कलीसिया के लिए परामर्श

302/318

उद्धारासाठी प्रयत्न करणार्‍यांचा विजय

मला असें दर्शविण्यात आलें कीं देवाचे लोक अत्यंत हादरून गेलेले आहेत. कित्येकजण बळकट विश्वासाने द:खाने ओरडत होतें व देवाजवळ याचना करीत होतें. मी पाहिलें कीं कित्येकजण त्या दु:खात व याचनेत कांही भाग घेत नव्हते. तें बेपरवाई असें होतें. आपल्या सभोवाराच्या अध:काराचा तें प्रतिकार करीत नव्हते त्यामुळे काळ्याकुट्ट ढगाने त्यांना कोंडून टाकिले होतें. देवाच्या दूतांनी ह्या लोकांना सोडून दिले होतें व जे आपल्या सर्व शक्तीने दुष्ट दूताना विरोध करण्याची धडपड करीत होतें व चिकाटीने देवाच्या साहाय्यासाठी प्रयत्न करीत होतें त्यांच्या मदतीसाठी तिकडे तें देवदूत लगबगीने जात होतें. असें मी पाहिलें. परंतु स्वत:ला मदत मिळविण्यासाठी जे काहीच हालचाल करीत नव्हते त्यांना दूतांनी सोडून दिले. व तें माझ्यापुढून नाहीसे झाले. प्रार्थना करणारे आपल्या आस्थेवाईक याचना करीत असताना मधून येशूपासून निघणारे प्रकाश-किरण उत्तेचित करण्यासाठी आणि त्याचे चेहरे प्रकाशमय करण्यासाठी त्यांवर झळकत होते. CChMara 366.3

चाललेली छाननी पाहन हिचा मतलब काय असा मी प्रश्न केला तेव्हां मला सांगण्यांत आलें कीं लावदिकीया येथील खिस्ती मंडळीस ज्या खर्‍य साक्षीने स्पष्ट साक्ष दिली तिच्यावरून ही छाननी व्हावयाची आहे. ही साक्ष ऐकणान्याच्या मनावर तिचा परिणाम घडून येईल व आपला दर्जा भारदस्त करण्यासाठी व सत्याचे सरळ प्रगटीकरण त्याला मार्गदर्शन देण्यांत येईल. कित्येकजण असली साक्ष देणार नाहीत, उलट तें तिला आडवे येतील व यामुळेच देवाच्या लोकांची छाननी करण्यांत येईल. CChMara 367.1

सत्य साक्षीच्या अध्र्वासुद्धा जबानीकडे लक्ष देण्यांत आलेले नाही. ज्या ह्या महत्वाच्या साक्षीवर मंडळीचे भवितव्य अवलंबून आहे. तिच्याकडे वरवरच पाहाण्यात येते किबुहना तिची सर्वस्वी उपेक्षा केली जाते. या साक्षी वरून अंत:करणपूर्वक पश्चाताप निर्माण झाला पाहिजे आणि जे जे कोणी ह्या साक्षीचा सत्य भावनेने स्वीकार करतील तें आज्ञापालन करून परिशुद्ध होऊन जातील. CChMara 367.2

