कलीसिया के लिए परामर्श

196/318

पोषाखाच्या बाबतीत मार्गदर्शक तत्त्वें

आमच्या अंगावरचा पोषाख व त्याची ठेवण हीं एखाद्या पुरुषाच्या अगर स्त्रीच्या स्वभावाची सूचक चिन्हें असतात. CChMara 249.4

पोषाखाच्या धर्तीवरून एकाद्या माणसाचा गुणधर्म ओळखून येतो. विनयशील व देवभिरु स्त्री आपला पोषाख विनयशीलच ठेवील. साध्या व उचित पेहरावाच्या निवडीने सुशिक्षित व सुसंस्कृत मन दिसून येईल जी स्त्री आपल्या पोषाखांत साधीभोळी व सरळ असतें ती असें दर्शविते कीं एखाद्या स्त्रीचे सत्व तिच्या नैतिक बलांत असतें. पोषाखांतील आकर्षण व मनपसंती ही साधेपणांत असून त्याचे वर्णन शेतांतील फुलांच्या सौंदर्यासारखे असतें. CChMara 249.5

आमच्या लोकांनी परमेश्वरासमोर सावधगिरीने आणि दूरदर्शीपणाने वागावे अशी त्यांना माझी विनंती आहे. आरोग्याच्या तत्त्वानुरुप शक्य तितका आपला पेहराव असावा आपला पोषाख चांगला, टिकाऊ, वयोमानाला शोभेल असा पुष्कळ जणी करितात, तसेच आमच्या भगिनींनी राहावे. पोषाखातच सारे मन गुंतलेले नसावे. आमच्या भगिनींनी आपल्या पेहरावात साधेपणा राखावा. त्यांनी आपली वस्त्रे भीडस्तपणाची करावीत व त्यावरून त्यांच्या अंगची लाजाळ वृत्ति व त्यांच्या शुद्ध विवेकी भावना दिसून याव्यात. आपल्या बाह्यस्वरूपाने आपल्या अंतर्यामातील देवाच्या कृपेचा जो अलंकार आहे तो व्यक्त केला जावा. CChMara 249.6

जर जगांत कोणी विनयदर्शक, सोईस्कर आणि आरोग्याला पोषक अशा पोषाखाचा प्रचार सुरु केला व जर तो पवित्रशात्रातील धोरणाला सुसंगत असला तर त्या पोषाख-पद्धतीने आमच्या व देवाच्या आणि आमच्या व जगाच्या नात्यांत काहीं एक बिघाड होणार नाहीं ख्रिस्ती लोकांनीं ख़िस्ताकडेच बघत राहिले पाहिजे व आपल्या पोषाखाची जुळवणी देवाच्या शब्दानुरुपच (देवाच्या शास्त्रानुरुपच) करावयास पाहिजे. कसल्याही अतिरेकाकडे जाऊ नये. जन निंदो वा वदो सत्य हें सत्य आहे म्हणून त्याला नम्रतेने आणि धैर्याने बिलगून राहावे. CChMara 250.1

पोषाखाचे जे मूर्खपणाचे निरनिराळे प्रघात आहेत त्या सर्वांना अनुसरण्यात वेळ खर्ची घालू नका. पेहराव तर नीटनेटका व साजेल असा असावा. परंतु भपकेबाज पोषाखाने अगर गाळ पेहरावाने लोक-टीकेचा विषय होऊ नका. देवाचे नेत्र तुम्हांवर आहेत व त्याच्याच पसंतीने अगर नापसंतीने आपण जगत आहों, असें समजून राहा. 2 CChMara 250.2

पोषाखाकडे किती लक्ष असतें हें ख्रिस्ताला कळून चुकले होतें म्हणून सावधगिरीची सूचना देऊन त्यानें आपल्या अनुयायांना अशी आज्ञा दिली कीं, याकडे वाजवीपेक्षा अधिक लक्ष देऊ नका. “वस्त्राविषयी का काळज़ी करिता?’ रानांतील भूकफळे कशी वाढतात हें लक्षात आणा; ती कष्ट करीत नाहींत व कातीत नाहीत; तरी मी तुम्हांस सांगतो कीं, शलमोनदेखील आपल्या वैभवात त्यातल्या एकासारिखा सजला नव्हता.” पोषाखाविषयीं गर्व व त्यावरील फाजिल खर्च हीं पापे आहेत व यांत विशेषत: स्त्रिया गुंतलेल्या असतात म्हणून त्यांच्यासाठीच ह्या मनाई-सूचना दिलेल्या आहेत. ख्रिस्ताची लीनता व त्याची प्रेमळता याशीं सोन्याची अगर मोत्याचीं अगर श्रीमतीच्या कपड्यालत्त्याची तुलना केल्यास ती कितीतरी क:पदार्थ अशी ठरतात! CChMara 250.3

