कलीसिया के लिए परामर्श
आईबापांनो, मुलांना ख़िस्ताकडे घेऊन जा.
योग्य प्रकारें वागण्याचें मुलांच्या मनात येत असेल, आपल्या आईबापाच्या अगर पालकांच्या आज्ञेत राहन त्यांच्याशी प्रेमळपणाने वागण्याचा त्यांचा हेतूहि असेल; पण ह्या कामीं त्याना मदत व उत्तेजन द्यावयास पाहिजे असतें. चांगले, चागले निश्चय ती करूं शकतील, पर तत्संबंधींची तत्त्वे धार्मिकतेनें सबळ केल्याशिवाय तसेच देवाच्या कृपेने त्यांच्यात झालेल्या नवीकरणाने त्यांची चरित्रे परिणामकारक झाल्याशिवाय तें आपले निश्चय करूं शकणार नाहींत. CChMara 267.2
आपल्या बालकांच्या तारणासाठीं मातापितरांचे परिश्रम दुपटीने वाढले पाहिजेत. त्यांना द्यावयाचे शिक्षण मोठ्या निष्ठेने दिले पाहिजे. मुलांच्या समजुतीप्रमाणे (लहरीप्रमाणे) तें त्यानी इकडून तिकडून गोळा करुं नये. भल्याबुर्यांचा भेदाभेद न पाहता पुढे प्रसंग येईल तेव्हां वाईट जें आहे तें कमजोर होईल व चांगलेच प्रबळ होईल, अशा कल्पनेने तरुणांना ज्ञान संपादन करुं देऊ नका. चांगल्यापेक्षा वाईटाचीच प्रगती अधिक झपाट्यानें होत असतें. CChMara 267.3
मातापितरांनो, आपल्या मुलांची मने शिस्तींत ठेवण्याचे कार्य ती लहान लहान असतानाच हातीं घ्या, पर्यायाने ती ख्रिस्ती होऊ शकतील, त्यांच्या तारणासाठींच आपले सर्व परिश्रम खर्ची घाला. देवाच्या राज्यामध्ये ती मौल्यवान अशी रत्ने कशी झळकतील एवढ्याचसाठी जणू काय ती तुमच्या हवाली करण्यांत आलेली आहेत असें समजून वागा. जबाबदारी ओळखण्या इतकी ती अद्याप मोठाली झालेली नाहींत; पापाबद्दल पश्चात्ताप करावा आणि ख्रिस्ताचा अंगीकार करावी एवढीं तीं वाढलेली नाहीत, अशा खोट्या विचाराने तुम्ही त्यांना नाशाच्या बिच्छान्यावर गोडीने कसे झोपवीत आहा, याची सावधगिरी घ्या. CChMara 267.4
आपल्या मुलांच्या तरुण मनाला अवगत होईल अशा रितीने आईबापांनी तारणाची योजना सोपी करून त्याना समजावून द्यावी. मुलांना त्यांच्या स्वत:च्या धर्माविषयी शिकविण्याकरिता त आठ, दहा, बारा वर्षांची झाली म्हणजे ती पुरेशी वाढलेली असतात. तुम्ही मोठे झाल्यावर पश्चात्ताप करून सत्याचा स्विकार कराल, अशा भविष्यकाळाविषयीं मुलांना शिक्षण देऊ नका. चांगल्या रितीने शिक्षण दिल्यास लहान मुलांनासुद्धा आपण पापी आहों व ख्रिस्तामध्यें तारणाचा मार्ग सापडतों, याची त्यांना चांगली कल्पना येईल. दीक्षित पाळक बहुतकरून मुलांच्या तारणाच्या प्रकरणीं बेफिकीर असतात व तत्संबंधी कांहीं खाजगी संबंधहि घडवून आणावा तसा आणीत नाहींत. मुलांच्या मनावर छाप मारण्याची मौल्यवान संधि वारंवार गमविली जाते. 21 CChMara 267.5
मातापितरांनो, तुमच्या माथी असलेली महत्त्वाची जबाबदारी तुमच्या लक्षात येते काय ? बेपरवाईच्या व नीतिभ्रष्टकारक सवयीपासून आपल्या मुलांच्या संगोपनाची आवश्यकता आहे, हें तुम्हांला समजून येते का? त्याच्या शिलावर योग्य प्रकारचे वजन पडेल अशाच मात्र सगतिसोबतींत तुमच्या मुलांना जाऊ द्या. ती कोठे आहेत व काय करतात याची तुम्हांला माहिती असल्याशिवाय त्यांना संध्याकाळच्या (रात्रींच्या) वेळी बाहेर राहूं देऊ नका. नैतिक शुद्धता काय आहे याविषयी त्यांना शिक्षण देत चला. ओळीवर ओळ, नियमावर नियम, इकडे काहीं थोडे, तिकडे कांही थोडे शिकविण्याची जर तुम्हांकडून हेळसांड झालेली असेल, तर आजच त्या कर्तव्याला लागा. आपली जबाबदारी नजरेपुढे ठेवून सांप्रतच्या व सनातन काळासाठी कार्य करूं लागा आपल्या मुलांची निष्काळजी झाल्यास ती कबूल करण्यास एका दिवसाचाहि विलंब करुं नका. देवाने नेमलेले कार्य आता करावयाचेच असें त्यास सांगून टाका. सुधारण्याच्या कार्यात त्यांनी सहकार करावा असें त्यास सागा. होऊन गेलेल्या गोष्टींची भरपाई करण्याची मेहनतीने खटपट करा. लावदिकीया येथील मंडळीच्या अवस्थेत राहूं नका. प्रभूच्या नामांत प्रत्येक कुटुंबाला मी सांगत आहे कीं तुम्ही आहांत तसेच दाखवा. तुमच्या स्वत:च्या गृहातूनच मंडळींची सुधारणा घडवून आणा. 22 CChMara 268.1