कलीसिया के लिए परामर्श

314/318

प्रकरण ६६ वें - पाहा, मी लवकर येतों

अलीकडे रात्रींच्या प्रहरी पवित्र आत्म्याचा मजवर असा संस्कार घडला कीं जर आमच्या विश्वासाप्रमाणे प्रभु लवकर येणार आहे त नेपुढे सत्याचे प्रकटीकरण करण्याच्या कामी आम्ही जी खटपट गतकाळी केलेली आहे. तिच्यापेक्षा ती आज अधिक नेटाने करावयास पाहिजे आहे. CChMara 385.1

१८४३ व १८४४ मध्ये अॅडव्हेंटिस्ट मंडळीने जी कामगिरी केली तिच्याकडे माझे लक्ष जात आहे. परमेश्वराच्या वचनात सांगितलेल्या गोष्टीकडे जनतेच लक्ष लागावे म्हणून त्यावेळी भेटी घेण्याचा व अविश्रांत श्रम करण्याचा प्रघात होता. प्रथम दूताच्या संदेशाची तें जितक्या निष्ठेने घोषणा करीत होतें. त्याहीपेक्षा आम्ही अधिक जास्त नेटाने घोषणा करावयास पाहिजे आहे या जगाच्या इतिहासातील अखेरच्या काळाकडे आम्ही झपाट्यानें जात आहोत आणि येशूचे आगमन लवकरच होणार हें आम्हांला समजत नसल्यामुळे आम्ही पूर्वी कधीच केले नाहीत असें परीश्रम करण्यास जागृत झाले पाहीजे. धोक्याची घोषणा करण्यांत यावी अशी आम्हांला आज्ञा झालेली आहे. तसेच आम्ही आमच्या चारित्रात सत्याचे व धार्मिकतेचे प्रकटीकरण करावयास पाहिजे. आज्ञाचा भंग केल्याबद्दल जगाला त्या आज्ञा दात्यापुढे उभे राहावयाचे आहे. आज्ञाभंग सोडून आज्ञापालनाकडे जे वळतील त्यांनाच मात्र क्षमेची व शांतीची आशा धरिता येईल. CChMara 385.2

ज्यांना ज्यांना सत्याची व जीवनादायी शास्त्रवचनाची ओळख पटलेली आहे, त्यांनी त्यांनी ती पटलेली नाही अशांना प्रकाश देण्यासाठी जर परिश्रम केले तर केवढे महान् कार्य साध्य होईल. शोमरोनी स्त्रीच्या सांगण्यावरून जेव्हां शोमरोनी लोक ख़िस्ताकडे आलें तेव्हां त्यानें त्यांना व शिष्यांना हंगामाच्या शेताचे उदाहरण देऊन म्हटले, “चार महिन्याचा अवकाश आहे, मग कापणी येईल असें तुम्ही म्हणता कीं नाही ? पाहा, मी तुम्हांस म्हणतो, आपले डोळे वर करून शेतें पाहा; ती कापणीसाठी पाढरी होऊन चुकली आहेत.” योहान ४:३५ शोमरानी मंडळीला सत्य समजून घेण्याची भूक लागलेली पाहून ख्रिस्त त्यांच्यामध्यें दोन दिवस राहिला. तें किती तरी भरगच्च कामाचे दिवस होतें ! त्या परिश्रमांचा परिणाम असा घडला कीं, “त्याच्या वचनांवरून आणखी किती तरी लोकांनी विश्वास धरीला.” त्यांची साक्ष अशी होती कीं, “आम्ही स्वत: श्रवण केले असून हा खचित जगाचा तारणारा आहे हें ओळखिले आहे.” वचने ४१.४२. CChMara 385.3