कलीसिया के लिए परामर्श

44/318

उपकारस्तुतीची अर्पणें गरिबांसाठी वेगळी ठेवावी

प्रत्येक सभासदाने उपकारस्तुतींचे अर्पण देवाला द्यावे. आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून एकदा जशी सोय होईल तसे द्यावे. हें अर्पण आपले आरोग्य, अन्न व वस्त्र याबद्दल कृतज्ञता व्यक्त करील. ज्याप्रमाणे देवाने ही सुखाची देणगी देण्यांत जो आशीर्वाद दिली असेल त्याप्रमाणे गरीब, पिडलेले व कंगाल यांच्या साहाय्यासाठी अर्पणे वेगळी करून ठेवणार नाही काय ? मी भावांचे लक्ष विशेष प्रकारे या मुद्याकडे वेधिते, गरिबांची आठवण ठेवा, तुमची चैन सोडा, तुमच्या सुखसोयी विसरा आणि जे फक्त अन्न व वस्त्र कसे तरी मिळवू शकतात त्यांना मदत करा. त्याच्याकरिता हें करण्याने तुम्ही येशूला त्याच्या संताद्वारे मदत करता. तो स्वत:ला दुःख सोसणाच्या मानवाबरोबर लेखितो. तुमच्या काल्पनिक गरजा भागेपर्यंत थांबू नका. तुमच्या भावनावर अवलंबून राहूं नका व वाटेल तेव्हां द्यावे व वाटणार नाही तेव्हां देऊ नये असें करूं नका. नियमितपणे द्या. - देवाच्या दिवशी स्वर्गीय नोंदी दिसण्यासाठी द्या. 23 CChMara 81.1