीपणा इतरांना समजावा अशी इच्छा नाहीं. तें अधिक वेळेचा व वस्तूंचा व्यय करून मोठाल्या चुका करतात कारण त्यांना सल्ला विचारण्यास कमीपणा वाटतो. CChMara 87.1

त्रासाचें मूळ काढणें कठीण नाही त्यांनी स्वत:ला नमुन्यासाठीं एकत्र विणलेले धागे असें न मानता कामदार स्वत:स स्वतंत्र असें मानू लागले. CChMara 87.2

याकडून पवित्र आत्म्याला दु:ख होतें. आम्ही एकमेकांपासून शिकावे अशी देवाची इच्छा असतें. तो आमच्याबरोबर कार्य करूं शकणार नाही अशा थराला अपवित्र स्वातंत्र्य आम्हांस नेते. अशी स्थिती पाहून सैतानाला आनंद होतो. CChMara 87.3

तो देवाच्या सस्थेसाठी काम करतो किंवा स्वत:च्या आवडीसाठी काम करतो याबद्दल प्रत्येक कामदाराची कसोटी होणार आहे. CChMara 87.4

ज्या पापाची क्षमा करता येत नाही तें म्हणजे मताचा गर्व व स्वत:ची बढाई होय. तें प्रगतीच्या आड उभे असतें. मनुष्याच्या शीलांत वैगुण असतात तरी तो हें समजून घेण्यास चुकतो. जेव्हां तो स्वत: पूर्ण आहे असें भासवितो तेव्हां त्याची चूक दिसत नाहीं. मग तो कसा शुद्ध होईल? “जे निरोगी आहेत त्यांना वैद्याची गरज नाहीं पण रोगी आहेत त्यांना आहे.” मत्तय ९:१२ आपलेच मार्ग बरोबर आहेत असा जो विचार करतो त्याची वाढ कशी होणार? CChMara 87.5

मनापासून असलेला खिस्ती, खरा सद्गृहस्थ बनू शकत. 7 CChMara 87.6

*****