कलीसिया के लिए परामर्श

43/318

देवाशी केलेली प्रतिज्ञा पवित्र व बंधनकारक आहे

प्रत्येक जण स्वत:चे ठरविणारा असून तो आपल्या मनांत ठरविल्याप्रमाणे देण्यास जबाबदार आहे. दशांशाच्या भागातील कांही लपवून ठेवले तर भावना तें कळणार नाही असें वाटून जे पाप हुनन्या व सप्पी यांनी केले त्याचे पापाचे वाटेकरी कांही जण आहेत पण हें दोषी जोडपे आल्याला इशारा म्हणून उदाहरणादाखल दिले आहे, या बाबतींत देव हें सिद्ध करतों कीं, तो अंत:करणाचा शोध करतो, मनुष्याचे बेत व हेतु देवापासून लपले जाणार नाहींत. सर्वकाळांतील ख्रिस्ती लोकांना सततचा इशारा म्हणून दिला आहे कारण मनुष्याचे मन सतत पापाकडे कललेले असतें व त्याबाबतीत सावध राहण्यास तो इशारा आहे. CChMara 80.2

जेव्हां तोंडी किंवा लेखी प्रतिज्ञा भावांच्या समोर पैसे देण्याच्या बाबतींत केलेली असतें तेव्हां तें देव व स्वत:मधील दृश्य साक्षी होत. ती प्रतिज्ञा मनुष्याशी केलेली नसून देवाशी केलेली आहे व शेजार्‍यांना दिलेल्या पत्राप्रमाणे आहे. देवाशी केलेल्या प्रतिज्ञेपेक्षा पैसे देण्याच्या बाबतींत ख्रिस्ती लोकांना दुसरा कोणताहि कायदेशीर करार इतका लागू नाहीं. CChMara 80.3

जे आपल्या सोबत्याशीं अशी प्रतिज्ञा करतात तें सहसा त्यांच्या प्रतिज्ञेपासून मुक्त होण्यासाठी कधीही बोलत नाहींत. सर्व आशीर्वादाचा दाता परमेश्वर याच्याशी केलेली प्रतिज्ञा अजूनही महत्त्वाची आहे मग देवाशीं केलेल्या प्रतीज्ञेपासून मुक्त होण्यासाठी आपण का मागावे ? देवाशी प्रतिज्ञा केली म्हणून आपले वचन कमी जबाबदारीचे आहे असा मनुष्य विचार करील काय? त्याची प्रतिज्ञा कोर्टात गुदरली जाणार नाही म्हणून ती कमी महत्त्वाची आहे का? जो येशूच्या अर्पणाच्या रक्ताद्वारे तारला गेला आहे असें म्हणतों “तो देवाला ठकवील काय?” त्याची प्रतिज्ञा व कृति हीं स्वर्गीय न्यायालयातील तराजूत तोलली नाहींत काय? CChMara 80.4

मंडळी ही आपल्या प्रत्येक सभासदाने केलेल्या प्रतिज्ञेबद्दल जबाबदार आहे. जर त्यांना दिसलें कीं, एखादा भाऊ आपली प्रतिज्ञा पूर्ण करण्याची हयगय करतो, तर त्यांनी त्यांच्याबरोबर दयाळूपणाने पण स्पष्टपणे कार्य करावे. जर तो आपली प्रतिज्ञा पूर्ण करण्याच्या परिस्थितीत नाहीं, व तो चागला सभासद असून प्रतिज्ञा पूर्ण करायाची त्याची वृत्त आहे, तर मंडळीने दयाळूपणाने त्याला मदत करावी. अशा प्रकारे तें अडचणीवर जय मिळवून स्वत:साठी आशीर्वाद मिळवून घेतील. 22 CChMara 80.5