कलीसिया के लिए परामर्श

204/318

प्रकरण ४५ वें - आमच्या मुलांचें योग्य शिक्षण व शिस्त

तरुणांना आपल्याच स्वाभाविक तंत्राप्रमाणे वागू द्यावें ही प्रवृत्ति जगांत वाढती आहे, असें दिसून येते. तरुण जेव्हां अगदी बेफाम झालेले दिसतात तेव्हां आईबापांनी भूलमय समजुतींत म्हणावें थोड्या वेळाने तें शुद्धीवर येतील. सतरा-अठरा वर्षाचे झाल्यावर तें स्वत:च विचार करून आपल्या वाईट सवयी सोडून देतील व शेवट तें उपयुक्त पुरुष व चागल्या स्त्रिया बनून जातील. केवढी ही मोठी भूल होय ! अंत:करणरुपीं बगीच्यामध्ये शत्रूला वर्षानुवर्षे लागवड करूं देतात; अयोग्य तत्त्वे खुशाल वाढू देतात व नंतर तेथें पुष्कळ परिश्रम केले तरी यत्किंचितही फायदा होत नाही. CChMara 261.1

सैतान हा मोठा कुशल कारागीर आणि घातक शत्रू आहे. तरुणांच्या नाशासाठी एखादा बेसावधगिरीचा शब्द बाहेर पडला. भग तो थट्टा मस्करीने उच्चारलेला असो अगर पापाकडे काना डोळ्याने पाहाण्यासाठी तो सूचक असो, सैतानाला ती एक सुसंधिच मिळते. त्या वाईट बिजारोपणाने चांगले मूळ धरावें व वाढून त्याचा चांगलाच हगामही उतरावा अशी त्याची कावेबाज करामत असतें. मुलांनी अयोग्य संवयी उचलाव्यात हें आईबाप खुशाल घडू देतात व त्यांच्या सर्व आयुष्यांत त्याच्या निशाण्या दिसून येतात. ह्या पापाला आईबापच जबाबदार असतात. ही मुलें ख्रिस्ती असू शकतील तथापि त्यांच्या अंत:करणावर कृपेचा विशेष काहीं आघात झालेला नाही व त्यांच्या जीवन चरित्रात सुधारणा घडवून आणली नाही तर त्याच्या सर्व अनुभवांत त्या वाईट संवयांचा प्रत्यय येत राहील व त्यांच्या आईबापांनीं त्यांना जसे शील बनवू दिले तेच शील प्रगट करण्यांत येईल. 1 CChMara 261.2

आईबापांनी आपलीं मुलें ताब्यात ठेविली पाहिजेत, त्याचे मनोविकार सुधारले पाहिजेत व त्याना वठणीवर आणिले पाहिजे, नाहीं तर देव आपल्या भयकर कोपाग्नीच्या दिवशी त्याना खात्रीनें भस्मसात करून टाकील आणि ज्या आईबापांनी आपल्या मुलांवर ताबा राखिला नाहीं तीही कांहीं निर्दोष राहाणार नाहींत. देवाच्या सेवकांनीं तर विशेषत: आपापल्या कुटुंबाचा कारभार नीट करावा व त्यांना चागले ताब्यात ठेवावे. आपली स्वगृहव्यवस्था ज्यांना नीटपणे आटोक्यात ठेविता येत नाही त्याची मडळींमध्ये न्यायनिवाडा करण्याची तयारी नसते, हें माझ्या पाहाण्यात आलें आहे. प्रथमत: त्यानी घरातील शिस्त राखिली पाहिजे तेव्हाच कोठे त्यांचे निर्णय व त्याचे वजन मंडळीमध्ये मानिले जाईल. 2 CChMara 261.3

रात्रींच्या वेळी घरी न राहिल्यास प्रत्येक मुलाने व मुलीने त्या गैरहजरीचा जबाब दिला पाहिजे. आपली मुलें कसल्या संगतसोबतींत आहेत हें आईबापांना ठाऊक असावे आणि आपल्या संध्याकाळच्या वेळी ती कोणाच्या घरींदारी वेळ काढितात हें त्यांना समजले पाहिजे. CChMara 261.4

देवाला अवगत नाहीं असें काहीं तत्त्वज्ञान मानवाने शोधून काढलेले नाहीं अगर मुलांशीं वागण्याची पद्धत प्रभूने दर्शविल्यापेक्षा अधिक सूज्ञतेची पद्धत मानवाच्या हाती आलेली नाहीं उत्पन्नकर्त्याला मुलांच्या गरजा जेवढ्या समजतात त्यापेक्षा अधिक कोणाला समजून येतात? ज्याने स्वरक्ताने त्यांना खंडून घेतले आहे त्यांच्या हितचिंतनापेक्षा अधिक खोल हितचिंतन कोण करूं शकेल? जर देवाच्या वचनाचे ध्यानपूर्वक अध्ययन केले व त्याचे निष्ठापूर्वक आज्ञापालन केले तर दुष्ट मुलांच्या दुर्वतनाविषयींची चिता कमी वाटू लागेल. CChMara 262.1

