कलीसिया के लिए परामर्श

315/318

तुमची मुक्तता समीप आली आहे”

आठवड्यामागून आठवडे जी भयकर संकटे घडून येत असल्याचे माझ्या कानांवर येत आहेत त्यावरून मी स्वत:ला विचारते कीं, ह्या सर्वांचा अर्थ काय ? एकामागून एक मोठ्या झपाट्यानें अत्यंत भयकारक आपत्ति येत आहेत. भूमिकप, प्रचंड वादळ, अग्नि य अतिवृष्टि यांनी मानवी जीविताचा व मालमत्ता वारंवार होत असलेला नाश आम्ही ऐकत आहो ! अर्थातच ह्या सर्व अव्यवस्थित व अनियमित सृष्टिक्रमाच्या लहरवजा घटना आहेत, तरीही त्यात परमेश्वराचा हेतु दिसून येईल. स्त्री-पुरूषांनी आपण धोक्याच्या प्रसंगात आहोत हें समजून घ्यावे म्हणून त्यांना जागृत करण्याचे हें एक ईश्वरी साधन होय. CChMara 386.1

पूर्वीच्या आमच्या विश्वासापेक्षाही ख्रिस्ताचे आगमन अधिक नजिक आलेले आहे. महान् वितंडवाद संपुष्टात आलेला आहे. परमेश्वराचे न्याय जगांत दिसून येत आहेत गभीरयुक्त इशान्यांनी तें सांगत आहेत कीं, “तुम्हीही सिद्ध व्हा, कारण तुम्हांस वाटत नाही अशा घटकेस मनुष्याचा पुत्र येईल.” मत्तय २४:४४. CChMara 386.2

पंतु साप्रत काळच्या वस्तुस्थितीचा अर्थ आमच्या मंडळीतील पुष्कळांना अगदी धोडासाच समजतो. काळाच्या परिपुर्ततेची चिन्हे स्पष्टच सांगत आहेत कीं अंत हाताशी आलेला आहे. याकडे दुर्लक्ष करूं नये, अशी त्यांना माझी विनती आहे. अरेरे, कितीतरी जणांनी आपल्या आत्म्याच्या तारणाची बेपरवाई केलेली आहे व लवकरच तें कष्टमय शोकांत पाहणार आहेत. “सुगी सरली, हंगाम आटोपला, पण आमचे तारण झाले नाही!” CChMara 386.3

जगाच्या इतिहासातील अखेरच्या दृश्यात आम्ही जगत आहो. भविष्य कथनाची झपाट्यानें परिपूर्ति होत आहे. कृपेचा काळ झपाट्यानें जात आहे. एक घटिकासुद्धा आम्हांला वाया जाऊ देता येणार नाही. पाहाच्यावर असताना आम्ही निद्रीस्त असें आढळन येऊ नये. कोणीही आपल्या मनातून अगर कृतीतून असें म्हणू नये कीं, “आपला धनी येण्यास विलंब लागेल.” ख्रिस्ताच्या त्वरीत आगमनाचा संदेश आस्थेवाईक इशार्‍यने जाहीर करण्यांत यावा. पश्चाताप करावा आणि होणार्‍य क्रोधापासून पळून जावे म्हणून आपण सर्व ठिकाणच्या पुरूषांना व स्त्रियांना समज देऊ या. आमच्या पुढे कसली परिस्थिति निर्माण होईल याची आम्हांला क्वचितच कल्पना असल्यामुळे ताबडतोब सिद्ध होण्यासाठी आम्ही त्यांना जागृत करूं या. जे असर्बाधित व बेपरवाई आहेत अशांनी प्रभु सापडण्यासारखा आहे तोंच त्याचा शोध करावा हें सांगण्यासाठी दीक्षित व अदीक्षित सभासदांनी कापणीस आलेल्या शेतात शिरावे पवित्रशास्त्रामधील सत्याचे ज्यांना विस्मरण पडलेले आहे अशा कोणत्याही ठिकाणच्या लोकांत करण्याचा हंगाम कामगार मंडळीला मिळणार आहे. सत्याचा स्वीकार करणारे लोक त्यांस भेटतील आणि ख्रिस्तासाठी आत्मे जिकण्यासाठी त्याना आपल्या चरित्राचा उपयोग करता येईल. CChMara 386.4

प्रभु लवकर यावयाचा आहे व त्याची आपली भेट शातीने व्हावी म्हणून आपण आपली सिद्धता केली पाहिजे. आम्हासभोवार असलेल्या लोकांना प्रकाश द्यावा म्हणून शक्य तें सर्व करण्याचा आपण निर्धार करूं यां. कष्टी न होता आपण आनंदित राहूं व प्रभु येशूला आपण निरंतर पुढे देऊ यां तो लवकरच येत आहे व त्याच्या दर्शनासाठी आपण सिद्ध होऊन वाट पाहत राहिले पाहिजे. आहाहा, त्याला भेटणे आणि त्याचे उद्धारलेले या नात्याने आपले स्वागत होणे किती अत्युत्तम होईल ! फार दिवसामागून आम्ही वाट पाहात आहोत तरी आमची आशा अंधूक होता कामा नये. राजा तो आपल्या गौरवात आम्हांला भेटला तर आम्ही निरंतरचे आशीर्वादित होऊ. मला ओरडून म्हणावेसे वाटते कीं, “स्वगृही प्रयाण!” आपल्या मुक्तजनांना त्यांच्या अविनाशी गृही घेऊन जाण्यासाठी ख्रिस्त सामर्थ्याने व महान वैभवाने येईल. त्या वेळेच्या नजिक आम्ही येत आहे. CChMara 386.5

कार्य बंद होण्याच्या मोठ्या काळांत निवारण करण्याचे आम्हांला समजणार नाही अशा गुंतागुंती उपस्थित होतील; परंतु तीन महान् स्वर्गीय समार्थ कार्य करीत आहेत हें आम्ही विसरता कामा नये. कालचक्रावर दैवी हस्त आहे आणि परमेश्वर आपली अभिवचने परिपूर्ण करील. जे त्याची सेवाचाकरी धार्मिकतेने करितील अशाना तो जगातून एकत्रित करील. CChMara 387.1