कलीसिया के लिए परामर्श

42/318

“वाढत्या धनावर चित्त ठेवू नका”

देवाचें नियमशास्त्र जितकें टिकाऊ आहे तितक्या टिकाऊ तत्त्वावर दशांश आधारलेला आहे. ही दशाश पद्धत यहुदी लोकांना आशीर्वाद अशी होती, नाहींतर देवाने ती त्यांना घालून दिली नसती. आणखी शेवटपर्यंत जे तिला अमलांत ठेवतील त्यांच्यासाठी ती आशीर्वादयुक्त अशी होईल. CChMara 79.2

देवाच्या कार्याला हातभार लावावयाच्या बाबतींत अधिक पद्धतशीर व उदार असणांच्या मंडळ्या आत्मिकदृष्ट्या अति भरभराटीच्या असतात. ख्रिस्ताच्या अनुयायात असलेले खरे औदार्य आपल्या धन्याच्या गोडीबरोबर गोडी दाखविते. ज्यांच्याजवळ पैसा आहे त्यानी तो पैसा तें कसा खर्च करतात त्याबद्दल तें देवाला जबाबदार आहेत हें समजून घेतले तर त्यांच्या गरजा कमी होतील. जर सदसद्विवेक जागृत राहील तर भूक, गर्व व्यर्थता, करमणुकीची आवड याकरिता विनाकारण होणारा खर्च त्याला दिसेल व देवाच्या कार्यासाठी वापरला जाणारा पैसा उधळीत आहेत हें सांगेल जे प्रभूची मालमत्ता व्यर्थ खर्च करतात त्यांना आपल्या धन्याला हळहळू हिशेब द्यावा लागेल. CChMara 79.3

जर नामधारी ख्रिस्ती लोक आपला पैसा, वेशभूषा व स्वत:ची घरें सुंदर बनविण्याकडे कमी प्रमाणात खर्च करतील व फाजील खर्च कमी करतील व आरोग्याला हानीकारक पदार्थाकडे खर्च करणार नाहीत तर तें देवाच्या खजन्यांत मोठी रक्कम ठेवू शकतील. अशा प्रकारे तें आपल्या तारणाच्याचे अनुकरण करतील. कारण त्यानें स्वर्ग, आपलें धन व आपलें गौरव सोडून तो आमच्यासाठी गरीब झाला अशासाठी कीं, आम्ही सार्वकालिक धनाचे वाटेकरी व्हावें. CChMara 79.4

पेण पुष्कळजण जगांत धन मिळवितात तेव्हां तें असा निर्णय काढण्यास सुरवात करतात कीं, कांही ठराविक रक्कम मिळेपर्यंत किती वेळ लागेल. स्वत:करिता धन मिळविण्याची जिज्ञासा करीत असतां तें देवाकरिता धनवान् होण्याचे बाबतींत उणे भरतात. त्याची परोपकारवृत्ति त्यांच्या साठविण्याबरोबर समान राहात नाही. धनासाठी जसजशी त्यांची इच्छा अनावर होतें तसतशी त्यांची आवड त्यांच्या पैशात लागून राहाते. त्यांच्या मालमत्तेची वाढ झाल्याकडून त्याची इच्छा अधिक धनासाठी इतकी होतें कीं, त्यापैकी कांही जण म्हणू लागतात कीं देवाला दहावा भाग देणे हा कडक व अन्यायाचा दंड आहे. CChMara 79.5

देवाच्या आत्म्याने म्हटले आहे; जेव्हां धन वाढते तेव्हां आपले मन त्यावर लावू नको. स्तोत्र ६२:१० पुष्कळ जण म्हणतात कीं, जर त्या अमक्या अमक्या सारखा धनवान असतों तर मी देवाला अनेक पट्टीने देणग्या दिल्या असत्या मी माझ्या पैशाचे दुसरे कांही न करता मी तो देवाच्या कार्याच्या वाढीसाठी वापरला असतां, देवाने अशांना धन देऊन त्यांची कसोटी पाहिली आहे. पण त्याच्या धनासोबत त्याना मोह आला व त्यांच्या गरीबावस्थेतील दिवसापेक्षा त्यांची परोपकारवृत्ति अधिक कमी झाली. अधिक धनाची फाजील हाव धरल्याने त्याचे मन व अंत:करण गुंतले जाऊन त्यांनी मूर्तिपूजा केली. 21 CChMara 80.1