कलीसिया के लिए परामर्श

195/318

प्रकरण ४३ वें - पोषाखाविषयीं सल्लामसलत

इतर सर्व गोष्टींप्रमाणेंच पोषाखाच्याद्वारे आम्ही आपल्या उत्पन्नकर्त्याला भूषणावह होण्याच्या आम्हांला हक्क मिळालेला असतो. आमच कपडे नीटनेटकी व आरोग्यसंरक्षक असावीत, एवढेच नव्हें तर तीं योग्य व शोभतील अशी असावीत. CChMara 249.1

आमचें बाह्यस्वरुप अगदी चागल्यातील चागले ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करावी. मंदिरात देवाची सेवा (उपासना) करणार्‍यांना पोषाखाच्या प्रत्येक तपशिलाविषयीं देवाने विशेष सूचना दिलेल्या होत्या. याप्रमाणे जे कोणी त्याची सेवा करितात त्यांच्या पेहरावाविषयी त्याची पसंतीं असतें असें आम्हांला शिकविण्यांत आलें आहे. अहरोनाच्या पोषाखाविषय विशेष सूचना देण्यांत आल्या होत्या कारण त्याच्या पोषाखांत सांकेतिक अर्थ होता. तद्वतच ख्रिस्ताच्या अनुयायांच्या पेहरावांत कांहीं साकेतिक अर्थ असावयास पाहिजे सर्व बाबींमध्ये आम्ही त्याचे प्रतिनिधि आहोत. आमच्या बाह्यस्वरुपात नीटनेटकेपणा, विनयशीलता व शुद्धता ही हरएक बाबींत दिसून आली पाहिजेत. CChMara 249.2

निसर्ग- सौंदर्याविषयीं (फुले व भूकमळे) बोलतांना ख्रिस्ताने स्पष्ट करून सांगितलें कीं, परमेश्वराच्या दृष्टीने सौंदर्य फार मौल्यवान् असतें. निरभिमानी शोभा, साधेपणा, शुद्धता आणि योग्य अशा पेहरावावरून देव प्रसन्न होतो. 1 CChMara 249.3