कलीसिया के लिए परामर्श

212/318

शीलसंवर्धनाचें महत्त्व

देवानें आईबापांकडे काम सोपविले आहे व तें दैवी नमुन्याप्रमाणे आपल्या मुलाचे शील बनविणे हें होय. त्याच्या कृपेने तें कार्य साध्य होऊ शकेल. परंतु त्या कामी मुलांच्या इच्छाशक्तीला मार्गदर्शन व त्याच्या मनोविकारावर दाब ठेवण्यासाठी धिमेपणा, श्रमिक प्रयत्न आणि दृढ निश्चय व निर्णय सामर्थ्य यांची गरज आहे. जर एखादें शेत तसेच पडू दिले तर काय होईल? केवळ कांटे-कुसळे व तण मात्र वाढेल. उपयुक्ततेचा अगर सौंदर्याचा हगाम ज्याला हवा आहे. त्यानें प्रथम जमिनीची मशागत करून बी पेरिले पाहिजे. खुरपणी केली पाहिजे, रानगवत व तण काढन जमीन भुसभुशीत केली पाहिजे. तर मग कोठे त मौल्यवान रोपटी वाढून त्याच्य देखरेखीबद्दल आणि मेहनतीबद्दल त्याला भरगच्च मोबदला मिळून जाईल. CChMara 270.7

मानवाकडे जर एखादें अत्यंत महत्त्वाचे कार्य सोपविलेले असेल तर तें शील बनविणे हें होय व आज त्या विषयाचा अभ्यास जितका काळजीपूर्वक व महत्त्वाचा होऊन गेला आहे. तितका तो पूर्वी कधीही झालेला नव्हता. होऊन गेलेल्या कोणत्याहि पिढीला एवढ्या महत्त्वपूर्ण प्रश्नांना तोंड देण्यास कधीं पाचारण केलेले नव्हते. तरुण पुरुष व स्त्रिया ह्यांच्यासमोर आज जशा महान् जोखमी आलेल्या आहेत तशा पूर्वी कधीच आलेल्या नव्हत्या. 26 CChMara 270.8

शालातील सामर्थ्यांत इच्छाशक्ति आणि आत्मसंयमन या दोन गोष्टींचा अंतर्भाव होतो. भरभक्कम आणि अनियंत्रित मनोविकारांनाच शील-सामर्थ्य मानण्याची पुष्कळ तरुणांची चुकीची समजूत असतें; परंतु सत्य असें असतें कीं, मनोविकाराच्या ताब्यात असलेला इसम दुबळा असतो. आपल्या भावना कह्यात ठेवणारा माणूसच खरोखरीचा थोर व उदार असतो, जो भावनांच्या कह्यांत राहतो तो नव्हें. दुरुपयोगाविषयी जागृत ठेवून जो मनुष्य आपल्या मनोभावना आटोक्यात ठेवितो, व शत्रूना क्षमादान देतो, तोच अति उदात्त मनुष्य होय. असलीच माणसें खरोखरीचे रणशूर असतात. CChMara 271.1

आपण पुढें काय होऊ याविषयी पुष्कळांची अशी किती समजूत असतें कीं तें अखेरीस खुजे व सकुचित बुद्धिचेच राहतात. परंतु जर देवाने दिलेल्या इद्रिय-सामथ्र्यांचा त्यांनी सदुपयोग केला तर शिलाने तें थोर होऊन त्यांच्या वजनाने ख्रिस्तासाठी तें आत्मे जिंकणारे बनतील. ज्ञन हें एक सामर्थ्य आहे, परंतु अंत:करणाच्या चांगुलपणाशिवाय बौद्धिक चलाखी हें पापवृत्तीचे सामर्थ्य बनून जातें. CChMara 271.2

देवानें आम्हांला बौद्धिक आणि नैतिक शक्ति दिलेल्या आहेत. प्रत्येक इसम आपले स्वत:चे शील बनविणारा कारागीर असतो. रोजरोज ती घटना बनत असतें. अविनाशी खडकावर पाया घालून ती इमारत कशी उभारली जावी याविषयॊ देवाच्या वचनांत आम्हांसाठी सूचना दिलेल्या आहेत. आम्ही तिची कशी रचना केलेली आहे तें प्रगट होण्याची वेळ येत आहे. देवाने दिलेल्या शक्ति आम्ही सर्वांनी आताच अशा रितीने कमवाव्यात कीं आमचे स्वभावधर्म या जगांत आणि आगामी जगांत उत्कृष्ट जीवनासाठी उपयुक्त बनून जातील. CChMara 271.3

आमच्या जिण्यातील प्रत्येक कार्य, मग तें कितीहि साधे असो, शीलसंवर्धनाच्या कामी त्याचा उपयोग होतो. जगिक मालमत्तेपेक्षा उत्तम शील अधिक मौल्यवान असतें व तें बनविण्याचे कार्य मानवांनी हाती घ्यावयाच्या सर्व कार्यात अत्यंत थोर असें आहे. CChMara 271.4

परिस्थितींतून निर्माण झालेली स्वभावचरित्रे बदलर्ती व विसंगत असतात. तो एक परस्पर विरोधाचा ढीग असतो. असल्या शिलांच्या लोकांना जीवनांत उच्च ध्येय अगर उद्देश नसतो. दुसन्याच्या शिलावर त्यांचे भारदस्त वजन पडत नाहीं. तें ध्येयहीन व सामर्थ्यहीन असतात. CChMara 271.5

