कलीसिया के लिए परामर्श
आईबापांचें एकमत असणें अवश्य
स्वभावत: मुलें लाजाळू व प्रेमळ असतात. सहजासहज ती खूष व नाखूष होत असतात. प्रेमळ शिस्तीने आणि गोड शब्दांनी माता त्यांना आपलेसे करून टाकतात. कडकपणाने आणि जबरदस्तीने मुलांना वागविणे ही चूक होय. सारखा कडकपणा आणि निर्विकारी ताबा हीं प्रत्येक कुटुंबात आवश्यक असतात. मनातल्या गोष्टी शांतपणे बोला, सुविचाराने वागा व आपण सांगतों तें कांहीं एक अपवाद न करता अमलांत आणा. 6 CChMara 263.1
आईबापांनीं आपलें बाळपणाचें दिवस विसरून जाऊ नयेत. सहानुभूतीची व प्रेमाची त्यांना कशी आवड असें. टाकून बोलल्यावर व चिडून धमक्या दिल्यावर मुलें कशीं नाखूष होत असत. तारुण्यातील भावना मनात आणाव्या व मुलांच्या गरजा समजून घेण्याचे मन त्यांनी धारण करावे. तरी प्रीतिसह कडक मनाने मुलांत आशांकित बुद्धि सुस्थिर करावी. मातापितरांचा शब्द हा त्यांना प्रमाण असा वाटावा. 7 CChMara 263.2
गृहांतील धरसोडीचा कारभार मोठा हानिकारक किंबहुना बिनकारभाराप्रमाणे वाईट असतो. धार्मिक आईबापांची मुलें वारंवार अशी हेकड, उद्धट आणि बंडखोर का असा वारंवार सवाल करण्यांत येतो. गृहशिक्षणांतच त्याचे कारण आढळून येईल, 8 CChMara 263.3
जर आईबापांचे जुळत नसेल (त्याच्यांत मतभेद असेल) तर तें जुळून येईपर्यंत त्यांनी मुलांबाळांपासून अलग व्हावे. शिस्तीच्या क्षेत्रात जर मातापितराचे मत एक असेल तर मी काय करावे हें मुलाला समजून येईल. परंतु आईची शिस्त आपणास मान्य नाही असें वडिलाने आपल्या शब्दाकडून किंवा नजरेकडून दर्शविले व आई फार कठोर आहे म्हणून आपल्या मायाळूपणाने व लाडाने मुलाला जवळ केले तर त्यांत मुलांचा नाशच होईल. आपल्याला वाटेल तसे आपणास वागतां येईल असें त्याला लवकरच समजून येईल. ज्या आईबापांच्या हस्ते असले पाप घडते तीच त्यांच्या आत्म्याच्या घाताला जबाबदार असतात. (त्यांच्यावरच त्यांच्या आत्म्याच्या नाशाची जोखीम असते.) 9 CChMara 263.4
आत्मसंयमन करण्याचे प्रथम आईबापांनींचे शिकून घ्यावे, तेव्हांच मग त्यांना अधिक यशस्वीपणे आपल्या मुलाना आटोक्यात ठेवता येईल. आत्मसंयमन जरा कोठे ढिले झाले कीं त्यांची भाषा व हालचाल उतावळेपणाची होऊन तें आईबाप देवाच्याविरुद्ध पाप करितात. आपल्या मुलाबाळासह त्यांनी विचारपूस करावी, त्यांच्या चुका त्यांना स्पष्टपणे दाखवाव्यात. त्यांचा दोष त्यांच्या पदरात घालावा व त्यांनी आईबापांविरुद्धच नाहीं तर देवाविरुद्ध पाप केले आहे असें त्यांच्या मनांत बसवावे. त्याच्या चुका दुरुस्त करण्यापूर्वी तुम्ही स्वत: शरणागत अंत:करणाने पूर्ण कळकळीने आणि दु:खाने आपल्य चुकलेल्या मुलांसाठी त्यांना घेऊन प्रार्थना करा. यामुळे त्यांची चूक दुरुस्ती करताना त्यांच्या मनांत तुम्हांविषयी तिरस्कार येणार नाही. ते प्रीतीच करितील. आम्ही त्यांना अडचणींत आणिलें. म्हणून नाहीं अगर त्यांना नाखूष केले म्हणून त्यांनी आम्हांला शिक्षा केली असें त्यांना वाटणार नाही तर आमच्या हितासाठी व आम्ही पापात पडून वाढू नये म्हणून त्यांचे तें एक कर्तव्यच असें ती समजून घेतील. 10 CChMara 263.5