कलीसिया के लिए परामर्श
प्रकरण ४२ वें - गुणदोष विवेचन व त्याचे परिणाम
ख्रिस्ती लोकांनी आपल्या भाषणाविषयीं सावधगिरी बाळगावी. त्यांनी मित्रांपैकी एकाविषयी दुसन्याला विरुद्ध बातमी सांगू नये व विशेषत: त्या उभयतांचा सलोखा नाहीं हें ठाऊक असतांना तर तिचा स्फोट कदापि करण्यांत येऊ नये. जणू काय आपणाला त्या मित्राविषयी पुष्कळ माहिती असून ती इतर कोणालाच नाहीं असें दाखवून त्याच्या पोटात शिरून इशारे देणे, ही एक निर्दयपणाची वृत्ति होय. असल्या वागणूकीचा आणखी एक परिणाम होती. आहेत. त्या गोष्टी प्रामाणिकपणे काहीं एक विपर्यास न करिता सांगितल्या नाहीत म्हणून परिस्थिती अधिक प्रतिकूल अशी निर्माण होतें. असल्या व्यवहारामुळे ख्रिस्ताच्या मंडळीला कितीतरी नुकसान सहन करावे लागते! सभासदांच्या असल्या विसंगत व बेसावध व्यवहारामुळे मंडळीची लाचारी किती तरी वाढली आहे ! एकाच मंडळीमधले लोक एकमेकांचा विश्वासघात करितात. अशी आगळीक करावी असें त्यांच्या मनांतहि नसेल. संभावणाच्या विषयांची निवड करण्यासाठी लागणार्य चतुराईच्या अभावामुळे भयकर नुकसान झालेले असतें. CChMara 242.1
बोलणें चालणे करावयाचे तें आध्यात्मिक व धार्मिक बाबींविषयी करण्यांत यावे - पण वस्तुत: तें कांहीं उलटेंच असतें. ख्रिस्ती मित्रांचा समागम जर मुख्यत: मानसिक व आत्मिक विकासासाठी झाला तर पुढे पश्चात्ताप करण्याचे कारणच पडणार नाही. उलट तसल्या भेटीगाठींच्या स्मरणाने समाधानच वाटेल. परंतु असले प्रसंग जर पचकळपणाच्या व निरर्थकपणाच्या वाटाघार्टीत दवडले तर त्या मौल्यवान् संधीने दुसर्याच्या चरित्रांची व शीलांची मोडतोडच केली जाईल व तसले मैत्रीचे संबंध वाईटाचें मूळ व घातातील घात असेच ठरून जातील? CChMara 242.2