कलीसिया के लिए परामर्श

301/318

प्रकरण ६२ वें - छाननी करण्याची वेळ

प्रेषित पौलाने बंधुजनांना उत्तेजन देऊन म्हटले आहे कीं, “आता इतकेच सांगणे आहे कीं प्रभूमध्ये व त्याच्या पराक्रमाच्या शक्तीमध्ये सबळ व्हा... तुम्ही वाईट दिवशीं विरोध करावयाला व सर्व कांही केल्यावर टिकून राहावयाला समर्थ असावे म्हणून संपूर्ण देवाची शस्त्रसामग्री घ्या.” हो, आम्हांपुढे हा कसला दिवस! देवाचे लोक म्हणणार्‍यांची केवढी ही छाननी होईल ! न्यायीजनात अन्यावीही आढळून येतील. ज्यांना मोठा प्रकाश मिळालेला आहे त्यांनी तो धिक्कारून अंधारातच राहिलेले आहेत. त्यांच्यासभोवार तितकाच अध:कार राहणार आहे. पौलाच्या शब्दांत दिलेल्या बोधाकडे आम्हांला लक्ष देणे आवश्य आहे. “मी आपल्या शरीराला बुकलून त्यास दास करून ठेवितो; तसे न केल्यास मी दुसर्‍य घोषणा केल्यावर कदाचित् मीच अपात्र ठरेन.” धर्मत्याग करणार्‍यांमध्ये अधिक भर घालण्यासाठी शत्रु मोठ्या मेहनतीने खटाटोप करीत असतो. परंतु प्रभू लवकरच यावयाचा आहे आणि लवकरच प्रत्येकाविषयींचा शाश्वत काळाचा निर्णय घेण्यात येईल. ज्यांना कृपेने प्रकाशाचे दान लाभलेले आहे त्यांची कर्मे जर त्या प्रकाशाला शोभतील अशी असतील तर तें प्रभुच्या बाजूचे असें गणले जातील. CChMara 366.1

ख्रिस्ती मंडळीच्या शुद्धिकरणाचे दिवस झपाट्यानें येत आहेत. लोकांनी शुद्ध व सत्य व्हावे असें देव करील. लवकरच जी महान् छाननी व्हावयाची आहे तिच्यावरून आम्हांला इस्राएलाच्या बळाचे मोजमाप करणे अधिक सुलभ होईल. प्रभूच्या हातांत त्यांचे सूप असून तो आपले क्षेत्र संपूर्णत: परिशुद्ध हें प्रगट होणार्‍य चिन्हांवरून तो वेळ जवळ आहे असें दिसून येत आहे. CChMara 366.2