देवदूत म्हणाला, “ऐका हो ! (कान देऊन ऐका) एवढ्यांत एक स्वर माझ्या कानांवर आला. तें जणू काय तालबद्ध वाद्यांच गोड व सुस्वर गाणे होतें. माझ्या कधीही ऐकण्यात आलेले नव्हते असें तें संगीत होतें. दया, करूणा व परमोच्च पवित्र आनंद यांनी तें सुसपन्न असलेले वाटत होतें. त्यानें मला संपूर्णत: थरारून सोडले. देवदूत म्हणाला : “हें पाहून घ्या !’ ज्यांनी अतिशय कसोटीने छाननी करण्यांत आलेली मी पाहिली होती अशा त्या टोळीकडे माझ लक्ष गेले. पूर्वी जे रडून व कळकळीने प्रार्थना करीत होतें. तेच तें होतें असें मी पाहीले. त्यांच्यासभोवार असलेल्या सरक्षक दूतांची संख्या दुपटीने झालेली होती. आणि शिरापासून तो पायापर्यंत तें लढाऊ वस्त्रांनी सुसज्ज झालेले दिसत होतें. शिपायांच्या टोळीप्रमाणे शिस्तीने व निश्चितपणे त्यांची अचूक हालचाल होत होती त्यांना जो कडक झगडा सहन करावा लागला व ज्या दुखदायक धडपडीतून जावे लागले याची छटा त्यांच्या चर्चेवर दिसून येत होती. तथापि जरी अंर्तयामी यातना त्यांना सहन कराव्या लागल्या होत्या तरी त्यांचे स्वरूप आता स्वर्गीय गौरवाच्या तेजाने प्रफुल्लीत झालेले होतें. तें विजयशाली झालेले होतें. अत्यंत निष्ठ कृतज्ञता, पवित्र व निर्भेळ उत्साह हेतु त्यानी व्यक्त करणे रास्त होय. CChMara 367.3

यांची समुहसंख्या कमी पडलेली होती कित्येक असें हादरून गेलेले होतें कीं तें रस्त्यावरून सोडून गेले (प्रकटी ३:१५-१७ पाहा) विजय व तारण प्राप्तीसाठी ज्यांनी भरपूर दम धरून भरपूर विनंत्या व याचना केल्या होत्या अशांसह अविचाराचे व बेपरवाईचे लोक न आल्यामुळे त्यांना तें साद्य झाले नाही, तें अंधारातच मागें खितपत पडले. परंतु ज्या इतरांना सत्याची प्राप्ति झालेली होती त्यांनी या मंडळीत मिळून उणी पडलेली भरून काढली. तरीही दुष्ट दूत त्याच्या आसपास होतेंच परंतु त्याच्यावर त्यांचा जोर चालला नाही (इफिस. ६:१२-१८ पाहा.) CChMara 367.4

युद्ध वस्त्र ल्यालेले सत्याविषयी जोरकस वाणीने बोलताना मी ऐकिले. तें फार परिणामकारी होतें. ज्यांना प्रतिबंध केलेला होता असेही माझ्या नजरेस आलें काहीं बायकांना नवर्‍यांनी आणि कांही मुलांना आईबापांनी प्रतिबंध केलेला होता. सत्य ऐकून घेण्यासाठी ज्या प्रामाणिक मंडळीला मागें ठेवण्यात अगर प्रतिबंध करण्यांत आला होता त्यांनी तें आता आस्थापूर्वक पत्करलेले होतें. नातलगांचे सर्व दपण नाहीसे झालेले होतें. सत्याची मात्र त्यांच्यापुढे प्रशसा होत होती जिवापेक्षा तें अधिक आवडते व मौल्यवान् होतें. सत्याची त्यांना भूक व तहान लागलेली होती. असला हा मोठा फरक होण्याचे काय कारण असें मी विचारलें. दूताने उत्तर दिले, “प्रभुच्या सान्निध्यापासून उतरणारा हा तेजस्वी वळवाचा पाऊस व त्रितीय दूताची ही जोरदार वाणी ही होत.” CChMara 367.5

निवडलेल्या लोकांच्या अंगी महान् सामर्थ्य होतें. देवदूत म्हणाला. “हें पाहा !” दष्टजन अगर विश्वास न ठेवणारे यांच्याकडे लक्ष गेले त्या सर्वांची तगमग होत होती. देवाच्या लोकांत दिसून येणार्‍य आस्थेमळे व सामथ्र्यामुळे तें बेचैन झालेले होतें व त्याना राग आलेला होता. चोहोकडे गोंधळच गोंधळ दिसत होता ज्यांना परमेश्वराचे सामर्थ्य व त्याचा प्रकाश दिलेला होता अशा ह्या लोकांच्या विरूद्ध उपाययोजना होत असलेल्या मी पहिल्या. त्यांच्यासभोवार दाट अध:कार होता, देवाने पसत केलेले व त्यावर विश्वास ठेवणारे तरी तें तसे व उभे होतें. मी त्यांना गोंधळून गेलेले पाहिलें. नंतर पुढे तें देवाला काकुळतीने विनवीत आहेत असें मी ऐकिले. रात्रंदिनी त्यांची ती ओरड थांबलेली नव्हती. (लूक १८:७,८; प्रकटी. १४:१४,१५ पाहा.) CChMara 368.1

