कलीसिया के लिए परामर्श
मुलांना अज्ञानांत वाढूं देणे हें पाप होय
आपल्या मुलांना धार्मिक शिक्षण न देण्यांत कांहीं आईबाप चुकले असतील व त्यांना शालेय शिक्षण देण्याचीही त्यांनी हेळसांड केलेली असेल. ह्या दोन्ही गोष्टींची त्यांनी निष्काळजी करावयाची नव्हती. मुलांची मनें चलाख असतात आणि जर ती शारीरिक श्रमांत अगर अभ्यासात गुतविली नाहींत तर ती दुष्ट करामतींसाठी रिकामी असतात. मुलांना अज्ञानांत वाढू देणे हें आईबापाचे एक पापच असतें त्यांनी मुलांना उपयुक्त व मनोरंजक पुस्तकें द्यावयाची असतात, परिश्रम करावे, शारीरिक कष्ट करण्यांत, अभ्यासात व वाचनांत कांहीं तास घालविण्याचे शिक्षण त्यांस द्यावयास पाहिजे. आईबापांनी आपल्या मुलांची मनें उदात्त करण्याचा प्रयत्न करावा व त्यांची मानसिक सामर्थ्यात सुधारणा करीत राहावे. अडाणी मन जर तसेच राहूं दिले तर तें बहुधा हलकट, विषय-लंपट व भ्रष्ट अशा अवस्थेत राहतें-बेकार मनाला आपले ज्ञान देऊन सैतान आपले कार्यक्षेत्र वाढवीत राहतो. 12 CChMara 265.1
बालपणापासूनच मातेच्या कार्याला प्रारंभ होतो. आपल्या बाळाची इच्छा व त्याचा स्वभाव तिने आटोक्यात आणावा, त्याला आपल्या कह्यांत ठेवून सांगितलेले तें ऐकावयास शिकवावे. जसजसे तें वाढत जाईल तसतसा तिने आपला हस्त आखडून घेता कामा नये. प्रत्येक आईने मुलांशी समजुतीच्या गोष्टी करीत जाव्या, त्यांच्या उणीवा दाखवीत जाव्या व शांतपणे यथायोग्य शिक्षण देत राहावे. आपली मुलें देवाची लायक मुलें होण्याचे शिक्षण ख्रिस्ती आईबापांनी द्यावयाचे हें त्यांनी समजून घेतले पाहिजे. लहानपासूनच दिलेल्या शिक्षणाचा व शील बळवण्याचा परिणाम मुलांच्या संबंध धार्मिक अनुभवात दिसून यावयाचा असतो. आईबापांच्या मर्जीप्रमाणे वागण्यापुरती जर मुलांची मने ताब्यात यावेळी ठेवण्यात आली नाहीत तर पुढे तें कार्य आटोक्यात आणणे फार जडे जाणार आहे. देवाच्या सागण्याप्रमाणे राहण्यास जर त्याच्या इच्छा कधीचं ताब्यात ठेविल्या नाहीत तर केवढी तरी धडपड व केवढा तरी गोंधळ उद्भवणार आहे ! जे आईबाप ह्या महत्त्वाच्या कार्याची हेळसांड करितात तें आपल्या लाचार मुलांच्या देवाच्याविरुद्ध मोठा गुन्हाच करितात. 13 CChMara 265.2
आईबापांनो, आपल्या मुलांना शिक्षण देण्याचे जे कर्तव्य देवाने तुम्हांकडे सोंपिलेले आहे, त्यात जर तुम्ही चुकलात तर होणार्य परिणामाचा जाब तुम्हांला देवासमोर द्यावा लागेल हें आघात तुमच्या मुलांपुरतेच राहाणार नाहींत. ज्याप्रमाणे थोडीशीं काटेकुसळे पिकात वाढू दिल्याने त्याच्याच अखेरीस हंगाम होऊन जातो, त्याचप्रमाणे तुमच्या निष्काळजीचीं पायें तुमच्या मुलांच्या संबंधात येणार्य सर्वांचा नाश करून टाकतील. 14 CChMara 265.3
अविश्वासू आईबापांवर देवाचा शाप खात्रीने राहणार आहे. त्यांनी पेरलेली कुसळे येथेच मात्र त्यांना अपायकारक होणार नाहीत, तर न्यायासनासमोर आपल्या अविश्वासूपणाबद्दल त्यांना उत्तर द्यावे लागणार आहे. पुष्कळशी मुलें न्यायकाळी उठून आम्हांला ताब्यात ठेविलें नाहीं म्हणून आईबापांना दोष देतील व त्यांच्या नाशाबद्दल त्यावर ठपका ठेवितील. आईबापांच्या खोट्या सहानुभूतीमुळे व अधळ्या प्रीतीमुळे त्यांनी आपल्या मुलांचे अपराध कांहीं एक सुधारणा न करिता वाढ़ दिले व परिणामी त्यांचा नाश होऊ दिला तर त्यांच्या आत्म्याच्या घाताचा जबाब त्या अविश्वासू आईबापांवरच राहणार आहे. 15 CChMara 265.4