पुढील शास्त्रपाठ मला पाहावयास सागितले. देवदूत म्हणाला, “त्यांनी देवाच्या लोकांस शिक्षण द्यावयाचे आहे.” १ तिमथ्य, २:९,१०. स्त्रियांनी स्वत:स साजेल अशा वेषाने आपणास भिडस्तपणे व मर्यादेने शोभावावें ; केस गुंफणे आणि सोने, मोत्ये व मौल्यवान वस्त्रे यांनी नव्हें, तर सत्कमॉनी शोभवावे; (देवभक्ति स्वीकारलेल्या स्त्रियास हें शोभते.) CChMara 250.4

१ पेत्र ३:३-५ : “तुमची शोभा केसाचे गुफणे, सोन्याचे दागिने घालणे, किंवा पोषाख करणे यार्नी बाहेरून आणिलेली नसावी; तर जो सौम्य व शांत आत्मा देवाच्या दृष्टीने बहुमूल्य आहे त्यानें, म्हणजे अंत:करणांतील गुप्त मनुष्यपणाने जी अविनाशी शोभा ती असावी. याप्रमाणे पूर्वी, देवावर विश्वास ठेवणाच्या पवित्र स्त्रियांनीही...... आपणांस शोभविलें.” CChMara 250.5

ह्या सूचना फार पुरातन पद्धतीच्या समजून त्याकडे लक्ष देण्याजोग्या राहिल्या नाहीत असें पुष्कळांना वाटते; परंतु त्या ज्याने आपल्या शिष्यवर्गास दिल्या तो साप्रत काळच्या आवडीच्या पोषाखांत काय काय संकटे होती, तीं तो ओळखून होता, व त्यावरून इशान्यादाखल म्हणून त्या देण्यांत आलेल्या आहेत तो इशारा ऐकून आम्ही सुज्ञ होणार का ? CChMara 250.6

ख्रिस्ताला अनुसरुण ज्यांची खरोखरची धडपड असेल त्यांना त्यांच्या प्रचलित पोषाख विषयी खात्रीने शंका येतील. (१ पेत्र ३:३-५) मध्ये इतक्या स्पष्टपणे जूने दिलेल्या सूचनेप्रमाणे वागण्याचा त्या प्रयत्न करितील. 3 CChMara 251.1

पोषाखाप्रकरणी सरकाराने राहाणे हा आमच्या ख्रिस्ती कर्तव्याचा एक भाग होय. आपल्या दागिन्यांचा कसलाही थाटमाट न करिता साध्या पेहरावांत राहाणे हें अगदी आमच्या विश्वासनारुप आहे. 4 CChMara 251.2

शब्दाथाच्या उपासना-प्रसंगी आपण कसे दिसावे. याविषयींच्या शिक्षणाची पुष्कळांना गरज आहे. आठवडाभर वापरलेल्या नेहमींच्या कपड्यांनी त्यांनी देवाच्या समक्षतेत येता कामा नये. देवाच्या मदिरांत उपासनेला जातांना शब्बाथासाठी विशेष प्रकारचा पोषाख असावा. जगिक शिष्टमान्य पद्धतीचे जरी अनुकरण केले नाहीं तरी आमच्या बाह्यस्वरुपाची बेपरवाई करुन कांहीं मागणार नाहीं. कसलाही भपका न करता आम्ही आपल्या पेहरावांत नीटनेटके व टापटिपीचे असावे. देवाची मुलें आपल्या अंतर्बाह्य देखाव्यांत परिशुद्ध असावीत. 5 CChMara 251.3

पोषाखाविषयीं पवित्रशास्त्रामध्ये दिलेल्या स्पष्ट शिक्षणाला सोडून न राहाण्याविषयी पाळकाच्या (दीक्षित सेवकांच्या) बायकांनी विशेष खबरदारी घेतली पाहिजे. हें मनाईहुकूम पुराण काळची म्हणून त्याकडे लक्ष देण्याची गरज नाहीं असें पुष्कळांना वाटते; परंतु ज्याने आपल्या शिष्याना तें दिले आहेत त्याला साप्रत काळच्या पोषाखाच्या फद्यात काम काय संकटे आहेत, हें तो जाणून हाता व त्यामुळे तें इशारे आम्हापुढे माडिलेले आहेत. ही सूचक ताकीद आम्ही मानून शहाणे होणार कीं नाहीं ? पोषाखातील खर्चाची उधळपट्टी सारखी ऐटी नेहमीच बदलत आहेत, आणि वेळेची अगर खर्चाची परवा न करिता आमच्या बहिणीचे तिकडे चित्त असतेच. पैशांचा दाता परमेश्वर त्याजकडे परत करण्याऐवजी पोषाखापायीं अफाट रक्कम खर्चिण्यात येते. 6 CChMara 251.4