कलीसिया के लिए परामर्श

194/318

स्वत:वर मात्र टीका करणें व्यवहारिक मोलाचें

दुसर्‍यांच्या दोषाविषयी वाटाघाट करीत बसण्यापेक्षा जर ख्रिस्ती म्हणविणाच्या सर्वांनी आपल्या चौकसबुद्धींच्या सामर्थ्याने स्वतःत असलेल्या दुष्टबुद्धांचे निर्मुलन केले तर आजच्या मंडळींमध्ये अधिक हितकर परिस्थिती नांदू लागेल. जेव्हां प्रभू आपली नवरत्ने तयार करूं लागेल तेव्हां जे इमानी, जे निष्कपटी, जे प्रामाणिक आहेत त्याकडे तो प्रसन्न मुद्रेने पाहील. अशासाठी मुकूट बनविण्याचे देवदूताकडे सोपविलेले आहे आणि ह्या रत्नजडित मुकुंटावर देवाच्या सिंहासनांतून प्रज्वलित होणारा प्रकाश आपल्या सौंदर्यासह प्रतिबिंबित होईल. CChMara 247.5

प्रभु आपल्या लोकांची कसोटी करून पारख करीत आहे. तुम्ही आपल्या स्वत:च्या उणेपणाबद्दल वाटेल तेवढे कठोर आणि कडक व्हा. परंतु इतरांविषयी मायाळूपणा, दयाळूपणा व विनयशीलता धारण करा. रोज रोज स्वत:ला विचारीत राहा: मी संपूर्णत: निकोप आहे किंवा फसवेगीर आहे ? या प्रकरणी सर्व प्रकारच्या फसवणूकीपासून प्रभूने तुमचा बचाव करावा म्हणून त्याची प्रार्थना करा. यांत सार्वकालिक हितांचा संबंध येतो. प्रतिष्ठेच्या आणि स्वार्थी लाभाच्या पाठीमागे इतकेजण लागलेले असतां, माझ्या प्रिय बंधुनो, देवाच्या प्रेमाची खात्री मिळविण्यासाठी आस्थेने शोध करीत म्हणा: मला झालेले पाचारण खात्रीनें पसंतीचे होईल हें मला कोण दाखवून देईल? CChMara 247.6

मानवांच्या स्वभावसिद्ध पापांचा सैतान बारकाईने अभ्यास करितो आणि मग त्यांना भुलविण्याचे आणि मोहपाशांत गुंतविण्याचे कार्य सुरु करतो. मोहजालांच्या घनघोर वेढ्यांत आम्ही आहों परंतु जर प्रभूचीं युद्धे आम्ही धैर्याने लढलों तर विजय आमचाच आहे. सर्वच संकटांत आहों में खरें परंतु जर तुहीं आपला मार्ग नम्रतापूर्वक व प्रार्थनापूर्वक कंठीत राहिला, तर ह्या कसोटींच्या लढ्यांतून तुमचे मोल अत्यंत सोन्याहून होय, ओफिरच्या पंच भूजी आकृतीच्या (मूर्तीच्या) सोन्याहून अधिक होईल. जर तुम्हीं निष्काळजी व प्रार्थनाहीन असाल तर तुम्ही वाजणारी थाळी किंवा झणझणणारी झांज असेच ठराल. 10 CChMara 248.1

*****