कलीसिया के लिए परामर्श

316/318

विजयाचे अभिवचन

माझी अशी आग्रहाची प्रार्थना आहे कीं जे कार्य आता आमच्या हाती आहे त्यानें आमच्या अंत:करणावर, मनावर व आत्म्यावर चागलाच संस्कार करावा. गोंधळ तर वाढतीलच; परंतु देवावर विश्वास ठेवणारे म्हणून आपण एकमेकांस उत्तेजन देऊ या. आपण आपला दर्जा कमी न होऊ देता आमच्या विश्वासाचा उत्पादक व पूर्णता करणारा याजकडे पाहत राहन त्याला उंच करूं या. रात्री जेव्हां मला झोप येत नाही तेव्हां मी माझे अंतर्याम प्राथनेद्वारे देवाकडे लाविते तेव्हां तो मला सबळ करून अशी खात्री देतो कीं, स्वदेशी व परदेशी जे त्याचे सेवक त्याची सेवा करीत आहेत त्यांच्यासह तो आहे. इस्त्राएलाचा देव अजूनही आपल्या लोकांना मार्गदर्शन देत आहे आणि युगाच्या अंतापर्यंत तो त्यांच्यासह राहणार आहे ही गोष्ट ध्यानात आल्यावर मला उत्तेजन येऊन मी स्वत:ला धन्य समजले. CChMara 387.2

तिसर्‍य दृताचा संदेश पुकारण्याचे कार्य चालूं ठेवावे, तें प्रगत होत असलेले पाहावे व यशस्वी रीतीने वाढत राहावे अशी प्रभूची इच्छा आहे. ज्याप्रमाणे आपल्या लोकांना यश द्यावे म्हणून तो कालावधीपासून काम करीत आहे, त्याचप्रमाणे ख्रिस्ती मंडळी संबंधीचे आपले हेतु यशस्वी रीतीने परिपूर्ण करण्यासाठी आजही त्याचे कार्य चालूं ठेवण्याची त्याची इच्छा बलवत्तर आहे. त्यावर विश्वास ठेवणाच्या भक्तगणास त्याची अशी आज्ञा आहे कीं त्याच्या सत्याच्या व धार्मिकतेच्या क्षेत्रात त्यांनी एकजिवाने प्रगत व्हावे अधिकअधिक सबळ होत रहावे आणि वाढत्या विश्वासात व निष्ठेत त्यांनी वाढत राहावे. CChMara 387.3

ईश्वरी वचनांतील सत्याविषयीची आमची निष्ठा खडकाप्रमाणे खंबीर असावी आणि आमच्या हरएक नव्या अनुभवाला तोंड देण्यास परमेश्वर आम्हांला शक्ति देण्यास सिद्ध आहे हें आम्ही ध्यानात बाळगावे आचरणाची तत्वे आम्ही आमच्या चरित्रात नेहमीच कायम राखू या अशासाठी कीं प्रभूच्या नामांत अधिकाधिक नेटाने आम्ही प्रगत राहावे. देवाच्या आत्म्याने शिकविलेला व पसंत केलेला आणि प्रारंभापासून तो आतापर्यंत आमच्या अनुभवात उतरलेला विश्वास याला पवित्र म्हणून आम्ही त्याला चिटकून राहावयाचे आहे. प्रभुच्या आज्ञा पाळणाच्या मंडळीकडून जे त्यांचे कार्य चालूं आहे तें फार मौल्यवान असें आम्ही आमच्या हृदयी ठेवायचे आहे आणि त्याच्या कृपेच्या सामर्थ्याने जसाजसा वेळ येईल तसतसे तें अधिकाधिक सबल व यशस्वी होत राहणार आहे. देवाच्या लोकांचा बुद्धिभ्रम करण्याचा आणि त्यांची कतृत्व शक्ति कमजोर करण्याचा शत्रु प्रयत्न करीत आहे; परंतु जर तें प्रभूच्या आत्म्याच्या अनुरोधाने परिश्रम करीत राहतील. तर उध्वस्त झालेल्या कामाची पुनर्घटना करण्याची संधी द्वारे तो उघडी करील. प्रभु आपल्या सामर्थ्याने आणि महान् वैभवाने स्वर्गातून उतरून आपल्या विश्वासू जनांवर आपला अखेरचा विजयाचा शिक्का मारीपर्यंत त्याचा अनुभव निरंतर प्रगतीचाच राहणार आहे. CChMara 387.4

जे कार्य आम्हांपुढे आहे त्यासाठी मानवी आटोक्यातील प्रत्येक शक्तीची शिकस्त करावी लागेल. या कामी दृढनिष्ठा आणि निरंतरची जागरूकता याचे नियमन अवश्य लागेल. कधीं कधीं अडचणी आम्हांपुढे येतील कीं आम्ही अगदीच हताश होऊन जाऊ कार्याचा विस्तृतपणा पाहन आम्ही दबून जाऊं. तरी पर परमेश्वराच्या आत्म्याने त्याचे सेवक अखेरीस यशस्वीच होतील. “यास्तव, माझ्या बधूनो, तुम्हांपुढील दुस्तर अनुभवामुळे तुम्ही खचू नये.” (इफिस ३:१३) येशू तुम्हांसह असणार आहे; पवित्र आत्म्याद्वारे तुमचा मार्ग सरळ करीत तो तुम्हांपुढे चालेल आणि हरएक अडचणीत तो तुमचा सहाय्यकर्ता होईल. CChMara 388.1

“आपण ज्याची कांही मागणी किंवा कल्पना करितों त्यापेक्षा आपल्या मध्ये कार्य करणाच्या शक्तीने फारच फार करावयास जो शक्तीमान आहे. त्याला पिढ्यानपिढी मंडळीत व ख्रिस्त येशूमध्ये युगानुयुग गौरव असो. आमेन.” इफिस ३:२०-२१, CChMara 388.2

अलीकडे रात्रींच्या वेळी मजपुढे आलेली दृष्ये पाहून माझ्या मनावर फार मोठा परिणाम झाला. एक फार मोठी चळवळ दिसत होती. - धर्मसंजीवनीचे तें कार्य होतें. तें पुष्कळ ठिकाणी चाललेले होतें. ईश्वराच्या पाचारणास कान देऊन ह्या धोरणांत आमचे लोक गुंतलेले होतें. माझ्या बंधूजनहो, प्रभु आम्हाशी बोलत आहे. त्याचीच वाणी आम्ही मनावर घेऊ नये काय ? आपल्या प्रभुच्या आगमनाची वाट पहात आहेत अशा लोकांप्रमाणे आम्ही आपापले दिवे तयार ठेवू नयेत काय ? प्रकाशासह कार्य तडीस नेण्यासाठी पाचरणाची वेळ आलेली आहे. CChMara 388.3

“यास्तव मी..... तुम्हांस विनंती करितो कीं तुम्हांस झालेल्या पाचारणास शोभेल असें तुम्ही चालावे, पूर्ण नम्रतने, सौम्यतेने, व क्षमाशीलतेने वागून एकमेकांचे प्रीतीने सहन करावे, शातीच्या बंधनाने आत्म्याचे ऐक्य राखायास झटत असावे.” इफिस ४:१-३. CChMara 388.4