कलीसिया के लिए परामर्श

214/318

सन्मान्बुद्धिचें व विनयशीलतेचें शिक्षण द्या.

वयस्कर मंडळींशी विनयशीलपणे आदराने वागावे, अशी देवाची विशेष आज्ञा आहे. “पिकलेले केस शोभेचा मुकुट होत; धर्ममार्गाने चालल्याने तो प्राप्त होतो.” नीति. १६:३१. युद्धसंग्राम केलेल्याची व विजय संपादनाची, कार्यभार वाहिल्याची व मोहपाश टाळलेल्याची तें साक्ष देतात. हें मनात आणण्यासाठी मुलांना मदत द्या. त्यांनी तसे केले तर ती आपल्या विनयशीलतेने व आदरबुद्धीने वयस्करांचा मार्ग सरळ करितील आणि ‘पिकलेल्या केसासमोर उठून उभे राहा, वृद्धास मान द्या.” लेवीय १३:३२. ही आशा मानिताना ती आपल्या तारुण्याच्या जीवनात देवाची कृपा व सायं घेऊन येतील. 37 CChMara 274.2

आत्म्याच्या कृपादनात विनयशीलता हेसुद्धा एक दान आहे व तें सर्वांनी संपादित केले पाहिजे. स्वभावधर्म सौम्य करण्याची त्यात ताकद आहे, उलट त्याविरहित तें असह्य व निघूर बनतात. ख्रिस्ताचे अनुयायी म्हणून जे स्वत:ला म्हणवितात तें जर त्याचवेळी निटूर, निर्दय आणि उद्धटपणे वागत असतील तर तें येशूच्या शिक्षण तालमींतील नसतात. त्यांच्या खरेपणाबद्दल शका नसेल व त्यांच्या स्पष्टपणाविषयी कांही प्रश्नहि नसेल; परंतु त्यांचा खरेपणा व त्याचा स्पष्टपणा मायाळूपणाची व विनयशीलतेची जागा भरून काढू शकत नाहीत. 38 CChMara 274.3

*****