कलीसिया के लिए परामर्श
अधिक दैवी मार्गदर्शनाची आईबापांना गरज
आपल्या मुलांना शिक्षा-शासन न देता त्यांना योग्य प्रकारचे शिक्षण देण्याची मातापितरांना निष्काळजी करिता येणार नाहीं. आईबाप म्हणून तुम्ही कसे अविश्वासू राहिला हें मुलें आपल्या दृषित स्वभावांनी जगजाहीर करितील. दुरुस्ती न करिता वाईट कृत्यांना वाव देणे, उर्मठपणा, उद्धट राहणी अपमान करणे, आज्ञाभंग करणे, आळसाच्या व दुर्लक्षणाच्या संवयी ह्या सर्वांच्याद्वारें तुमची बेअब्रु होईल व तुमच्या चरित्रांत कडूपणा उत्पन्न होईल. आपल्या मुलांचे भवितव्य फार मोठ्या प्रमाणांत तुमच्याच हाती असतें. तुम्ही आपले कर्तव्य चुकविले तर तुम्ही त्यांना सैतानाच्या वर्गात घालता व इतरांचा नाश करण्याचा त्यांना भक्ताच देता. उलटपक्षीं जर तुम्हीं त्यांना निष्ठापूर्वक शिक्षण दिले (योग्य वळण लाविलें) जर आपल्या स्वत:च्या जीवनाने धार्मिकतेचे उदाहरण घालून दिले तर तुम्हांला त्यांना ख़िस्ताकडे घेऊन जाता येईल व पर्यायाने तें दुसर्यांवर वजन पाडू शकतील व अशा प्रकारे पुष्कळांच्या तारणासाठी तुम्ही स्वत: साधनीभूत असें होऊन जाल. 31 CChMara 272.5
मुलांशी वागतांना साधेपणा राखावा अशी देवाची इच्छा असतें. वयस्कर मंडळीला शिक्षणासाठी मिळालेला दीर्घकाळ मुलांना मिळालेला नसतो हें आम्ही विसरता कामा नये. हरएक बाबींत लहान मुलें आमच्या म्हणण्याप्रमाणे वागत नसतील तर त्यांना दटावून ठेवणे रास्त असें आम्हांला कधीं कधीं वाटत असतें. परंतु याने सुधारणा घडून येत नाहीं. तारणाच्याकडे त्यांना घेऊन जा, त्याला सर्व कांही सांगून टाका नंतरच त्याच्या आशीर्वादाने ती संपन्न होतील असा विश्वास बाळगा. 32 CChMara 273.1
प्रार्थनेच्या वेळी मुलांनी सन्मान-बुद्धीनें व आदराने वागावे असें त्यास शिक्षण द्या. कामासाठी बाहेर पडण्यापूर्वी सर्व कुटुंबाला एकत्रित करावे व वडिलानें अगर त्यांच्या गैरहजेरीत मातेने त्यांना परमेश्वराने राखावे म्हणून आस्थापूर्वक त्याची प्रार्थना करावी. भरपूर प्रेमळ अंत:करणाने आणि तुम्हांला व तुमच्या मुलांना मोहापासून व संकटापासून राखण्यात यावे अशा बुद्धीनें नम्रतापूर्वक विनंति करा; प्रार्थना प्रसगी विश्वासाने त्यास बद्ध करून प्रभूच्या संरक्षणावर दूताचा पाहा राहील. सकाळ-संध्याकाळच्या कळकळीच्या प्रार्थनेने आणि निष्ठामय विश्वासाने आईबापांनी आपल्या मुलाभोवतीं संरक्षक कुंपनच करावें हें ख्रिस्ती आईबापाचे कर्तव्य होय. सहनशीलतेने त्यांना वळण लावीत राहावे आणि देवाला संतुष्ट करण्यासाठी कसे जगावे असें त्याना मायाळूपणे व न थकता शिक्षण देत राहावें. 33 CChMara 273.2
रोजरोज पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा घेण्याची मुलांना संधि मिळत आहे, हें त्यांना सांगत चला. ख्रिस्ताचे हेतु सिद्धीस नेण्यासाठी तुम्ही त्याचे हस्तक आहा असें त्याला आढळून येऊ द्या. आपल्या मुलांसाठी तुम्ही जी सेवा करीत आहां ती संपूर्णत: यशस्वी होईल, हें तुम्हांला प्रार्थनेच्या अनुभवाने कळन येईल. 34 CChMara 273.3
आईच्या प्रार्थनाचे सामर्थ्य किती थोर हें सागावे तितकें थोडेच आपल्या मुलाला व मुलीला घेऊन जेव्हां आई त्यांच्या बदलत्या बाल्यावस्थेविषयीं आणि तारुण्याचे मोह याविषयीं प्रार्थना करिते तेव्हां त्या प्रार्थना तिच्या मुलांच्या जीवनांत किती कार्यवाहक झालेल्या आहेत, हें तिला न्यायाच्या काळापर्यंत कदापि कळून येणार नाहीत. देवाच्या पुत्राशी जर तिचा निष्ठापूर्वक संबंध असेल तर आई आपल्या मायाळू हस्ताने आपल्या मुलाला मोहाच्या सत्तेपासून आवरून धरील व आपल्या मुलीला पापामध्ये पडू देणार नाहीं. मनोविकार ज्या ज्या वेळी आपली सत्ता स्थापन करण्यासाठी झगडत असतो, तेव्हां तेव्हां आईचे प्रेमसामर्थ्य आणि आवरून धरणारे आस्थेचे व निश्चित वजन हींच आत्म्याला सन्मार्गात स्थिर ठेवतील. 35 CChMara 273.4
तुमच्या मुलांसंबंधीचें कर्तव्य तुम्हीं योग्य प्रकारे पार पाडल्यावर त्यांना देवासमोर घेऊन जा व त्यांच्या साह्यासाठी विनंति करा. त्याला सांगा कीं, तुमच्यानें जें करवले तें तुम्हीं केलेले आहे व जें करवत नाहीं तें देवाने करावे अशी निष्ठेने मागणी करा. देवाने आपल्या पवित्र आत्म्याच्याद्वारे मुलांचे स्वाभावधर्म समतोल राखावेत व त्यांना सौम्यवृत्तींत व चांगुलपणांत वाढवावे. तो तुमची प्रार्थना ऐकणार आहे. तुमच्या प्रार्थनांना जबाब द्यावयास देवाला आवडते. आपल्या मुलांची सुधारणा करावी अशी देवाने आपल्या वचनाच्याद्वारे तुम्हांला आज्ञा दिलेली आहे. “त्याचे वाटोळे व्हावे अशी इच्छा धरू नको,’ व या बाबींत त्याचे शास्त्रवचन मान्य करावयास पाहिजे. 36 CChMara 274.1