आम्हांला येथे लाभलेले टिचभर आयुष्य कौशल्यपूर्वक बनवीत राहावे. आपली मंडळी जिवंत, भक्तिशील व कार्यशील असावी, अशी देवाची इच्छा आहे. परंतु संस्था म्हणून आपले लोक आज यापासून दूर आहेत. बलवंत, धैर्यशील, कर्तृत्ववान व जागृत ख्रिस्ती लोकांना देव पाचारण करीत आहे. तें सत्य नमुन्याचे अनुकरण करणारे आणि देवासाठीं व सत्यासाठी आपले निश्चित वजन खर्चिणारे असावेत. अत्यंत महत्त्वाची व गांभीर्यपूर्ण अशी सत्यें देवाने आम्हांजवळ पवित्र ठेव म्हणून ठेविलेली आहे व त्याचे आमच्या चरित्रांवर व स्वभावधमॉवर वजन पडत आहे असें आम्ही दाखवावें. 27 CChMara 271.6

मुलांना सल्लामसलत देण्यांत वैयक्तिक अनुभव CChMara 271.7

आपल्या मुलांना वागविण्यात काहीं माता समतोलपणा राखीत नाहींत. कधीं कांहीं दु:ख किंवा नुकसान झाले तर त्या त्याचा लाड करितात, आणि बाल-अंत:करण अगदी प्रसन्न होईल अशी एखादी साधी गोष्ट देण्याचे त्या नाकारतात. अशा वर्तनांत ख्रिस्तांचे अनुकरण होत नाही; त्याची मुलांवर भाषा होती; त्यांच्या मनोभावना त्याला कळून येत व त्यांच्या आनंदात व अडचणींत तो त्यास सहानुभूति दाखवीत असें. 28 CChMara 271.8

जेव्हां एखाद्या संघाला अगर करमणूकीच्या टोळींत जाऊन मिळण्याची मुलें परवानगी मागतात तेव्हां त्याना सागा : “बाळांनो, मला तुम्हांला परवानगी देता येत नाहीं, बसा येथे व ती कां देता येत नाहीं, हें मी तुम्हांला सांगते. मजकडे सोंपलेल्या जबाबदारींचा संबंध अविनाशी काळाशीं व देवाशी येतो. देवानेच तुम्हांला माझ्या पदरात टाकिलें आहे व तुमचे संगोपन करण्याचे मजकडे सोपविले आहे. माझ्या बाळानों, मी देवाच्या जागीं तुम्हांपुढे आहे, म्हणून न्यायाच्या दिवशीं मला जबाब देता येईल अशा प्रकारे मला तुमचे संरक्षण केले पाहिजे. आपल्या मुलांविषयींचे कर्तव्य करण्यांत मी चुकली आहे व जेथे मी पाहिजे आहे, तेथें मी सैतानाला जागा दिली आहे. असल्या प्रकारची नोंद स्वर्गीय ग्रंथांत केली जावी असें तुमच्या आईविषयींनी दिलेले तुम्हांला आवडेल काय ? हें पाहा, मुलांनो, योग्य मार्ग कोणता, हें मी तुम्हांला दाखवून देणार आहे. या उपर आईचे न जुमानतां दुष्टाईच्या मार्गात तुम्हांला शिरावयाचे असेल तर आईकडे कांहीं दोष राहाणार नाहीं, परंतु तुमच्या पापांचे प्रायश्चित्त तुम्हांलाच भोगावे लागेल.” CChMara 272.1

मी माझ्या मुलांशी असेच वागले आणि माझे बोलणे संपते न संपते तोंच ती अश्रु ढाळीत होतीं व म्हणू लागली कीं, “आम्हासाठीं प्रार्थना कर ना?” पाहा, प्रार्थना करण्याचे तर मी केव्हाच टाळिलें नाहीं. त्यांच्याजवळ गुडघे टेकून मी त्यांच्यासह प्रार्थना केली. नंतर मग मी निघून गेलें व सूर्योदय होईपर्यंत रात्रभर मी देवाजवळ अशी प्रार्थना केली कीं, सैतानाची मोहिनी नष्ट होऊन जावी. परिणामीं मी विजयी झाले, हें साधण्यासाठी जरी मला उभी रात्र डोक्यावर घ्यावी लागली तरी मला त्याचे प्रतिफळ अत्यंत मौल्यवान असें लाभले. मुलें मला कवटाळून म्हणू लागली, “आई ग, आमच्या म्हणण्याप्रमाणे तू आम्हांला जाऊ दिले नाहींस, म्हणून आम्हांला किती तरी आनंद वाटतो. ती मोठी चूक झाली असती असें आता आम्हांला दिसून येत आहे.” CChMara 272.2

मातापितरांनो, अशाच प्रकारे तुम्हांला कार्य करावयास पाहिजे आहे व तें तुमच्या मनांतहि आहे. देवाच्या राज्यांत आपल्या मुलांचे तारण साधावयाचे असेल तर तें कार्य आपले स्वकर्म म्हणून हाती घेतले पाहिजे. 29 CChMara 272.3

शहरी वातावरणापासून बरेच दूर जाऊन मुलांना अलिप्त ठेवल्याशिवाय या देशीं अगर अन्य देश योग्य प्रकारचे शिक्षण तरुणांना कदापि देता येणार नाहीं. शहरांतील चालीरीति व संवयी तरुणांची मने अगदी नालायक करून टाकतात. 30 CChMara 272.4