कलीसिया के लिए परामर्श

317/318

निष्ठावंताचे प्रतिफळ

माझ्या बंधू व माझ्या भगिनी, स्वर्गातील मेघांतून येणार्‍य ख्रिस्तासाठी तुम्ही सिद्ध व्हावे अशी माझी आग्रहाची विनंती आहे. जगाविषयीचे तुमच्या अंतर्यामांतील प्रेम रोज रोज फेकून द्या. ख्रिस्तासह सहभागी होणे म्हणजे काय ह अनुभवाने समजून घ्या, होणाच्या न्यायासाठी तयार व्हा. ख्रिस्त येईल तेव्हां जे सर्व विश्वासणारे त्याला आश्चर्यनंदाने पाहतील आणि तुम्हीही त्याला शांतीने भेटणाच्यात सामील झालेले असावे त्या दिवशी जे मुक्ती पावलेले आहेत ते पित्याच्या व पुत्राच्या गौरवाने झळकत राहतील. दिव्यदूत आपल्या सुवर्ण सारंगीच्या सुस्वरात राजाचे व त्याच्या विजयी सैन्याचे म्हणजे कोकर्‍यांच्या सरक्तात धुऊन स्वच्छ झालेल्याचे स्वागत करितील. विजयाचे स्तोत्रगायन सर्व स्वर्गाला दणाणून सोडील. ख्रिस्ताने विजय मिळविला आहे. तारण पावलेल्या लोकांसह तो स्वर्गीय दरबारी प्रवेश करील. ख्रिस्ताच्या दु:ख सहनाचे आणि स्वार्पणाचे कार्य निरर्थक झालेले नाही असें साक्षीदार म्हणून तें असतील. CChMara 388.5

आमच्या प्रभुचे पुनरूत्थान व त्याचे स्वर्गारोहण ही कार्य प्रगट करितात ? एक तर देवाच्या संतगणांचा मरणावरील व कबरेवरील विजयाचा तो भरभक्कम पुरावाच आहे व दुसरे तर जे कोणी कोंकण्याच्या रक्तात आपली शीलवत्रे धुऊन पांढरी शुभ्र करितात त्यांच्यासाठी स्वर्गातील प्रवेशद्वार खुले केल्याचे तें एक अभिवचनच होय. मानवजातीचा म्हणून येशूपित्याकडे वर गेला आणि ज्या कोणावर त्याची प्रतिमा पडलेली असेल अशांना तो आपले गौरव दाखविण्यास व त्यात विभागी होण्यास वर घेऊन जाईल. CChMara 389.1

पृथ्वीतून येणार्‍य यात्रेकरूंसाठी तेथें गृहे आहेत धर्मातील जीवनाने वागणाच्यासाठी दैवी पोषाख सोनेरी मुगूट आणि विजयाचे बिल्ले आहेत. येथे ईश्वरी सूत्रांतील जे सारे गोंधळकारक भासत होतें. त्याचा स्पष्ट खुलासा स्वर्गात होईल. येथे समजून येण्याला ज्या गोष्टी दुर्लभ त्याच तेथें सुलभ केलेल्या आढळतील. कृपेच्या गुढमय गोष्टींचा त्या ठिकाणी आम्हांला खुलासा मिळेल. येथे आमच्या अंकुचित बुद्धिला गोंधल व अपूर्ण अशी अभिवचनेच दिसत होती तीच तेथें अत्यंत अचूक व सुसंगत अशी दिसतील. आम्हांला असें कळून येईल कीं जे अनुभव अत्यंत असह्य असें भासत होतें त्याची योजना अद्भुत प्रीतीकडून झालेली होती. सर्व गोष्टी मिळून जो आपल्या हितासाठीच करितो, त्याची कोमल काळजी जर आम्हांला समजून आली तर अनिर्वाच्च आनंदाने आणि संपूर्ण गौरवाने आम्ही आनंदीत होऊं. CChMara 389.2

स्वर्गीय क्षेत्रांत दु:खाचा मागमुसही आढळणार नाही. उद्धारलेल्यांच्या गृहात शोक अगर मरण अगर खेद यांचा पत्ता लागणार नाही. “मी रोगी आहे असें एकही रहिवासी म्हणणार नाही. तेथें राहणारे पातकाची क्षमा पावतात.” यशया ३३:२४. सनातन काल (भावी आयुष्य) जसाजसा लोटत राहील तसतशी सौख्याची भरती वाढत राहील व दृढतर होत जाईल. CChMara 389.3

आमच्या अविनाशी जीवनाच्या आशा ज्याच्यामध्ये केंद्रित झालेल्या आहेत त्याची आमची भेट व्हायला फारसा उशीर लागणार नाही. ऐहिक जीवनातील परीक्षा व संकटे त्याच्या समक्षतेत क:पदार्थ अशी ठरतील. “आपले धैर्य सोडू नका, त्यापासून मोठ प्रतिफळ आहे. तुम्हांस सहनशीलतेचे अगत्य आहे. यासाठी कीं तुम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे वागून वचन फळ प्राप्त करून घ्यावे, कारण अगदी थोडा वेळ राहीला आहे, जो येणार तो येईल. उशीर करणार नाही.” सावध व्हा, हिंमत धरा, तुम्ही आपली निष्ठा सारखी वाढवित रहा. अरूद मार्गाने जात असतां तुमचा विश्वास तुम्हांला मार्गदर्शन देवो. तो मार्ग तुम्हांला देवाच्या नगरीच्या वेशीतून पार पलीकडे घेऊन जाईल तेथें मुक्तजनासाठी अगम्य असें भावी ऐश्वर्य सिद्ध केलेले आहे. “अहो बधूनो, प्रभुच्या आगमनापर्यंत धीर धरा, पहा, शेतकरी भूमीच्या मौल्यवान पिकाची वाट पहात असतां, त्यास पहिला व शेवटला पाऊस मिळेपर्यंत त्याविषयी तो धीर धरतो. तुम्हीही धीर धरा. आपली अंत:करणे स्थिर करा, कारण प्रभूचे आगमन जवळ आलें आहे. याकोब ५:,८. CChMara 389.4

“पुढे आपण काय होऊ हें अजून प्रकट झाले नाही, तरी आपल्याला हें माहीत आहे कीं तो प्रकट झाल्यास आपण त्यासारखे होऊ कारण जसा तो आहे तसाच तो आपणास दिसेल.” CChMara 390.1

नंतर आपल्या कार्याची निष्पती म्हणून मिळालेल्या भरपाईकडे ख्रिस्त अवलोकन करील. कोणाही मानवाला गणती करिता यावयाची नाही अशा त्या अफाट समुदयांत त्याच्या ऐश्वर्यमुक्त सान्निध्यात निर्दोष असें उल्लासयुक्त लोक त्याला दिसून येतील. ज्याच्या रक्ताने आम्ही उद्धार पावलों व ज्याच्या जीवनचरित्रावरून आम्हांला सुशिक्षण मिळाले तो आपल्या जिवाच्या वेदना सरल्यावर त्याचे फल पाहून समाधान पावेल.” CChMara 390.2