कलीसिया के लिए परामर्श

208/318

आळशीपणाची दुष्टता

पुष्कळसें पाप आळशीपणातून उद्भवते असें मला दर्शविण्यांत आलें आहे. कामकाजांत गुतलेल्या मनांना शत्रूने सूचित केलेल्या प्रत्येक मोहाकडे लक्ष देण्यास सवड नसते, परंतु आळशी हात व मनें सैतानाच्या ताब्यांत जावयास अगदी तयारच असतात. मन चांगल्या गोष्टींत रमलेले नसते, तेव्हां तें अयोग्य गोष्टींकडे वळते. आळस पाप आहे, हें आईबापांनी आपल्या मुलांस शिकवावें. 16 CChMara 266.1

आपल्या मुलांवरचा सर्व भार काढून घ्यावा. आळशी, उद्देशहीन, निष्क्रिय अगर लहरी जीवनाकडे त्यास सोंपून द्यावे, असली ही अवस्था दृष्टाईकडे वळण्यास जितकी आकर्षक असतें तितकी दुसरी कोणतीच नसते. मुलांची मनें चलाख असतात व जें उत्कृष्ट व उपयुक्त आहे यांत जर ती गुंतली नाहीत तर जे वाईट आहे त्याकडे ती उघड-उघड वळली जातील. करमणूक तर त्यांच्यासाठी योग्य व अवश्य असतेच तरी काम करावयास, शारीरिक परिश्रमासाठी व तसेच वाचनासाठीं व अभ्यासासाठी नियमित वेळ देण्याचे त्यास शिक्षण देण्यांत यावे. वयोमानाप्रमाणे तीं गुंतलेली राहतील व उपयुक्त व मनोरंजक पुस्तकें त्यांना दिली जातील याकडे लक्ष द्या. 17 CChMara 266.2

एखादें काम हाती घ्यावयास मुलें वारंवार मोठी उत्साही असतात. पण कांहीं गोंधळ झाला अगर कंटाळा आला, तर तें सोडून दुसरे कांहींतरीं नवीन हातांत घेतात. अशा प्रकारे कित्येक वस्तू ती हाताळीत राहातात व थोडीशी निराशा झाली कीं त्या टाकून देतात. अशा प्रकारे कोणतेही काम पुरे न करिता एका मागून एकाची धरसोड करितात. आईबापानी आपल्या मुलांना असल्य धरसोड सवयी जडू देऊ नये. आपल्या मुलांच्या विकसित मनाला शांतपणे शिस्तबद्ध करण्यास त्यांना फुरसतच मिळू नये अशी इतकी कामे त्यांनी घेऊ नयेत. एखाद्या उतेजनदायी शब्दानें अगर योग्यवेळी थोडीशी मदत दिल्याने त्याचा त्रास व निराशा निघून जाईल व हातीं धरलेले कार्य पुरे केल्याच्या समावाताने अधिक मोठे परिश्रम करण्यास त्यांना उत्तेजन येईल. 18 CChMara 266.3

मलांचा लाड केला व त्यांच्यासाठी सर्व कांही केले तर त्यांना सर्वदाच तीच अपेक्षा वाटते, आणि तसे जर कधीं झाले नाही तर तीं निराश व उदास होतात. हाच स्वभाव त्यांच्या सर्व आयुष्यांत दिसून येईल. कोणाचे तरी साह्य मिळाले नाही तर ती हताश होतात, कोणीतरी मेहरबानी करून आमचे चालवावे, अशी त्यांची अपेक्षा असतें. जर कोणी काहीं विरोध केला तर वयाने पक्ति झालेल्या अशा स्त्री-पुरुषास तो एक अपमान वाटतो. अशारितीने त्याचे जीवन ह्या जगांत कंटाळवाणे होतें, त्याचा स्वत:चा भार त्यांना वाहता येत नाहीं व आपल्या इच्छेनुरुप गोष्टीं घडत नाहीत म्हणून वारंवार त्यांची कुरकूर व धुसफूस चाललेली असतें. 19 CChMara 266.4

एखादी गृहिणी घरातील आपले स्वत:चे व त्या सर्वांचे (घरांतील मंडळीचे) काम उरकून घेते-सरपण-पाणी आणिते, कुन्हाडीने सरपणाची फोडतोड करते आणि त्याचवेळी तिचा पति व पुत्र घरात आरामशीर बसून इकडच्या तिकडच्या शिळोप्याच्या बाता मारीत बसतात, तेव्हां ती गृहिणी स्वत:चा व आपल्या कुटुंबाचा मोठा अन्याय करिते. स्त्रियांनी-मातांनी गृहांत गुलामगिरी करावी, अशी परमेश्वराची योजना कदापिही नव्हती. घरगुती खटपटींच्या ओझ्यात मुलांनीं भाग उचलावा असले शिक्षण त्यास न मिळाल्यामुळे अनेक माता चिताग्रस्ततेने भारावलेल्या असतात. याचा परिणाम असा होतो कीं त्यांना म्हातारपण गांठिते व अवेळीच त्या मृत्युमुखीं पडतात. ज्यावेळी त्यांच्या अनानुभविक मुलांना मातांच्या मार्गदर्शनाची अत्यंत गरज असतें, तेव्हाच हें दुर्देव घडून येते. याचा दोष कोणाकडे? CChMara 266.5

पत्नीला काळजीपासून राखावें व तिला आनंदित ठेवावे, म्हणून नवर्‍यने सर्व कांहीं करावयास पाहिजे. मुलांना आळसाच्या आवडींत कदापि वाढू देऊ नका, कारण थोडक्याच वेळात ती संवय बनून जाते. 20 CChMara 267.1