कलीसिया के लिए परामर्श

203/318

तागडीतून तोललेला

आमचे स्वभावधर्म, आमची वर्तणूक आणि आमच्या मनांतील उद्देश, ही सर्व पवित्रस्थानांतील तागडीने परमेश्वर तोलून पाहात आहे. आमचीं अंत:करणे स्वत:कडे ओढून घेण्यासाठी आमच्या उद्धारकानें क्रूसावर आपला प्राण दिला. त्यानें आम्हांला स्पष्टपणे सागून टाकले कीं आम्ही प्रेमात व आज्ञापालनांत उणे भरलो तर ती किती भयप्रद गोष्ट होईल देवाने थोर आणि मौल्यवान देणग्या आमच्या हवाली केल्या आहेत आणि त्याच्या इच्छेतून प्रगट होणारा प्रकाश व ज्ञान हीं त्यानें आम्हांस देऊन टाकिलीं आहेत व हें सर्व अशासाठीं कीं आम्ही कसलीही चूक करिता कामा नये अगर अंधारांत वावरताही कामा नये. तागडींतून तोलल्यावर अखेरच्या निर्णयात आणि प्रतिफळात जर आम्ही अपुरे आढळून आलो तर ती किती भयंकर गोष्ट होईल व कधीही भरून काढिता येणार नाही अशी ती जबरदस्त चूक होऊन जाईल. तरुण मित्रानो, देवाच्या ग्रंथातून तुमची नावें शोधताना पाने फुकटच चाळावी लागतील का? CChMara 259.1

तुम्हीं देवासाठी काम करावे म्हणून त्यानें तें तुम्हांसाठी नेमून ठेविलेले आहे व त्यामुळे तुम्ही त्याचे सहकारी होणार आहा. तुम्हांसभोवार असलेल्या सर्व आत्म्याचे तारण करावयाचे आहे. आपल्या आस्थेवाईक प्रयत्नानी तुम्हांजवळ असलेल्या लोकांस उत्तेजन देऊन त्यास आशीर्वादित करता येईल. पापमार्गातून आत्म्याची सुटका करून त्यांना धार्मिकतेत आणावयाचे आहे. आपण देवाला जबाबदार आहों असें तुम्हांला कळून आल्यावर सैतानाच्या मोहपाशास तोंड देण्यासाठी प्रार्थनेत व जागृतीत निष्ठापूर्वक राहाण्याची तुम्हांला गरज वाटू लागेल. जगांतील नैतिक अध:कारात, हलकटपणांत व पोषाखाच्या घमेंडींत राहाण्यापेक्षा तत्संबंधी आम्हीं अधिक शोकाकूल व्हावे असें तुम्ही खरे ख्रिस्ती असाल तर तुम्हांला वाटू लागेल. आमच्या देशात ज्या तिरस्कारणीय गोष्टी घडत आहेत तत्संबंधी जें दु:ख व रुदन करीत आहेत अशामध्ये तुम्हीही असाल. व्यर्थतेत कपड्यालयांच्या व दागदागिन्याच्या शोभेत व भपक्यात रमून जाण्याच्या सैतानी मोहांना तुम्ही प्रतिकार कराल. भारी भारी जबाबदार्‍यांची बेपरवाई करून हलकट व निरर्थक गोष्टींत समाधान मानिल्याने मन अकुचित आणि बुद्धि बोथट होऊन जाते. CChMara 259.2

इच्छा असेल तर आमच्या आजच्या तरुणांना ख्रिस्ताचे सह-कामकरी होता येईल व तें कार्य करता त्याची निष्ठा सबळ होईल आणि दैवी इच्छेचे त्यांचे ज्ञान वाढत राहील. प्रत्येक शुद्ध हेतूची आणि प्रत्येक सत्कार्याची जीवनी पुस्तकांत नोंद केली जाईल. आत्मतृप्तीसाठीच जगणे व या जीवनातील हलकट व निरर्थक गोष्टींच्या पाठीस लागून आपली बुद्धिमता खुजट करणे ह्या पापाची तरुणांना जाणीव व्हावी याकरिता तरुणांत जागृति निर्माण करावी असें मला वाटत आहे. जगांतील नीचतेच्या आकर्षणापणून आपल्या विचारांना व बोलाचालींना जर त्यांनी उंचावलेव देवाचे गौरव हेच जर त्यांनी आपले ध्येय केले तर सर्व बुद्धिच्या पलिकडे असणारी त्याची शांति ही त्यांचीच होईल. 7 CChMara 259.3

मनानें आस्थेवाईक, देवाच्या थोर कार्यासाठी सुसज्ज आणि जोखीम वाहाण्यास पात्र अशी माणसें तरुणांनी बनून जावीत असा ईश्वरी सकल्प आहे. देवाचे गौरव करावे व मानवतेला आशीर्वादसंपन्न करावे म्हणून जे तरुण अंत:करणांनी सुमंगल, बुद्धीनें सबळ व धडाडीचे आणि समोर असलेला झगडा शौर्याने झगडण्यास निर्धारी, अशाच तरुणांना देव पाचारण करितो. पवित्रशास्त्र हा आपल्या अभ्यासाचा विषय तें करतील आणि आपल्या अधीर इच्छा स्थिर करतील आणि आपल्या उत्पन्नकर्त्यांच्या व उद्धारकाच्या वाणीला कान देतील असेच तरुण देवाशीं सलोख्याने राहातील एवढेच नव्हें तर आपण थोर आणि भारदस्त झालो आहो असें त्यांना आढळून येईल. CChMara 260.1

जेथें कोठें जाल तेथें प्रकाश घेऊन जा. आपल्या हेतूत सामर्थ्य आहे, वाईटांच्या सोबतीकडून झालेल्या खातरीला सहसा बळी न पडता तुम्ही दुबळ्या मनाचे नाही हें दाखवून द्या. जे देवाचा अनादर करतात त्यांच्या सल्लामसलतींना त्वरित मान्य होऊ नका तर आत्म्याची वाईटापासून सुधारणा करावी, त्याना ताळ्यावर आणावे व त्यांची सुटका करावी. CChMara 260.2

प्रार्थनेंत तत्पर असा. जे स्वत:शी विसंगतपणे वागतात त्यांनी आत्म्याने नम्र व लीन व्हावे अशी त्यांची खातरी करा. पापापासून एका आत्म्याचा उद्धार केला व त्याला ख्रिस्ताच्या छत्राखाली आणिलें तर स्वर्गात मोठा आनंद होईल आणि तुमच्या आनंदमय मुकुटावर एकेका ताच्याची भर पडेल. उद्धारलेला एक आत्मा आपल्या धार्मिक सहवासाने अधिक आत्म्याना तारणाच्या ज्ञानांत घेऊन येईल अशा रीतीने कार्य बहुगुणीत होईल आणि त्याचा विस्तार किती मोठा झाला आहे हें न्यायाच्या दिवशी मात्र प्रगट करण्यांत येईल. CChMara 260.3

माझ्यानें काय थोडेसेच होऊ शकेल अशा समजुतीने प्रभूच्या कार्याची टाळाटाळ करुं नका. नि:सीम भक्ताने जे थोडे तें करीत राहा, कारण तुमच्या प्रयत्नांत देव कार्य करीत राहील. प्रभूच्या आनंदात प्रवेश करण्यास पात्र म्हणून तुमच्या नावाची नोंद तो जीवनी पुस्तकात करून टाकील. 8 CChMara 260.4

*****