मला हे शब्द ऐकू आलें: “हें देवा, तुझ्या इच्छेप्रमाणे होवो ! जर तुझ्या नामाचे गौरव होईल तर तू आपल्या लोकांच्या सुटकेचा मार्ग खुला कर ! आम्हासभोवार असलेल्या अधर्मापासून आम्हांला मुक्त कर ! आम्ही मरणाच्या दाढेत पडावे अशी त्यांची योजना आहे. परंतु तुझ्या बाहच्याद्वारे आम्हांला तारण मिळू शकेल.” एवढच सर्व शब्द माझ्या ध्यानात येतात. आपण किती अपात्र आहो याची जाणीव त्यांना झाली असून देवाच्या इच्छेला तें संपूर्णत: शरण गेलेले होतें. तरी याकोबाप्रमाणे कांही एक अपवाद न करिता प्रत्येकजण सुटकेसाठी आस्थापूर्वक याचना व झगडा करीत होता. CChMara 368.2

आपली आस्थेवाईक ओरड सुरू केल्यावर लवकरच सहानुभूतीने त्याची सुटका करण्यासाठी देवदृत येणार होतें. परंतु एका उंच धिप्पाड देवदूताने त्यांना मना करून म्हटले “देवाची इच्छा अध्यापी परिपूर्ण झालेली नाही.त्यानी प्याला प्यावयास पाहीजे व त्यांनी बाप्तिस्मा घ्यावयास पाहिजे.” CChMara 368.3

इतक्यात मी परमेश्वराची वाणी ऐकली. तिने स्वर्ग व पृथ्वी हादरून गेली (योएल ३:१६; इब्री १२:२६ आणि प्रकटी १६:१७.) भयंकर मोठा धरणीकंप झाला, सर्वत्र कोसळून खालीं पडल्या. नंतर मग मी एक मोठी, मंजूळ व स्पष्ट विजय-घोषणा ऐकली. थोड्याच वेळामागे संकटाने आणि बधनासवस्थने पीडित झालेल्या त्या मंडळाकडे माझी नजर गेली. त्यांची बधनावस्था गेलेली होती. त्याच्यावर तेजस्वी प्रकाश झळकत होता, त्यांची काया किती मनोरम दिसत होती! सर्व क्षीण व चिताची चिन्हें नष्ट झालेली होती. प्रत्येक चेहर्‍यवर आरोग्य व सौदर्य झळकत होतें. त्याच्या सभोवार असलेले अधर्मी, त्यांचे शत्रु जणु मरून पडलेले होतें. उद्धारलेल्या पवित्रजनांवर पडलेला प्रकाश त्यांच्याने सहन करवत नव्हता. CChMara 368.4

स्वर्गातील ढगांत येशू दिसेपर्यंत हा प्रकाश व ऐश्वर्य त्यांच्यावर राहिले आणि विश्वासूजन आणि कसोटीत उतरलेली मंडळी क्षणात निमिषार्धात गौरवापासून गौरवापर्यंत पालटून गेली, थडी उघडली गेली व संतजन अविनाशाच्या अविनाशाच्या भूषित होऊन बाहेर पडले व म्हणाले; “मरणावर व कबरेवर विजय!” आणि जिवंत असलेल्या खास संतगणांसह प्रभुला भेटण्यासाठी वर घेण्यात आलें व हें होत असताना प्रत्येक अविनाशी मुखातून गौरवाच्या व विजयाच्या घोषणा अति मंजूळपणे निघत होत्या. CChMara 369.1