कलीसिया के लिए परामर्श

318/318

वियोगसमयींचा धीरदायक व विश्वासयुक्त निरोप

फार दिवस जगण्याची मी अपेक्षा करीत नाही. माझे काम बहुतेक संपले आहे..... आपल्या लोकांना द्यावयाची माझ्याजवळ आणखी कांही आशीर्वाद उरलेला नाही असें मला वाटते. आपल्या कार्याची प्रगती व उभारणी करण्यासाठी काय काय उपयुक्त आहे. हें आमच्यातील बुद्धिवंतांना ठाऊक आहे तरीपण अंत:करणांत देवाच्या प्रीतीला अधिष्ठान देऊन देवाच्या गोष्टींचा अधिकाधिक खोल अभ्यास करण्याची त्यांना आवश्यकता आहे ? CChMara 390.3

आमच्या गत इतिहासाचे सिंहावलोकन करीत असतां व आम्ही आहो तेथुन पढे प्रगतिपथावरील हरएक पायरी चढत असताना मला एवढेच म्हणता येते कीं ईश्वराची स्तुति करा ! प्रभूने जे कांही केलेले आहे तें पाहन आश्चर्याने आणि मार्गदर्शक ख्रिस्त यावरील निष्ठेने माझे मन भरून येते. प्रभूने आम्हांला दाखविलेला मार्ग आणि गत काळांत त्यानें आम्हांला दिलेले शिक्षण हें जर आम्ही विसरून गेलों नाही तर भविष्यकाळाविषयी भीति बाळगण्याचे कारण नाही. CChMara 390.4