मुलांच्या आईबापांपासून ज्या हक्कवजा मागण्या आहेत त्या आईबापांनी समजून घ्याव्या त्याकडे त्यांनी लक्ष द्यावे. इहलोकीं मुलांनी उपयुक्ततेत व संभावितपणात वाढत राहावे आणि आपल्या मंडळीमध्ये आवडते व्हावे, तद्वतच यानंतर लाभणारी शुद्ध व पवित्र मंडळी हिच्यातही त्यांना योग्य तें नैतिकस्थान मिळावे व असल्या प्रकारचे योग्य शिक्षण त्यांना देण्यांत यावे, हा त्यांचा हक्कच होय. आपण आपल्या बालपणीं व तारुण्यात ज्या सवयी लावून घेतो त्यावरच पुष्कळ अशी त्याचे सांप्रतचे व भावी कल्याण अवलंबून असतें, हें तरुणांना शिकविण्यात यावें. 3 CChMara 262.2

पवित्रशास्त्राविषयीं आदर बाळगावा व त्यांतील शिक्षणाला अनुसरावे अशा समजुतीचे पुष्कळ स्त्री-पुरुष त्यांतल्या अट्टी पुष्कळदा पाळण्यास चुकतात. मुलांना शिक्षण देतांना देवाच्या प्रगट झालेल्या इच्छपेक्षा आपल्याच कुटिल स्वभावाचे अवलंबन करितात. कर्तव्याच्या अशा निष्काळजीमुळे हजारों आत्मे धोक्यात येतात. मुलांच्या योग्य शिस्तीविषयीं पवित्रशास्त्राने नियम घालून दिलेले आहेत. ह्या ईश्वर-संमत अट्टी जर आईबापांनी पुढे ठेविल्या तर कर्तबगारीच्या क्षेत्रात फार वेगळी तरुण-मंडळी आज आम्हांस पाहावयास मिळेल. परंतु आम्ही पवित्रशास्त्र वाचणारे व त्याचे अनुकरण करणारे आहों असें ताने म्हणत त्या शिक्षणाच्या अगदी उलट तीं वागतात. आपल्या मुलांच्या दुर्वर्तनामुळे आईबापाची मने कशी दुःखीत व चिंतातून झालेली आहेत, हें आम्हांस ऐकावयास व पाहावयास मिळते. परंतु ती दुःखें व त्या चितांच्या मुळाशीं आणि मुलांच्या नाशाशी त्यांचेच वेडगळ प्रेम कारणीभूत आहे, हें तें आईबाप क्वचितच ओळखून घेतात. अगदी बाळपणापासूनच मुलांना योग्य प्रकारच्या संबंधित वाढविण्याची जबाबदारी त्यांना देवाने दिलेली होती, हें त्यांच्या ध्यानात येत नाहीं. 4 CChMara 262.3

जीं मुलें ख्रिस्ती आहेत त्यांना जगांतील कोणत्याही आशीर्वादाहून आपल्या देवभिरु आईबापांवर प्रीति करावी व त्यांना खूष ठेवावें हें अधिक आवडणार आहे. ती आपल्या आईबापांवर प्रीति करितील व त्यांना आदर देतील. आपल्या मातापितराना सुखी-समाधानी कसे राखावे हा त्याच्या अभ्यासांतील मुख्य अभ्यास होय. ज्या मुलांना योग्य शिक्षण व शिस्त मिळाली नाहीं त्यांना आजच्या ह्या बंडखोर युगात आपल्या आईबापांच्या उपकाराचे क्वचितच ध्यान राहाते. वारंवार असेच दृष्टोत्पतीस येत आहे कीं आईबापांनी आपल्या मुलांसाठी जितकें अधिक करावे, तितकेंच अधिक तें अनुपकारी व त्याच्या मनात तितकात कमी आदर दिसून येतो. CChMara 262.4

आपल्या मुलांची भावी उन्नति आपल्या हातांत आहे असें आईबापांना पुष्कळाशी वाटत असतें. त्यांच्या शीलसंवर्धनाचे महत्त्वाचे कार्य त्यांच्यावरच अवलंबून असतें. बाळपणीं दिलेलें शिक्षण त्यांच्या उभ्या आयुष्यांत त्यांच्या प्रत्ययाला येईल. मातापितरें बी लावितात व कालांतराने त्यांना इष्ट किंवा अनिष्ट प्रतिफळ मिळते. आपल्या पुत्र-कन्याना संपन्नावस्थेसाठी अगर विपन्नावस्थेसाठी त्यांची सिद्धता करण्यांत येते. 5 CChMara 262.5