कलीसिया के लिए परामर्श

300/318

देवाचा न्याय

युगाच्या अखेरीस आपण येऊन ठेपलो आहों परमेश्वराचे शासनकारी न्याय जगांत येऊन चुकले आहेत असें मला दाखविण्यांत आलेले आहे. ज्या गोष्टी घडून यावयाच्या आहेत तत्संबंधी प्रभूने आम्हांला पूर्वसूचना दिलेल्या आहेत. प्रभूच्या शास्त्रातून प्रकाश प्रज्वलीत होत आहे. तरी ही पृथ्वी काळोखांत गडप झालेली आहे व मानवजातीला निबीड अंध:काराने गाठलेले आहे. “शांति आहे. निर्भय आहे, असें तें म्हणतात तेव्हां.. अकस्मात नाश येतो. आणि तें निभावणारच नाहीत.” CChMara 365.1

प्रभु आपली बधने पृथ्वीतून काढून घेत आहे आणि लवकरच मरण व नाश तिला गाठणार आहे. अपराधांची वे निर्दयतेची वाढ होईल व गरीबांना पायाखाली घालून ज्या श्रीमतांनी स्वत:ला उच्च केलेले आहे त्यांच्याविरूद्ध दुष्टाई वरचढ होईल. जे परमेश्वरहीन आहेत, त्यांना कसलेही संरक्षण व सुरक्षिता कोठेही व कोणत्याही स्थितित मिळणार नाही. CChMara 365.2

अत्यत जोरदार यंत्राद्वारे मानवतेला घायाळ करून मारून टाकण्यासाठी मानवी हस्तकांना शिक्षण देऊन शोधक सामथ्र्याने कार्य करण्याचे सांगण्यांत येत आहे. CChMara 365.3

परमेश्वराचा न्याय जगांत चालूं आहे व लढाया व लढायांच्या आवया, अग्नीनें व अति वष्टिने होणारी हानी, ही हेच स्पष्ट सांगत आहेत कीं सकटाचा काळ अंत होईपर्यंत वाढत राहणार, तो अगदी हाताशी आलेला आहे. CChMara 365.4

राष्ट्राराष्ट्रांमध्ये दु:खदायक संकटे उद्भवतील व येशूच्या आगमनापर्यंत ती बंद पडणार नाहीत. येशूनें आपले आसन स्वर्गात प्रस्थापित केलेले आहे. व त्यांचे राज्य सर्वत्र चालेले आहे. आम्ही जे त्याची सेवा करीत आहों त्या आम्ही पूर्वी कदापि झालो नव्हतो तसे एकत्रित होण्याची गरज आहे. परमश्वराने आपल्या लोकांना सोडून दिलेले नाही व आम्ही त्याला सोडून न देण्यांत आमच्या सामर्थ्याची गुरूकिल्ली आहे. CChMara 365.5