कलीसिया के लिए परामर्श

211/318

रागिष्ट वृत्तींत मुलाचा दोष कदापि दाखवूं नका

मुलें जर आज्ञाभंग करीत असतील तर त्यांची चूक त्यांना दाखवून द्यावी. हें सुधारणाकार्य करण्यापूर्वी एकांतांत जाऊन प्रभूने मुलांची अंत:करणे सौम्य व अंकित करावीत व तुम्हांला त्यांच्याशी चतुराईने वागता यावे म्हणून प्रभूची प्रार्थना करा. ह्या पद्धतीचा अवलंब केला तेव्हां तीं चुकलीं असें मला कधीच आढळून आलें नाहीं. मनोविकाराने खळबळलेल्या अंत:करणाला (बापाच्या किंवा आईच्या) मुलास आत्मिक गोष्टी समजावून देता येणार नाहींत. CChMara 269.3

मुलांची सुधारणा प्रेमानेच करण्यांत यावी. रागावून शिक्षा करावी लागेपर्यंत मुलांना आपल्याच मार्गाने जाऊ देऊ नका. असल्या सुधारणापद्धतीने उपायाच्या ऐवजी अपायच मात्र होतो. CChMara 269.4

चुकलेल्या मुलावर रागावल्याने दुर्वृत्तीच अधिक वाढते. मुलाचे अति वाईट मनोविकार जागृत होतात व तुम्हांला त्याची परवाच नाहीं असें त्या मुलाला वाटू लागते. जर तुमच्या मनीं त्याच्याविषयी कांही चाड असती तर तुम्ही त्याला तशी वागवणूक दाखविली नसती, असें विचार त्याच्या मनात येतात. CChMara 269.5

या मुलांची दुरुस्ती तुम्ही कशी काय करता याचे देवाला ज्ञानच नाहीं असें तुम्हांला वाटते कीं काय? अर्थात त्याला ठाऊक असतें; ढकलून सारण्याच्या ऐवजी जर अंकित करण्यासाठी शिक्षाकार्य केले तर किती आशीर्वाद संपन्न परिणाम घडतात, हेहि तो जाणून आहे. 24 CChMara 270.1

मुलांसह कडक प्रामाणिकपणें वागण्याचें महत्व CChMara 270.2

मुलासमोर आईबाप हें सत्यतेचे प्रत्यक्ष नमुनेच होत. कारण मुलाच्या अंत:करणावर हा रोजचा धडा गिरविण्यात येतो. आईबापांच्या चरित्रांतील सर्व व्यवहारांत व विशेषत: त्यांच्या मुलांच्या शिक्षणांत व वळतात तें एक अखंडत तत्त्व आहे. “मुलाच्या कृतीवरून सुद्धा त्याचे कार्य शुद्ध अगर योग्य आहे कीं नाहीं हें समजून येत.” CChMara 270.3

ज्या मातेला सारासार विचार नाही व जी प्रभूचे मार्गदर्शन मान्य करीत नाही ती आपल्या मुलांना लबाड व ढोंगो होण्याचेच शिक्षण देईल. असल्या प्रकारची स्वभाव-उभारणी केल्यास श्वासोच्छवास जसा नैसर्गिक, तसेच निरतर खोटें जीवनही नैसर्गिक होऊन जाते. खरेपणाची आणि सत्यतेची जागा ढोंगच बळकावील. CChMara 270.4

मातापितरानो, कदापि दुतोंडे होऊ नका; शिक्षणात व व्यवहारात कदापि असत्य बोलू नका. अपल्या मुलाने सत्यवचनी व्हावे असें जर तुम्हांला वाटत असेल, तर तुम्ही स्वत: सत्यवचनी व्हा. सरळ आणि न बदलणारे असें व्हा. उडवाउडवीची वागणूक तिळमात्र होऊ देऊ नका. आईलाच दुटप्पीपणाची व असत्यतेची सवयी असल्यामुळे मुलें तिचा कित्ता गिरवितात. CChMara 270.5

मातेच्या चरित्रांत हरएक बाबीमध्ये प्रामाणिकपणा राखणे आवश्यक होय, तरुण मुलामुलींनी कदापि उडाणटप्पू होऊ नये व थोडकीहि फसवेगिरी करुं नये असले शिक्षण मुलांना देणे महत्त्वाचे होय. 25 CChMara 270.6