कलीसिया के लिए परामर्श

48/318

खिस्ताबरोबर व एकमेकांबरोबर ऐक्य हॅच संरक्षण

आज जग आनंदाने खिस्ती लोकांत पडलेली फूट पाहात आहे. नास्तिकपण सर्वाच्या आवडीचा झाला आहे. देव आपल्या लोकात बदल घडवून आणण्यास पाचारण करीत आहे. या शेवटल्या काळांत खिस्ताबरोबर व आपल्या भावाबरोबर ऐक्य असणे हें आपले संरक्षण आहे. आमच्या मंडळीच्या सभासदाकडे सैतानाला बोट दाखविण्यास संधि देऊ नये. नाहींतर तो म्हणेल, ‘पाहा हें लोक ख्रिस्ताच्या झेंड्याखाली उभे राहन एकमेकांचा द्वेष करीत आहेत त्याची आम्हांला भीती नाही, कारण तें माझ्या सेनेशी लढण्यात शक्ति खर्च करण्यापेक्षा एकमेकांबरोबर भांडण्यात अधिक शक्ति खर्च करतात.” CChMara 84.2

पवित्र आत्मा आल्यावर शिष्य पुनरुत्थत तारणाच्याची घोषणा करीत गेले. आत्म्याच्या तारणाची त्यांची तीच एक आशा होती. संतांच्या सहवासांत त्यांना आनंद झाला. सत्याकरता कोणताही यज्ञ करण्यास तें तयार होतें, शिवाय तें विचारी, प्रेमळ व त्यागी बनले. रोजच्या त्याच्या एकमेकांबरोबरच्या वागणूकीत खिस्ताने शब्दाने व कृतीने इतराच्या अंत:करणात प्रीति निर्माण करण्याची खटपट त्यांनी केली. CChMara 84.3

पवित्र आत्मा मिळाल्यावर प्रेषितांची अंत:करणे प्रीतीने भरून गेलेली पाहून सतत आनंद मानीत. त्यांनी पुढील आज्ञा मान्य करून पुढे जावयाचे होतें. “जशी मी तुम्हांवर प्रीति केली आहे तशी तुम्ही एकमेकांवर प्रीति करा.” योहान १३:३४. इतक्या अधिक प्रमाणात त्यांची खिस्ताशीं एकी व्हावयाची होती, अशासाठीं कीं तें त्याच्या मागण्या पुच्या करण्यासाठी समर्थ होतील. आपल्या धार्मिकतेनें निर्दोष करणार्‍या तारणार्‍यांचे सामर्थ्य वाढवावयाचे होतें. पण त्या काळांतील ख्रिस्ती लोक एकमेकांच्या चुकांकडे पाहूं लागले. चुका काढण्यात निर्दयपणाची टीका करण्यांत, तें ख़िस्ताला व पाप्यासाठी दाखविण्यांत आलेल्या त्याच्या महान् प्रीतीला पारखे झाले. तें वरवरच्या विधींसंबंधाने कडक बनले, विश्वासाच्या तत्त्वासंबंधाने नक्की मत बनवून राहिले वे इतरांवर टिका करण्यांत भयकर कडक बनले. इतरांना दोष देण्यांत त्यांचा जो आवेश होता त्यात तें स्वत:च्या चुका विसरले. ख्रिस्ताने शिकविलेला बधुप्रीतीचा धडा तें विसरले. सर्वांत दु:खाची गोष्ट ही कीं, त्यांनी नुकसानीबद्दल आपला सद्सद्विवेक जागृत राखिला नव्हता. आपल्या जीवितांतून आनंद व सुख निघून जात आहे हें त्यांना कळले नाहीं व लवकर तें अधारांत चालणार आहेत व त्यांच्या अंत:करणांतून देवाची प्रीति काढून टाकली जाणार आहे हें त्यांना समजून आलें नाही. CChMara 84.4

प्रेषित योहानाला कळून चुकले कीं, मंडळीत बधुप्रेम कमी होत चालले आहे व विशेषेकरून याच मुद्यावर तो बोलू लागला. आपल्या मरणापर्यंत एकमेकांबद्दल सतत प्रेम बाळगावे याबद्दल तो भावांना विनति करीत गेला. या विचाराने त्याची पत्रे भरून गेली आहेत. “प्रियानों, एकमेकांवर प्रीति करूं या.” तो लिहितों, “प्रीती देवापासून आहे. या जगांत देवाने आपला एकुलता पुत्र पाठविला, अशासाठी कीं आम्ही त्याच्याद्वारे जगावें.... प्रियांनों, देवाने जर एवढी आपल्यावर प्रीति केली आहे तर आम्हीसुद्धा एकमेकांवर प्रीति करावी.” १ ४:७-११. CChMara 85.1

देवाच्या मंडळींत बंधुप्रीतीचा मोठ्या प्रमाणात अभाव आहे. खिस्तावर प्रीति करितो म्हणणारे पुष्कळजण त्यांच्या बरोबर खिस्ती सहभागितेत एकत्र झालेल्यांवर प्रीति करण्याचे विसरतात. आम्ही एका विश्वासाचे, एका कुटुंबाचे सभासद, आपल्या स्वर्गीय पित्याची मुलें व एकाच अमरत्वाच्या आशेने धन्यवादित असें आहोत. मग आपणाला एकत्र बांधणारी गाठ किती जवळची व प्रेमाची असायला पाहिजे. आमच्या अंत:करणांवर आमचा विश्वास पवित्र परिणाम करीत आहे कीं नाही हें जगांतील लोक पाहत आहेत आमच्या जीवितातील प्रत्येक कमीपणा व विसंगतपणा तें त्वरेने जाणू शकतात म्हणून आपल्या विश्वासाला काळिमा लावण्यास त्यांना संधि देऊं नयें. 2 CChMara 85.2